डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

.

जीवेत शरदः शतम्!

पुण्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक झुंजार आणि निष्ठावान कार्यकर्ते भाई टिळेकर यांना 20 सप्टेंबरला 75 वर्षे पूर्ण झाली. गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आणि कामगारांचे अनेक लढे यामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त साधनेच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा.

----------

हार्दिक अभिनंदन

गोवा येथे होणाऱ्या येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. हार्दिक अभिनंदन.

---

श्री यदुनाथ थत्ते यांना अहमदनगर येथील ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय व संशोधन केंद्र यांच्यातर्फे कै. प्राचार्य नानासाहेब नारळकर पुरस्कार देण्यात येणार आहे.

दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह अशा स्वरूपातील या पुरस्कारासाठी दरवर्षी सामाजिक बांधिलकी मानून आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रदीर्घकाळ प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवरांची निवड करण्यात येते. श्री यदुनाथ थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके