.
एकदा एका राजाला परमेश्वर भेटला, आणि त्याने त्याला काही मिनिटांसाठी परीस दिला. लोखंडाच्या कोणत्याही वस्तुस त्याचा स्पर्श झाला की पटकन सोने होई, अशी ती शक्ती! राजाच्या दयाळूपणाबद्दल त्या बाजूला खूप प्रचार होता.
त्यालाही दयेचा उमाळा आला आणि त्याने त्याच क्षणी आपल्या राज्यातील गुन्ह्यामुळे (अथवा सूडामुळेही) कैदेत असणाऱ्या सर्व कैद्यांच्या पायातील बेड्यांना त्या परिसाचा स्पर्श केला.
कैद्यांना सुख लाभले की नाही हे ऐकिवात नाही पण राजाच्या या सुधारणेमुळे त्याची कीर्ती आणि स्तुती मात्र वाढू लागली!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या