.
श्रीमती विद्या बाळ यांना मनःपूर्वक शुभेच्छा
‘मिळून साऱ्याजणी' या लोकप्रिय मासिकाच्या संपादिका आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या एक अग्रगण्य नेत्या श्रीमती विद्या बाळ यांचा नुकताच त्याच्या षष्ठयब्दीनिमित्त अनेक महिला संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अलीकडेच आगरकर पत्रकारिता पुरस्काराचा बहुमान त्यांना लाभला होता. स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे आणि स्त्री-पुरुष मैत्रीच्या आणि सहकार्याच्या नात्यावर निकोप समाजाची उभारणी व्हावी यासाठी अखंड प्रयत्नशील असणाऱ्या विद्याताईंना साधना परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या