डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हल्ली वाचक चौफेर बनलेला आहे आणि चोखंदळही. त्यात पुन्हा साधनाचा ध्येयवाद, जीवननिष्ठा यांनाही जरूर जपावयास हवेच. या सर्वांतून मार्ग काढत जास्तीत-जास्त नवीन सकस वैविध्यपूर्ण वाचकांना द्यावयाचे तर त्यासाठी  वाचकांचीही मदत आणि मार्गदर्शन हवेच. कोणते लेखक, कोणते विषय, कोणती सदरे, वादसंवाद, चर्चा यांची कशी सोय ‘साधना'च्या पानापानांवर उमटावी, याबद्दल आवर्जून लिहावे अशी अपेक्षा आहे. तसे झाले तरच साधना अधिक चांगल्याप्रकारे चौफेर वाढेल, सर्वांना अधिकाधिक समाधान देईल.

निवेदन

राष्ट्र सेवा दलातर्फे युसूफ मेहेरअली सेंटरच्या सहकार्याने गुजरातमध्ये भूकंप पीडितांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. कच्छमधील मुद्रा तालुक्यात 5 जुलैपासून घरबांधणीचे काम सुरू होत आहे. ज्यांना या पुनर्वसन कार्याकरिता कार्यकर्ते पाठवायचे आहेत, त्यांनी श्री. सुरेश देशमुख व श्री. सुरेश डहाळे, राष्ट्र सेवा दल, मध्यवर्ती कचेरी, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, पुणे 411030, दूरध्वनी : 4336110, येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचा गट किमान 8 जणांचा असावा.


लेखणी हातात घ्या

आपल्या आजूबाजूला अनेक छोटे-मोठे संघर्ष, छोटी-मोठी माणसे निकराने लढवीत असतात. अन्यायाविरुद्ध ताठ मानेने झुंजत असतात. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. शोषितांचे नव्या जीवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी  विधायक कामात रंगून गेलेले असतात. इतरांनी प्रेरणा घ्यावी असे काम झपाटल्यासारखे करत असतात. 

अशा सर्व व्यक्ती, संस्था त्यांचे काम संघर्ष, रचना या सगळ्यांचे ‘साधना'ला फार अगत्य आहे. या सर्व ठिकाणी प्रकाशझोत पोचवणे आणि अजून सारेच काही विझलेले नाही याचा दिलासा मनामनांत जागवणे हेच तर मुळी ‘साधना'चे प्रयोजन आहे. तेव्हा विनंती एवढीच, की अशा कामात व्यक्तिगत पातळीवर असाल, संस्थात्मकरीत्या जोडलेले असाल तर त्या परिवर्तनाच्या कुरुक्षेत्रावर काय घडवू मागत  आहात आणि काय घडते आहे हे ‘साधना'साठी जरूर लिहा. स्वतःचे लिहा तसेच अन्य परिचित व्यक्ती आणि संस्थांचेही. थोडक्यात नेमके आणि शक्यतो छायाचित्रासह. लिहिणे अगदीच शक्य नसेल तर कळवा, त्याची काही व्यवस्थाही करता येईल.

संपर्क : संपादक, साधना साप्ताहिक

 431 शनिवार पेठ, पुणे 411030. फोन : 020-4451724 (फॅक्ससहित).

 

‘साधना'त हे हवे - माझे मत

हल्ली वाचक चौफेर बनलेला आहे आणि चोखंदळही. त्यात पुन्हा साधनाचा ध्येयवाद, जीवननिष्ठा यांनाही जरूर जपावयास हवेच. या सर्वांतून मार्ग काढत जास्तीत-जास्त नवीन सकस वैविध्यपूर्ण वाचकांना द्यावयाचे तर त्यासाठी  वाचकांचीही मदत आणि मार्गदर्शन हवेच. कोणते लेखक, कोणते विषय, कोणती सदरे, वादसंवाद, चर्चा यांची कशी सोय ‘साधना'च्या पानापानांवर उमटावी, याबद्दल आवर्जून लिहावे अशी अपेक्षा आहे. तसे झाले तरच साधना अधिक चांगल्याप्रकारे चौफेर वाढेल, सर्वांना अधिकाधिक समाधान देईल.

संपादक

 

श्रीपाद दाभोलकर प्रयोग परिवार

प्रकटन क्र. 2

1] गेल्या काही आठवडयांत सांगली, कोल्हापूर, मुंबई येथे काही कार्यकर्त्यांच्या गटांशी संपर्क झाला. ‘श्रीदा' प्रयोग परिवारचे काम नेटकेपणे पुढे चालू राहिले पाहिजे असा सार्वत्रिक उत्साही प्रतिसाद मिळाला. त्याला यथाकाल अधिक सुसंघटित स्वरूप येईल. 
2] श्रीदांच्या हस्तलिखित स्वरूपातील टिपणांच्या, पत्रव्यवहाराच्या संकलनाचे व झेरॉक्स करण्याच्या कामास वेगाने प्रारंभ झाला आहे. ज्यांच्याकडे असे काही कागद असतील त्यांनी संपर्क साधावा. 
3] प्रयोग परिवारशी संबंधित लोकांची सूची करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा सर्वांनी आपले संपूर्ण नाव, पोस्टाचा पत्ता, संपर्क फोन, ई-मेल, फॅक्स (असेल त्याप्रमाणे) कृपया लागलीच कळवावेत. प्रयोगाविषयीही लिहावे. लवकरच ही सूची प्रसिद्ध करावयाची आहे.
4] ‘आपले हात जगन्नाथ' याच्या फारच थोडया प्रती शिल्लक आहेत. प्रत्यक्ष प्रयोग करणाच्यासाठीच त्या प्रत्येकी एकप्रमाणे उपलब्ध केल्या जाऊ शकतील. त्या हव्या असणाऱ्यांनी आपल्या माहितीसह प्रा. देवदत्त दाभोलकर यांच्याकडे मनीऑर्डरने पुस्तकाची किंमत रु. 150/-, रजिस्टर बुकपोस्टसाठी रु.22/- असे एकूण रु. 172/- पाठवावेत.
5] या पुस्तकाची सुधारित आवृत्ती दोन महिन्यांत प्रकाशित व्हावी. त्या आवृत्तीच्या आपल्याला किती प्रती हव्या आहेत ती संख्या सध्या केवळ कळवून ठेवावी.
6] दहा गुंठ्यांचा प्रयोग पुढे नेण्यासाठी तसे प्रयोग करीत असणाऱ्यांनी संपर्क साधावा. त्या सर्वांची एकत्र बैठक घेतली जाईल व अधिक आखणीचा विचार केला जाईल. ‘दहा गुंठ्यांचा प्रयोग काल, आज आणि उद्या' अशा स्वरूपाचा प्रदीर्घ लेखही प्रसिद्ध करावयाचा आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता :
प्रा. देवदत्त दाभोलकर
‘शान्तिनिकेतन', 43, गुरुवार हौसिंग सोसायटी, शाहूनगर, गोडोली, सातारा शहर - 415001. 
फोन : (02162) 39378, 32555.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके