डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मधु लिमये यांनी आपल्या 'आत्मकथे'त गुरुजींविषयी लिहिले आहे "गुरुजींच्या मनावरचे नैराश्याचे पटल कधी पूर्णतया दूर होत नसे. कशासाठी जगायचे, हा प्रश्न नेहमी त्यांना भेडसावत असे... त्यांच्यात एवढे पृथ्वीमोलाचे गुण होते. जनतेला हलविण्याचे असामान्य सामर्थ्य होते; पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की गुरुजी कायम असमाधानी होते... गुरुजींच्या असमाधानाचे स्वरूप वेगळे होते.

महाराष्ट्र सारस्वतांमध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नाथ भागवत व दासबोध हे चार वेद मानले जातात. त्यांच्या खालोखाल गुरुजींच्या साहित्याचाच नंबर लागेल इतक्या भक्तिभावाने व तन्मयतेने लाखो लोक गुरुजींचे वाङ्मय वाचतात. गुरुजी-ग्रंथभांडार हा महाराष्ट्राचा पाचवा वेद म्हणून चिरंतन स्वरूपात महाराष्ट्र-हृदयात वावरेल यात शंका नाही. काही लोक कीर्तीसाठी लिहितात. काही लोक समाजशिक्षणाचा वा रंजनाचा हेतू मनात धरून लिहितात. गुरुजींच्या पुढे असा काही उद्देश नसे. गुरुजींच्या हृदयाला कोणतीही गोष्ट चाटून गेली, की ती शब्दरूपात व्यक्त केल्याशिवाय त्यांना राहवत नसे. आपल्या तळमळीने समाजातील दु:ख, दैन्य नाहीसे होत नाही या जाणिवेने ते अधिकच तळमळत व या तळमळीला वाचा फोडून बाहेर काढल्याशिवाय त्यांना राहवत नसे. 

‘आंतरिक तळमळीची अभिव्यक्ती’ हा गुरुजींच्या साहित्याचा विशेष होय. आद्य कवी वाल्मीकी पारध्याने क्रौंचवध करून त्या जोडप्याची ताटातूट केल्याचे पाहून विव्हल झाले व त्यांच्या शोकाला श्लोकाचे स्वरूप प्राप्त झाले. तेथूनच साहित्याची सुरुवात. या वाल्मीकी परंपरेचा परिपाक म्हणजेच गुरुजींचे साहित्य! गुरुजी आधुनिक युगाचे कवी असल्याने त्यां

ना प्रेमभावनेचा विध्वंस करणारा पारधी कोण आहे, याचे आकलन झाले होते. केवळ पारध्यांच्या बाणानेच प्रेमीजीवन उद्ध्वस्त होत नसून, आजची समाजरचना त्या पारध्यापेक्षाही अत्यंत क्रूरतेने अनेक जीवांचे संसार उद्ध्वस्त करीत आहे हे त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसले. मानवांनी जी शक्ती निर्माण केलेली आहे, तिचा उपयोग निरपराध दलित जीवनाची पारध करण्यात होत आहे, हे भेसूर दृश्य त्यांच्या दिव्यचक्षूला दिसताच त्यांचा शोक संतप अनावर झाला व तोच साहित्यातून व्यक्त झाला.

बाळासाहेब भारदे
******
मधु लिमये यांनी आपल्या 'आत्मकथे'त गुरुजींविषयी लिहिले आहे "गुरुजींच्या मनावरचे नैराश्याचे पटल कधी पूर्णतया दूर होत नसे. कशासाठी जगायचे, हा प्रश्न नेहमी त्यांना भेडसावत असे... त्यांच्यात एवढे पृथ्वीमोलाचे गुण होते. जनतेला हलविण्याचे असामान्य सामर्थ्य होते; पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की गुरुजी कायम असमाधानी होते... गुरुजींच्या असमाधानाचे स्वरूप वेगळे होते. त्याला कधीही बदलणारे स्थायित्व होते. आपल्या अपूर्णतेची त्यांना भयंकर टोचणी असे. मी त्यांना म्हणायचा, ‘‘आपल्यात जे गुण आहेत त्यावर समाधान मानून, त्यांचा समाजासाठी अधिकात अधिक उपयोग करणे श्रेयस्कर नाही काय ?...’’ गुरुजींचे मन म्हणजे नैराश्याने पेटलेले कुंड होते. असंतोषाचा ज्वालामुखी आतून नुसता धगधगत असे. गुरुजींना पछाडलेल्या नैराश्याच्या विचाराने त्यांना अखेर आत्महत्येला प्रवृत्त केले."
 

साने गुरुजी ही महाराष्ट्राची प्रचंड भावशक्ती होती. महाराष्ट्राच्या जीवनात आधुनिक काळात भावनेची शुद्धता एवढ्या प्रचंड प्रमाणात जर कुठे प्रकट झाली असेल, तर ती साने गुरुजींच्या आयुष्यात. म्हणूनच ते आपल्या देहाचं वस्त्र इतक्या लीलयेने झटकून पलीकडे जाऊ शकले. गुरुजी संत होते. तथापि त्यांचा सतपणा संसाराला कृतार्थ करणारा होता. भाषेचे, प्रांताचे किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे पाश त्यांना बांधू शकले नाहीत. शुद्ध प्रेम कसे करावे ह्याचा धडा महाराष्ट्राला गुरुजींनीच शिकविला. गुरुजींनी महाराष्ट्राला दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे त्यांची प्रांतभारतीची आंतरभारतीची कल्पना.

आचार्य स. ज. भागवत
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके