डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"गांधींच्या विचारांना जुनाट म्हणून सोडून देणारांच्या लक्षात येत नाही की गांधींची दृष्टी अणुस्फोटातून उद्भवणाऱ्या धुराच्या लोटांच्याही आरपार गेली. आज अणुयुगाने माणसासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. संपूर्ण मानवजातीचा संहार टाळण्यासाठी हिंसेचे निर्मूलन करणारी नवी जीवनपद्धती त्याला शोधावी लागणार आहे. त्याकरिता त्याला अगदीच नव्या दिशेने चिंतन करावे लागेल. नवी मूल्ये, नव्या रीतीभाती, नवी व्यवस्था शोधावी लागेल. गांधींच्या मनाला या शोधाचा ध्यास लागला होता..."

"न्या परंपरांच्या पायावर नंतरच्या काळातील अनुभवांनी संपन्न झालेली अशी नवी संस्कृती उभारणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. भारतात येऊन येथे स्थायिक झालेल्या, येथील जीवनावर ज्यांचा प्रभाव पडला आहे आणि येथील मातीचा वास ज्यांना लागला आहे, अशा निरनिराळ्या संस्कृतींचा संगम घडवून आणण्याची उमेद आपण बाळगली पाहिजे. हा संगम स्वदेशी पद्धतीचा असेल. त्यात प्रत्येक संस्कृतीचे विशिष्ट स्थान अबाधित राहील. अमेरिकेप्रमाणे एका प्रमुख संस्कृतीने इतरांना शोषून घ्यावयाचे, बळाचा वापर करून कृत्रिम ऐक्य निर्माण करावयाचे हा आपला मार्ग नव्हे" 

- महात्मा गांधी

गांधीजयंती 2 ऑक्टोबर

---------

"गांधींच्या विचारांना जुनाट म्हणून सोडून देणारांच्या लक्षात येत नाही की गांधींची दृष्टी अणुस्फोटातून उद्भवणाऱ्या धुराच्या लोटांच्याही आरपार गेली. आज अणुयुगाने माणसासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. संपूर्ण मानवजातीचा संहार टाळण्यासाठी हिंसेचे निर्मूलन करणारी नवी जीवनपद्धती त्याला शोधावी लागणार आहे. त्याकरिता त्याला अगदीच नव्या दिशेने चिंतन करावे लागेल. नवी मूल्ये, नव्या रीतीभाती, नवी व्यवस्था शोधावी लागेल. गांधींच्या मनाला या शोधाचा ध्यास लागला होता..."

-जयप्रकाश ('माझी विचारयात्रा' या ग्रंथातून)

जयप्रकाश पुण्यतिथी 8 ऑक्टोबर. जयंती 11 ऑक्टोबर

 

----------

डिफेन्स कर्मचारी संघटनेचे मॅथ्यू यांचे निधन

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस के.एम.मॅथ्यू यांचे 20 सप्टेंबरला पुण्यात निधन झाले. ते एस.एम. जोशी यांचे एक विश्वासू सहकारी होते. 1945 साली ते पुण्यात आले. संरक्षण कामगारांची संघटना स्थापन करण्यात आणि वाढविण्यात एस.एम. जोशी, बा.न.राजहंस यांच्याबरोबर त्यांनीही फार परिश्रम केले. आयुष्य त्यांनी या चळवळीसच वाहिले होते. हा झुंजार ट्रेड युनियन नेता, व्यक्तिगत जीवनात कमालीचा सहिष्णू होता. त्यांच्या निधनाने निष्ठावान ट्रेड युनियन नेता आणि समाजवादी कार्यकर्ता हरपला आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 

-----------

'मराठवाडा' दैनिकाचा रौप्य महोत्सव

'मराठवाडा' हे दैनिक गेली पंचवीस वर्षे ज्या ध्येयवादी वृत्तीने चालविण्यात आले त्यामुळेच मराठी वृत्तपत्र सृष्टीत - 'मराठवाड्या'स आदराचे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 'मराठवाडा' हे लढ्याचे हत्यार होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर 'मराठवाडा' हे सामाजिक न्यायासाठी प्रभावीपणे कार्य करीत आहे." मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांनी मराठवाडा दैनिकाच्या रौप्य महोत्सव समारंभात असे गौरवोद्गार काढले. हैद्राबादच्या 45 व्या मुक्तिदिनी मराठवाडा दैनिकाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. श्री. गोविंदभाई श्रॉफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात निवृत्त सरन्यायाधीश श्री. व्यंकटराव देशपांडे, सुप्रसिद्ध पत्रकार श्री. अरुण साधू, प्रा. दत्ता भगत आणि श्री. ग. प्र. प्रधान यांनी 'मराठवाड्या'स शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात गोविंदभाई श्रॉफ यांनी, ' मराठवाडा दैनिकाने मराठवाड्यातील जनतेच्या आकांक्षा सतत प्रखरपणे व्यक्त केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

------------

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेतर्फे साने गुरुजी पुरस्कार

साने गुरुजी कथामाला दर वर्षी 24 डिसेंबरला साने गुरुजी जयंती दिवशी आंतरभारती स्वरूपात साने गुरुजी पुरस्कार देण्यात येतो, हा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांना देण्यात येईल.

1. आंतरभारतीचा विचार बालमनात सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न करणारे 

2. भारतीय संविधानातील मूळ सिद्धांतावर पूर्ण श्रद्धा करणारे

३. सर्वधर्मसमभावाची जाणीवपूर्क जोपासना करणारे... 

अशा व्यक्ती व संस्था सातत्याने 10 वर्षे काम करीत असल्या त्यांची नावे संपूर्ण माहितीसह साने गुरुजी कथामालेकडे दि. 15 ऑक्टोबर 1992 पर्यंत पाठवावीत. संबंधित व्यक्ती व संस्था यांनी व्यक्तिशः अर्ज करू नये. वयाची अट नाही.

कायमचा पत्ता :

साने गुरुजी कथामाला, भिकोबा पाठारे मार्ग, दादर, मुंबई 28

----------

कै. सुमतीबाई गोरे आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी निवासी महिला अधीक्षिका पाहिजे. (एम.ए सायकॉलाॅजी) राहण्याची सोय आणि ३5 वर्षांपुढील महिलाननी खालील पत्त्यावर सोमवार दि. 28/9/92 रोजी 5 वाजता अर्ज व सर्व प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पत्ता :

डॉ. शोभा नेर्लीकर सेक्रेटरी, रचना ट्रस्ट, नेर्लीकर हॉस्पिटलजवळ, गंगापूर रोड, नाशिक 5.

----------

प्र. द. पुराणिक यांना गंगाशरणसिंह पुरस्कार 

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे कार्याध्यक्ष प्र. द. पुराणिक यांनी सातत्याने 50 वर्षे हिंदी सेवाकार्य केल्याबद्दल आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थेने त्यांची गंगाशरणसिंह पुरस्कारासाठी निवड केली आहे. अखिल भारतीय हिंदी सेना सन्मान योजनेतर्फे 15 हजार रुपयांचा हा पुरस्कार देण्यात येतो.

अखिल भारतीय स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. श्री. पुराणिक म्हणाले, 'साने गुरुजींनी रचनात्मक कार्य म्हणून हिंदी प्रचाराचे काम करण्यास मला सांगितले. ती प्रेरणा घेऊन मी आजवर काम केले.' 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके