डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दलवाईंनी पेरलेलं आता उगवू लागलं आहे...

विशेष ग्रंथ पुरस्कार : दगडावरची पेरणी

मनोगत । सय्यदभाई
हमीद दलवाईंच्या  मृत्यूनंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळाला त्या तोडीचा नेता मिळाला नाही, पण त्यांनी उभारलेल्या सर्व संघर्षात्मक आंदोलनांत ज्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांतले प्रमुख कार्यकर्ते सय्यदभाई. स्वत:च्या बहिणीच्या तलाकचे दु:ख सतत सलत असलेल्या सय्यदभाईंनी मुस्लिम समाजातील सुधारणा आणि त्यातही तोंडी तलाकचा प्रश्न यासाठी गेली 40 वर्षे काम चालू ठेवले आहे. ‘दगडावरची पेरणी’ हे पुस्तक सय्यदभाईंचे ‘कार्यकथन’ तर आहेच, पण मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याचे व मुस्लिम धर्मातील सुधारणांसाठी महाराष्ट्रात झालेल्या चळवळींचा दस्तावेज झाले आहे. केवळ सभास-संमेलने-परिषदा भरवून आणि मोर्चे- आंदोलने करून सय्यदभाई थांबलेले नाहीत, तोंडी तलाकच्या शेकडो प्रकरणांत हस्तक्षेप करून कित्येकांचे उद्‌ध्वस्त होणारे संसार सय्यदभाईंनी सावरले आहेत. 

लहानपणापासून आईचा मला खूप धाक होता. तिची कडक शिस्त होती. काय करावं आणि काय करू नये ह्याविषयी तिचे काही आग्रह होते. मुलं बिघडू नयेत यावर तिचा कटाक्ष होता. माझं शालेय शिक्षण झालं नाही. सुरुवातीचे तीन वर्षे उर्दू शाळेत गेलो तेवढेच. ती आमच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने कामं करून घ्यायची. घरातली, बाहेरची कामं आम्हांला करायला लावायची. माणसाला वळण लावणं, व्यवहारज्ञान हे मला तिच्यामुळे लाभलं. ग्रंथाुंळे माणसं बदललेली मी खूप पाहिली आहेत. पण माझा कल व्यवहारातून माणसांना बदलण्याकडे असतो. अडचणीत मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. वैचारिक मतभेद असू शकतील, पण माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. हे गांधीवादी सत्य मला पटतं. तुम्ही कोणालाही माना - राम किंवा रहीम, पण आधी तो माणूस आहे, त्याला त्याचे अधिकार मिळालेच पाहिजेत.

तलाकचा प्रश्न असो, मुस्लिम स्त्रीला कायदेशीर संरक्षण मिळण्याचा प्रश्न असेल माझी भूमिका ही मानवी अधिकारांच्या बाजूने राहिली आहे. भारत पेन्सिल कारखान्यात मी लहान असतानाच कामाला लागलो. त्या कारखान्याचे मालक तात्यासाहेब मराठेंचा माझ्यावर फार प्रभाव आहे. मी त्यांच्या सहवासात खूप गोष्टी शिकलो. त्यांच्याकडे मोठी माणसं यायची. तुरुंगातल्या गोष्टींची चर्चा चालायची. तेव्हा मला वाटायचं की हे तुरुंगात कसे काय? यांनी चोरी केली की काय? नेकं काय करून हे तुरुंगात गेले? हे कपडे असे का घालतात? खादी वापरायचे ते. त्यांच्याकडून मी फार शिकलो. कुठे कसं वागायचं यासंबंधी मला गोष्टी शिकायला मिळाल्या. या सगळ्यातून मी थोडा थोडा घडत गेलो.

भाई वैद्य आणि बाबा आढाव यांचा संपर्क आला तेव्हा मी हिंदू-मुस्लिम ऐक्य, मानवी मूल्ये, समाजवाद, समता इ. ऐकलं आणि त्या मार्गाने चालत राहिलो. अनेक विषयावर मी त्यांच्याशी चर्चा केल्या. फक्त चर्चा करण्यावर माझा भर नव्हता. ही माणसं कोणत्या पद्धतीने काम करतात, त्यांची आयडिऑलॉजी काय आहे ह्यावर माझा कटाक्ष होता. ‘समतावादी समाजरचना’ असायला हवी या विचाराने मी पुढे जात राहिलो. माझ्या बहिणीचा तलाक झाला त्या काळात मी धार्मिक (धर्मांध म्हटलं तरी चालेल इतका कडवा) होतो. सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या धर्मग्रंथात आहेत, आपण श्रेष्ठ आहोत असे विचार माझे होते. कुराणात ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा नाहीत यापेक्षा जी छाप माझ्यावर धर्माची पडली त्यातून असं वाटायचं. बहिणीच्या ‘तलाक’नंतर मी खडबडून जागा झालो. त्या काळात मी अनेकांना भेटलो. ज्यांना ज्यांना मी आदर्श मानत होतो त्या सर्वांकडे मी गेलो. त्यांना 

मी विचारायचो की, ‘असं का झालं?’ त्यावर ते उत्तर द्यायचे की, ‘असं झालं का! ठीक आहे, तिला नंतर स्वर्ग मिळेल.’ त्यावर मी म्हणायचो की, ‘अहो, पण आता ती नरकात आहे त्याचं काय?’ त्यावर ते म्हणायचे की, ‘तु अभी बच्चे हो. तु नही समझोगे.’ बुद्धिप्रामाण्यवाद लावून धर्मग्रंथांचा विचार केला गेला पाहिजे, असं मला वाटायला लागलं आणि माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर हमीद दलवाईंच्या सहवासात आलो. मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी अनेक प्रकारच्या चळवळीत सहभागी झालो. तलाकच्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढलो. माझं हे सर्व कार्यकथन ‘दगडावरची पेरणी’ या पुस्तकात आहे. हलीमा कुरेशी नावाच्या पुणे विद्यापीठात एम.एस्सी. (द्वितीय वर्ष) करणाऱ्या मुलीने ‘दगडावरची पेरणी’ दोनदा वाचलं होतं. गेल्या महिन्यात तिचा फोन आला, की या पुस्तकात मला माझं भविष्य दिसतंय. मी मानसिकतेने या पुस्तकाच्या खूप जवळ आहे. पुस्तकाबद्दल मला तुच्याशी बोलायचंय. ती विचारत होती की, ‘कुठे भेटायला येऊ?’ त्यावर मी तिला म्हटलं की, ‘मीच तुला भेटायला येतो. मोठ्या उद्देशांच्या लढाईध्ये सगळं समान असतं.’ मग मी तिला जाऊन भेटलो. दोन तास बोलत होती ती. तिला

माझ्या बहिणीचा तलाक झाला त्या काळात मी धार्मिक (धर्मांध म्हटलं तरी चालेल इतका कडवा) होतो. सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या धर्मग्रंथात आहेत, आपण श्रेष्ठ आहोत असे विचार माझे होते. कुराणात ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा नाहीत यापेक्षा जी छाप माझ्यावर धर्माची पडली त्यातून असं वाटायचं. बहिणीच्या ‘तलाक’नंतर मी खडबडून जागा झालो. त्या काळात मी अनेकांना भेटलो. ज्यांना ज्यांना मी आदर्श मानत होतो त्या सर्वांकडे मी गेलो. त्यांना मी विचारायचो की, ‘असं का झालं?’ त्यावर ते उत्तर द्यायचे की, ‘असं झालं का! ठीक आहे, तिला नंतर स्वर्ग मिळेल.’ त्यावर मी म्हणायचो की, ‘अहो, पण आता ती नरकात आहे त्याचं काय?’ त्यावर ते म्हणायचे की, ‘तु अभी बच्चे हो. तु नही समझोगे.’ 

कलेक्टर व्हायचंय. (आता हे ‘पेरणी’तून आलं की नाही? हमीद दलवार्इंनी पेरलं ते. मी नाही! सत्तर नंतर दलवाई देशभर फिरत होते. बोलत होते.) एकेक मुद्दा घेऊन ती पुस्तकाविषयी बोलायला लागली. तुम्ही हे कसं केलं, ते कसं केलं याविषयी तिने प्रश्न विचारले. हे तुच्या कसं डोक्यात आलं? मी म्हटलं, पाण्यात पडलं की पोहोता येतं ना तसंच! तिने धर्मग्रंथाचा विषय काढला. मी तिला म्हटलं, तुझ्या कामात ते घेऊ नकोस. ते विश्व काय आहे हे समजून घेण्यासाठी वाचायचं असेल तर जरूर वाच. पण मानवी मूल्यांच्या बाबत बुद्धिवादी विचार करायला हवा, नाहीतर कुणालाच काही मिळणार नाही. धर्मग्रंथांच्या मर्यादा आहेत, तुम्हांला ते प्रश्न विचारायची परवानगीच देत नाही.

धर्म समानता मान्य करीत नाही. कुठलाच धर्म मान्य करीत नाही. तिच्या घरच्या परिस्थितीविषयी बोलताना ती म्हणाली, की वडील विचाराने तुच्यासारखे आहेत. म्हणून मी इथे आहे. तिला मी आश्वासन दिलं की, तुला ज्या अडचणी येतील (आर्थिक किंवा इतर) त्याबाबतीत मी तुझा ‘गॉडफादर’ असेल. हमीद दलवार्इंनी जी प्रबोधनाची पेरणी केली त्याची फळं आता यायला लागली आहेत. हलीमाचा ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’शी संबंध नाहीये. कोणाला ती भेटली नाहीये, पण ती बोलताना म्हणत होती की मी इथे कुठेतरी आहे असं वाटतंय. हे कुठून आलं? दलवार्इंच्या कामाची फळं आहेत ही. मी तिला भेटलो तेव्हा म्हणालो की, तुला ‘इन्फेक्शन’ होऊ नये म्हणून मी आलो आहे. ती माझी जबाबदारी आहे. सर्वांत वाईट म्हणजे वैचारिक इन्फेक्शन. अलीकडेच कोल्हापूरच्या नर्गिस नाईक या मुलीने पुस्तक वाचून मला फोन केला. ती म्हणाली, असं वाटतंय की मी कुठेतरी यात आहे. राजन खान म्हणाले होते की, तुम्ही जे लिहिलंय ना ते तुम्हांला कदाचित आता कळणार नाही पण काही दिवसांनी त्याला अंकुर येऊ लागतील. हलीमाला मी चार पुस्तकं दिली. म्हटलं ही इतरांना वाचायला दे. त्यांना काय वाटतं ते मला सांगण्याची गरज नाही...

Tags: विशेष ग्रंथ पुरस्कार मुस्लिम सत्यशोधक मंडळा हमीद दलवाई दगडावरची पेरणी हिंदू-मुस्लिम weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सय्यदभाई

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दलवाईंच्या विचाराने अर्धशतकभर कार्यरत असलेले कार्यकर्ता 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके