डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

योगायोग असा की सईद मिर्झा चा 'अम्मी' तही सईद मिर्झा असाच देशविदेशातला डोळस प्रवास आहे. सईद मिळाला चित्रपट निर्मितीचा अनुभव एका क्षणी उबग आणणारा वाटला. येटस्ला अर्थशास्त्र शिकवण्याचा. दोघेही संधी मिळताच त्यातून निसटले. सईद मिर्झा टाकून आपल्या भटकंतीचे चित्रण केले. समाजजनांना बोलते

आपण वाचनासंदर्भात बोलतो तेव्हा कोणत्या वाचनाविषयी बोलतो. वेळ जात नाही म्हणून केल्या जाणाऱ्या वाचनाविषयी आपण बोलत नाही. आपणासाठी हा फावल्या वेळावा व्यापार नाही. आपण त्यासाठी आपल्या एकमेव आयुष्यातला अमूल्य वेळ देत असतो. किंबहुना आपण वाचतो त्यातून बहुतांश वेळा आपण डोक्याला तापच देत असतो. तर आपण आपल्या वाचत असलेल्या ग्रंथांच्या प्रकाशात आपले आयुष्य तपासत असतो. आणि 'आपले आयुष्य' असे म्हणत असताना ते काही आपल्या एकट्याचे केवळ खाजगी आयुष्य नसते. त्यात ते तर असतेच, पण त्याच्यासोबतच आपले कुटुंब, सगेसोयरे, आपला समाज, आपला देश, अवघे चराचर विश्व, निसर्गातली सजीव आणि निर्जीव सृष्टी आणि आपला इतिहास आणि भूगोल असा विशाल गोतावळा यात असतोच असतो. आणि त्यानंतर या तपासात आपल्या वाट्याला येतात विविध अनुभवांचे क्षण. आशा, निराशा, उमेद, उत्साह आणि खिन्नताही.

गेल्या काही दिवसात मी झपाटल्यासारखा वाचत आहे. फिडेल कॅस्ट्रोचे आत्मचरित्र 'माय लाईफ', मायकेल डी. येटचे अमेरिकन प्रवासाचे वर्णन 'चीप मोटेल्स अॅन्ड ए हॉट प्लेट'. सईद मिर्झा 'अम्मी : ए लेटर टू ए डेमॉक्रॅटिक मदर'. अरुंधती रायचे 'दी शेप ऑफ दी बिस्ट' आणि तिचे इस्तंबूलमध्ये झालेले भाषण, नोम चोम्स्कीचे लेखन, शिवाय हिंदीतले 'बनास', 'पक्षधर', पहल' यांचे सणसणीत मजकूर हाती देणारे अंक, शिवाय मराठी तर आहेच. उत्तम कांबळे यांची 'एका स्वागताध्यक्षाची डायरी', सुनंदा अमरापूरकरांचा हेरॉल्ड एस. कुशनर यांच्या ग्रंथाचा अनुवाद 'व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पिपल', शिवाय सुनंदा महाजनांचा 'होलोकॉस्ट च्या कविता', 'सारंग दर्शनेचा सुधीर ककरच्या ग्रंथाचा अनुवाद 'मीरा आणि महात्मा', फौझिया सईदच्या 'टॅबू'चा रेखा देशपांडेकृत अनुवाद, बाल्झाकच्या एजेनी ग्रांदेचा श्री.मा.भावेंनी केलेला
अनुवाद, नीलम पारीखांचा हरिलाल गांधींवरचा ग्रंथ 'गांधीजींचा हरवलेला ठेवा', सुधीर देवरेंचे छोटेखानी आत्मचरित्र 'पंख गळून गेली तरी', अरूंधती राय यांच्या दोन निबंधांचा मराठी अनुवाद 'असीम न्यायाचे गणित


आणि इन्सन्ट मिक्स, लोकशाही', विजय पाडळकरांचे अकिरा कुरोसावाच्या राशोमन'वरचे 'गर्द रानात भर दुपारी, प्रज्ञा दया पवार कवितेतून बाहेर येत नाटकाकडे वळलेले पहिले पाऊल 'धादांत खैरलांजी' हे आणि असे कितीतरी अधलेमधले लेखन. संदर्भाने पुन्हा मागे वळलो आणि एल्ड्रिज क्लिव्हरचे 'सोल ऑन आइस' पुन्हा पहिल्यांदाच वाचावे तसे नव्याने वाचले. आता आठवले नाही असेही असणार. काही विषयी आधीही बोललो आहे. काहींविषयी आज बोलायचे आहे. काहींविषयी नंतरही बोलेन. पण आपणाला सांगायला आनंद वाटतो की यातल्या प्रत्येक ग्रंथाने मला वर्तमान तपासायला मदत केली. यातल्या जवळपास सगळ्याच लेखकांचा, अनुवादकांचा त्यांची निर्मिती आपल्यापर्यंत आणण्याचा तो प्रधान हेतू आहे. यापैकी कोणीच आपल्या निर्मितीकडे केवळ 'कमॉडिटी' किंवा 'वस्तू' म्हणून पाहिलेले नाही. आणि आपणही त्याकडे तसे पाहू नये यावर त्यांचा जाहीर किंवा मूक कटाक्ष आहे. यातला प्रत्येकजण आपल्या वर्तमानकाळाविषयी चांगल्या अंगाने असमाधानी आहे. जो है उससे बेहतर चाहिये.' 'पर्यायी सुंदर जग शक्य आहे'. आणि तसे जग उभे करण्याचा ध्यास यातल्या प्रत्येकाचा आहे. "We shall have our manhood. We shall have it or the earth will be leveled by our attempts to gain it." १९ जून १९६५ ला माल्कम एक्स या अमेरिकन निग्रो बंडखोर नेत्याच्या खुनाची बातमी कळल्यावर एल्ड्रिज क्लिव्हरने हे उद्गार तुरुंगातून काढले होते. त्याचा मराठी तर्जुमा साधारण असा करावा. "आम्ही आमचं माणूसपण मिळवूच. आम्हाला ते मिळणारच. अथवा आमच्या प्रयत्नांतून ते मिळवताना ही पृथ्वी समतल करू." 'समतल ऐवजी 'नांगरून घेऊ' अधिक आवडले असते. असो.

आता एल्ड्रिज क्लिव्हरचा हा ग्रंथ केव्हातरी सत्तरीच्या दशकातच वाचला होता. पण नुकतेच सईद मिाच्या लेखनात ते वाक्य अचानक आले आणि पुन्हा 'सोल ऑन आइस च्या पानांतून त्या वाक्याचा वेध घेतला. सईद मिाच्या 'अम्मी : ए लेटर टू ए डेमॉक्रॅटिक मदर'चा अनुवाद तातडीने मराठीत व्हायला हवा. परवाच्या विश्वासदर्शक ठरावावरल्या संसदीय गदारोळात तुम्ही ओमर अब्दुल्ला या काश्मीरच्या तरुण खासदाराला बोलताना ऐकले आणि पाहिले आहे का? त्याला पाहताना मला सईद मिर्ज्ञाच्या लेखनाची आठवण झाली. 

आता शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांकडे दूरदर्शन संच असणार, पण तो चालावा यासाठी वीज नसणार. मी तर चक्क डोंगरातच. आणि आदिवासींचे पाडे, त्यांच्या अनेक घरांतून वीजच नाही किंवा विजेच्या बिलाचे पैसे


भरावेत असे आर्थिक बळही नाही. ती विजेच्या तारांवर आकडे टाकतात. असे आकडे सर्रास आठवडी बाजारात मिळतात. आता त्यांनी आकडा टाकला आणि टाकताना त्यांचा तारेचा वेध चुकला आणि आकड्याचा स्पर्श दोन तारांना झाला की फेज उडतो आणि वीज गायब. हा प्रकार वारंवार. म्हणजे आधीचे भारनियमन आणि त्यात ही भर. अशी वीज गायब. आता हा सगळा अजब मामला हा आपल्या देशातला अंतर्विरोध. पण हे वास्तवच. चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात संगणक चालवताना (बॅकअप पॉवरच्या साहाय्याने) मी पाहिला आहे. अरुंधती रायने आपल्या लेखनात हा अंतर्विरोध नोंदवला आहे. अगदी प्रभावी भाषेत आणि तार्किक प्रतिवादात. पण आपला या संदर्भातला राग आपण व्यक्त करतोच. एल्ड्रिज क्लिव्हरचे एक वाक्य असेच समोर आहे. "At one time it seems absolutely clear and at other times I do not believe in it." अरुंधती रायचे लेखन वाचताना आपल्याही समोर अनेक प्रश्न येतात. काहीशी गोंधळाची परिस्थिती. वीज हवी. गरज अधिक विजेची. एक बाजू सांगणार अणुऊर्जा तर दुसऱ्या अणुऊर्जा वर्ज्य, मधल्यांचे आणखीच वेगळे प्रश्न. पण विजेची गरज खरी आहे.

तेव्हा वळलो पुन्हा फिडेल कॅस्ट्रोच्या आत्मचरित्राकडे. पान ६१३ वर तो म्हणतो, "The examples of solar panels for constant electricity, which never interrupted, to every little nook and hollow in the country side." हा त्याच्या क्युबन राजसत्तेचा अनुभव. आपल्याकडेही सौरऊर्जेचा उपयोग हिमालयाच्या पहाडी भागात मी पाहिला आहे. औरंगाबादमध्ये एका मित्राचा पूर्ण पवार, घरातील विजेवर चालणारी सारी यंत्रणा सौरऊर्जेच्या माध्यमातून चालत आहे. थोड्याफार अधिक उण्या शक्यता गृहीत धरूनही सौरऊर्जेचा पर्याय हा अन्य वीजनिर्मिती पर्यायांना पूरक म्हणून विचारात घ्यायलाच हवा. दामोदर धर्मानंद कोसंबी या ज्ञानी माणसाने जवळपास पन्नास वर्षांपूर्वीच सौरऊर्जेच्या पूरक पर्यायाचा विचार मांडला होता. पण त्याकडे आपल्या सत्ताधाऱ्यांनी लक्षच दिले नाही. विकासाचे एक प्रारूप त्यांच्यासमोर असावे किंवा होते. त्यांच्या प्रामाणिक असण्याचीही खात्री आहे. पण आज ते प्रारूप (त्याला नेहरुप्रणित विकासाचा आकृतीबंध असे मानतात.) तसेच्या तसे कामी येत नाही हे ओळखायला हरकत नसावी. फिडेल कॅस्ट्रोचा क्यूबा, त्याचे आत्मचरित्र तर आपल्यासमोर साक्षातच आहे, अरुंधती राय जशी हट्टी आणि आग्रही तशीच आपली पण सत्तेवर असलेली वयाची सत्तरी गाठलेली ज्येष्ठ मंडळीही. या ज्येष्ठांनी फिडेल कॅस्ट्रोचे 'माय लाइफ' अवश्य वाचावे. अर्थात इथेही अरुंधती राय आठवतेच. तिचे म्हणणे ही बुश

वगैरे मंडळी असतात ना, त्यांना सगळे पूर्ण माहीत असते, पण त्यांना ती माहिती परवडणारी नसते. कारण विकासाच्या त्यांच्या प्रारूपात याला जागा नसते. 'दि शेप ऑफ दि बेस्ट च्या पानापानावर तिने यावर भाष्य केले आहे. त्यातले उतारे देणे हा त्याला 'पर्याय' नाही. आपण ते वाचायलाच हवे. आणि आपल्या ज्या भावंडांना इंग्रजी वाचनापर्यंत आपल्याला नेता आलेले नाही, त्यांच्यासाठी ते मराठीत यायला हवे. आणि ज्यांना त्या मराठीपर्यंतही अजून पोचता आलेले नाही त्या तिथपर्यंत आणण्यासाठी सगळे प्रयत्न करायला हवेत.

आता उपरोक्त वाचलेल्या ग्रंथांच्या यादीत एक विलक्षण वेगळा ग्रंथ आहे. 'चीप मोटेल्स अॅन्ड हॉट प्लेट' हा ग्रंथ आमचा मित्र नचिकेत याने अमेरिकेतून आणला. या अभ्यासू वाचनवेड्याने आई-वडिलांसोबत अमेरिकेत जाण्याची संधी घेतली आणि अधिकतर वेळात ग्रंथांच्या जगाचा प्रवास केला. येताना बॅगा भरून ग्रंथ आणले. त्याच्या अद्भुत ग्रंथयात्रेवर त्याने लिहावे यासाठी पाठपुरावा केला, पण अजून तरी प्रयत्नांना यश नाही. ग्रंथ आहे प्रवासाविषयी. मायकेल येट्स व्यवसायाने प्राध्यापक. त्याने बत्तीस वर्षे अर्थशास्त्र हा विषय विद्यापीठात शिकवला. शिकवतानाच त्याचे सामर्थ्य ध्यानात आलेच होते. मग संधी मिळताच या पती-पत्नीने स्थावर जंगमाची लावता येईल तशी व्यवस्था किंवा विल्हेवाट लावली आणि दोघांनी देश समजून घ्यावा यासाठी प्रवास केला. अडचणींवर मात करीत छोटे-मोठे कष्ट करीत ती जवळपास पाच वर्षे भटकली. त्या काळात त्यांनी पाहिलेला अमेरिकेचा समाज यात आलेला आहे. टूरिस्टांची ही अमेरिकन यात्रा नव्हे. आणखी काही वर्षातच आपणही त्यातून जाणार अशी चिन्हे आहेत. माणूस मुळात मार्क्सवादी असल्याने समाज कसा वाचावा याचे अभ्यासपूर्ण भान आणि या रुग्ण समाजाच्या आजारांचे त्यांचे वर्गीय विश्लेषण आपल्याही विकासप्रक्रियेच्या आणि लोकशाही व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर पहावे असेच आहे. आपल्याकडे जाती, धर्म, वंशभेद तसेच तिथेही वंशभेद, वर्णभेद, स्वकीय-परकीय, विकासातून विस्थापित, प्रदूषण, निसर्गाचा विनाश हे सर्व आहेच. अमेरिकेचे हे गोंडस चित्र नाही. लेखकाच्या वर्गभानाची किनार या प्रवासाला आकडेवारीनिशी जोड देणारीच आहे.

योगायोग असा की सईद मिर्झा चा 'अम्मी' तही सईद मिर्झा असाच देशविदेशातला डोळस प्रवास आहे. सईद मिळाला चित्रपट निर्मितीचा अनुभव एका क्षणी उबग आणणारा वाटला. येटस्ला अर्थशास्त्र शिकवण्याचा. दोघेही संधी मिळताच त्यातून निसटले. सईद मिर्झा टाकून आपल्या भटकंतीचे चित्रण केले. समाजजनांना बोलते


केले. ते सगळेच मुळात वाचायला हवे. ग्रंथाच्या अखेरीस "The First Lady and the Terrorist' असे एक फिल्म स्क्रिप्टही आहे. अफगाणिस्तानातून परागंदा झालेला तरुण प्रा.रशिद आपल्या बहिणीच्या आसऱ्याला अमेरिकेत येतो. आणि त्याच काळात अमेरिकेतील ११ सप्टेंबरचे घातपाती हल्लाप्रकरण समोर येते. बहिणीच्या असल्याने राहत असतानाच लिंडा या निग्रो तरुणीशी त्याचा परिचय होतो. सगळेच सांगत नाही. प्रेम तर आहेच, पण पेचही आहे. पेचही एकाच अंगाचा नाही तर त्यालाही विविध परिमाणे. माणसाचे माणूसपण हिरावून घेणारी. एल्ड्रिज क्लिव्हरचे आरंभीचे वाक्य आठवा. या फिल्म स्क्रिप्टचा शेवटचा संवाद फारच हादरवणारा. 

Rasheed: Because if I stay longer, there is the distinct possibility that I will fall in love with you... Which will be disastrous! 

Lida: Why?

Rasheed : It will destroy the greatest friendship in the world. आता हे किती अंगांनी आपल्यावर आदळते हे जाणून घेण्यासाठी आपण या ग्रंथाकडेच वळायला हवे. राजेश जोशी या हिंदीतल्या आजघडीच्या महत्त्वाच्या कवीची 'समरगाथा' जवळपास तीन वर्षांआधी वाचली होती. त्यात मास्टर मदन या तरुण वयातच- त्याचा कंठ फुटला नव्हता अशा वयात मारल्या गेलेल्या गायकासंदर्भात एक अशी ओळ होती. 'मास्टर मदन वह हमे गाने नहीं देते' आठवणीवर विसंबूनही ओळ देतो आहे कारण माझी 'समरगाथा'ची प्रत कुठेतरी हस्तांतरित झाले आहे. असो.

आपले हरवलेले आणि खरे तर 'हिरावलेले' माणूसपण मिळवताना खूप कष्ट पडणार आहेत. सईद मिा, मायकेल येटस्, अरुंधती राय आणि आपण सगळेच ज्या बाजूचे आहोत त्या बाजूने पाय रोवून ठाम उभे आहोत. काही बाबी संदिग्ध आहेत. पण याहून सुंदर पर्यायी जगाची आपली लढाई आपण सोडलेली नाही. अरुंधती राय तिच्या उपरोक्त मुलाखतींच्या ग्रंथात म्हणत आहे... We as human beings must never stop that quest. Never. Regardless of Bush or Churchill of Mussolini or Hitler, whoever else. We can't ever abandon our personal quest for joy and beauty and gentleness. Of course weare allowed moments of despair. We would be inhuman if we weren't, but let it never be said that we gave up. (The shape of the Beast; Viking/Penguin 2008 : page 67).

Tags: अम्मी सतीश काळसेकर वाचणार्‍याची रोजनिशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके