डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपण तर भ्रष्टाचारात सामील नाही ना?

शास्त्रीजीची आठवण सांगण्यासारखी आहे. ते पंतप्रधान असताना बँकेमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलाला नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली. तेव्हा शास्त्रीजींनी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला बजावले की, 'पंतप्रधानांचा मुलगा म्हणून त्याला वेगळी वागणूक देण्यात येऊ नये.

अलीकडे भ्रष्टाचाराबद्दल सर्वच प्रसारमाध्यमांतून इतकी चर्चा होते आहे की भ्रष्टाचार होत नसेल असे जीवनाचे एकही क्षेत्र नाही अशी आपली खात्री पटत चालली आहे. पण बहुसंख्य लोकांना असे वाटते की भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती या तशाच कुणीतरी मोठ्या पदावर असणाऱ्या असामी असतात. आपल्यासारख्या साध्या, सामान्य लोकांचा त्यात काय संबंध असणार? परंतु बारकाईने निरीक्षण केले किंवा अन्तर्मुख होऊन विचार केला तर आपल्या हातून प्रत्यही या ना त्या निमित्ताने भ्रष्टाचार घडून येत असतो असं आपल्या लक्षात येईल. कसं ते पहा, आपण जिथ कुठ नोकरी करतो तिथं पंख्यांची, फोनची सोय असते.. ती आता कार्यालयातच काय पण घराघरांतही गरजेची बाब होऊन बसली आहे. 

परंतु घरातील त्यावरची आकारणी आपणा स्वतःला करावयाची असल्याने आपण अगदी आवश्यक तेव्हाच या सुविधांचा उपयोग करतो. पण कार्यालयामध्ये तो आर्थिक जबाबदारी आपल्यावर नसते. त्यामुळे चहा पिण्यासाठी मधल्या वेळच्या बंद करायचे असतात याचे आपल्याला भान नसते. प्रत्येक गावात ठराविक दिवशी विजेची बचत करण्याकरिता काही तास किंवा दिवसभर वीज बंद ठेवण्यात येते तेव्हा आपण किती कुरकुर करतो? अशा वेळी सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊ नये का की निदान शक्य आहे तेव्हा तरी वीज वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून? सगळ्याच कार्यालयात, शाळा-महाविद्यालयांत अशा तऱ्हेची खबरदारी घेण्यात आली तर विजेची कितीतरी बचत होणार.जेवणासाठी बाहेर पडत असतानाही तिथले टयूबलाईट, पंखे नाही का? 

घरी फोन असूनसुद्धा अगदी मोठ्या पदावर असणारे अधिकारी देखील खाजगी कामासाठी ऑफिसमध्ये आपल्या टेबलावर असणाऱ्या फोनचा वापर कशासाठी करतात? सोलापूरसारख्या ठिकाणी पाण्याची नेहमीच टंचाई असते. पूर्वी पाणीपट्टी ठराविक होती किंवा घरभाड्यामध्येच पाण्याची सोय केलेली असली की लोक हवे तेवढे पाणी सर्रास वापरीत. आपल्याला बिल यायचे असले की त्याचा वापर आपण काटकसरीने करतो. या गोष्टी दिसायला साध्या दिसत असल्या तरी त्या सर्वत्रच नेहमी होत राहिल्या तर तो देखील  एक प्रकारचा भ्रष्टाचारच असतो गांधीजींच्या आश्रमात देशोदेशीची मंडळी रोज येत असत.

त्यांच्यासाठी माठ भरून ठेवलेले असत. बापू सगळ्यांना स्पष्टपणे सांगत, "प्यायचं तेवढं पाणी प्या पण अर्धा पेला पिऊन उरलेले टाकू नका. पाणी मिळावं म्हणून गावोगावी  सकाळपासून किती माणसे तासन्तास रखडत असतात त्यांची आठवण ठेवा." गांधीजींच्यासारखेच शास्त्रीजीही. आपल्या मुलाला नोकरी लावून देण्याच्या चिठ्ठ्या  मोठमोठी प्रतिष्ठित समजली जाणारी मंडळीसुद्धा संबंधित खात्याकडे पाठवीत असतात. या संदर्भात शास्त्रीजीची आठवण सांगण्यासारखी आहे. ते पंतप्रधान असताना बँकेमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलाला नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली. तेव्हा शास्त्रीजींनी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला बजावले की, 'पंतप्रधानांचा मुलगा म्हणून त्याला वेगळी वागणूक देण्यात येऊ नये. 

तो जेव्हा तुमची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होईल व आवश्यक तो कालावधी पूर्ण करेल तेव्हाच त्याला पदोन्नती द्यावी. प्रत्येक गोष्ट झटपट व्हावी असा आपला आग्रह असतो. त्यातूनच मग गैरमार्गाला वाव मिळतो. अनेक जण असे शॉर्टकट अवलंबितात- भरघोस देणगी दिली की मुलाना शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळतो. पैसे दिले की पेपर्स आधीच कळतात, पासही होता येते. आपल्याकडे आलेले पेपर्स शिपायांकडून तपासून घेणे, काम वेळेत संपविता येणे शक्य असूनही अधिक वेळ बसून ओव्हरटाइम दाखविणे, बदली होणार आहे असे कळल्याबरोबर प्रत्यक्ष हातात ऑर्डर पडेपर्यंत शक्य तितकं काम कमी करणे हाताखालच्या शिपायांना ऑफिसच्या वेळेतच घरची कामं करायला सांगणे, आऊटडेटेड औषधे विकणे, धान्य-साखर-रॉकेल यांचे भाव वाढण्याची शक्यता दिसताच अधिक पैसे देऊन त्यांचा घरात साठा करून ठेवणे ही सारी भ्रष्टाचाराचीच उदाहरणे आहेत. असंख्य लोक जेव्हा असा गैरव्यवहार करतात तेव्हा तोही भ्रष्टाचार कोटयावधीतच मोडतो.

(सौजन्य : सोलापूर आकाशवाणी)

Tags: पंतप्रधान  लालबहादूर शास्त्री गांधी भ्रष्टाचार शान्ता बुद्धिसागर PM lalabahadur Shashtri Gandhi Corruption Shanta Budhisagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके