डिजिटल अर्काईव्ह

.

साने गुरुजी स्मृतिदिन

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि सहभागी इतर संस्था यांच्यातर्फे 11 जून 1197 रोजी साने गुरुजी स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे. सकाळी 8-30 वाजता दादर वैकुंठ भूमीतील पूज्य साने गुरुजींच्या स्मृतिस्तंभाला पुष्पहार समर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. गणेश महाले आणि अन्य प्रतिष्ठित उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता कथामालेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्य सचिव आणि आता शिर्डी संस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक श्री. द.म.सुखटणकर यांच्या हस्ते होईल. या कार्यालयाचा पत्ता 'भार्गवदत्त तिसरा मजला, ओल्ड प्रभादेवी रोड, गॅमन कंपनीमागे, प्रभादेवी, असा असून साने गुरुजींच्या चाहत्या फडणीस बंधुभगिनींनी ही जागा त्यांचे पिताश्री के. अनंत विठ्ठल फडणीस यांच्या स्मरणार्थ कथामालेस दिलेली आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे शिक्षणमंत्री नामदार श्री. सुधीर जोशी हे भूषविणार आहेत. 

त्यानंतर साडेदहा वाजता साने गुरुजी विधाड्यातील विद्यार्थ्यांतर्फे स्मृतिदिन कार्यक्रम साजरा होईल. या प्रसंगी वक्त्या म्हणून श्रीमती सुधाताई वोडा उपस्थित असतील. संध्याकाळच्या सत्रात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि इतर सहभागी संस्था यांच्यातर्फे साने गुरुजी विद्यालयात संध्याकाळी 6-30  वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेचे अध्यक्ष श्री. रामभाऊ मोहाडीकर असतील. वक्ते म्हणून प्रा. पुष्पा भावे, प्रा. चंद्रा लिमये व आमदार श्री. दत्ताजी साळवी हे असतील. त्याच वेळी प्रा. पुष्पा भावे आणि रामभाऊ मोहाडीकर यांच्या हस्ते दोन मौलिक ग्रंथांचे- एक अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्यावरील व दुसरा ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्याया-वरील- प्रकाशनही केले जाईल. ग्रंथाली, कुष्टरोग निवारण समिती शांतिवन आणि डॉ.पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट यांच्याकडून या ग्रंथांची निर्मिती झाली आहे. 11 जूनच्या वरील सर्व समारंभास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून साने गुरुजींच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहावी असे आवाहन श्री. प्रकाश मोहाडीकर, श्री. गोविंदराव शिंदे, श्री. श्रीपाद तोंडवळकर इत्यादींनी केले आहे.

Tags: सुधाताई वोडा  प्रा. चंद्रा लिमये प्रा. पुष्पा भावे गणेश महाले साने गुरुजी Sudhatai Woda Prof. Chandra Limaye Prof. Pushpa Bhave Ganesh Mahale Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी