डिजिटल अर्काईव्ह

.

मामांची शाळा बिनभिंतीची आहे आणि अनौपचारिक शिक्षणाची मामा ही साक्षात पाणपोई आहेत. त्यांचे सहज बोलणे हा हितोपदेश असतोच, पण नित्य नवे शिकण्याइतके त्यांचे मन उमदे आहे. मामांनी आपल्या प्रासादिक वाणीने कितीतरी जीवने उजळून टाकली आहेत. गीते म्हणताना मामा मंत्रमुग्ध करतात आणि बोलतात तेव्हा त्यांचे शब्द तळमळीने नुसते ओथंबलेले असतात.

----------

याची नोंद घ्यावी

साधना प्रकाशन सवलत योजनेची मुदत 11 जून 1979 अखेरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ग्राहक आणि पुस्तक विक्रेत्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.

----------

शिवाजी विद्यापीठाचा दुसरा पी. एल. 480 प्रकल्प 

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाला कोल्हापूर व त्याजवळील पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर संशोधन करण्याकरता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या शेती विभागाने चार लाख बावीस हजारांचे अनुदान दिलेले आहे. या संशोधन प्रकल्पात भात, ऊस, ज्वारी व नाचणी या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. हा संशोधन प्रकल्प पाच वर्षे चालणार असून त्यात सहकार्य देण्याकरता अमेरिकेचे शास्त्रज्ञ कोल्हापूरला येऊन प्रकल्पात माग घेतील. पी. एल. 480 फंडातून चालणाऱ्या या प्रकल्पाला भारतीय शेती संशोधन संस्थेने मान्यता दिली असून या करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव, डॉ. उषा इसापे यांनी 24 ऑक्टोबरला सही केली. प्रकल्पाचे मार्गदर्शन वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गो. वि. जोशी हे करणार असून त्यांना विभागातील डॉ. हेगडे व डॉ. निंबाळकर मदत करतील. संशोधनाकरता 4 संशोधक घेतले जातील. वनस्पतिशास्त्र विभागाचा हा दुसरा पी.एल. 480 प्रकल्प आहे. या संशोधनाचा उपयोग कोल्हापूर विभागातील मुख्य पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यास होणार असून त्याकरता अत्याधुनिक किरणोत्सर्गी उपकरणे वापरण्यात येतील.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी