डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींच्या जन्मशताब्दिनिमित्त 'मानव सेवा' संस्थेचा विविध उपक्रमांचा संकल्प

अमरावती येथील हदयरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या सेवा संस्थेतर्फे पूज्य साने गुरुजींची 98 वी जयंती नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्यानी शिक्षणमहर्षी श्री. पु. रा. पारनेरकरगुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून के. एन. ऊर्फ अण्णासाहेब हाडके पाटील, डॉ. अनिल बोंडे, श्री. व. मा. बक्षी , दे. सु. बसवंत होते. 

अमरावती येथील हदयरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या सेवा संस्थेतर्फे पूज्य साने गुरुजींची 98 वी जयंती नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्यानी शिक्षणमहर्षी श्री. पु. रा. पारनेरकरगुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून के. एन. ऊर्फ अण्णासाहेब हाडके पाटील, डॉ. अनिल बोंडे, श्री. व. मा. बक्षी , दे. सु. बसवंत होते. 24/12/98 पासून सुरू होणाऱ्या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षासंबंधी माहिती देऊन त्यांना अभिप्रेत असलेले विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन जावरकर गुरुजींनी केले हे उपक्रम असे :- 

1) लग्नसमारंभ व वाढदिवसाप्रसंगी 'श्यामची आई' ग्रंथ भेट द्यावा. 

2) श्यामची आई चित्रपट संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गावागावांत दाखविण्यात यावा. 

3) कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे कथाकथन प्रशिक्षण शिबीर घ्यावे. 

4) पूज्य साने गुरुजींनी लिहिेल्या संपूर्ण ग्रंथांची फिरती प्रदर्शने ठेवावी. 

5) साने गुरुजींच्या गीतांचे गायन शाळांतील मुला-मुलींकडून करवून घ्यावे. 

6) विद्यालयीन विद्यार्थ्याकरिता श्यामची आई पुस्तकावरील प्रश्नसंच काढून परीक्षा घ्यावी व मुलांना प्रमाणपत्रे द्यावीत. 

7) तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 'भारतीय संस्कृती' या ग्रंथावर प्रश्नसंच काढून परीक्षा घ्यावी व त्यांना प्रमाणपत्रे द्यावीत. 

8) शहरातील विविध क्लबच्या होणाऱ्या सभांमध्ये साने गुरुजींच्या कार्याची माहिती द्यावी .

9) स्वावलंबन व ग्रामसफाई उपक्रम राबवावेत. 

10) जन्मशताब्दिवर्षात राबवावयाच्या उपक्रमांची माहिती अमरावती जिल्हाधिकारी, पालकमंत्री व राज्याच्या संबंधित मंत्र्यांना पाठवून त्यांचा सहभाग घ्यावा व त्यांच्याकडून या शताब्दी कार्यक्रमासाठी मदतनिधी मिळविण्याचा प्रयत्न करावा. 

11) गावागावातून सुसंस्कारांसाठी कथाकथन शिबिरे घेऊन कथामाला सुरू कराव्यात 

12) भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करावी. 

या प्रसंगी सर्वश्री के. एन. पाटील, दे. सु. बसवंत , डॉ.अनिल बोंडे यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी पु.रा.पारनेरकर गुरुजी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपला. कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Tags: sane guruji manav seva janmshatabdi sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके