डिजिटल अर्काईव्ह

आंतरजातीय विवाहासंबधी वर्तमानपत्रात लेख, जाहिरातो व सूचना प्रसिद्ध केल्या जातात. विवाहेच्छूचे मेळावे भरवून त्यांना एकमेकांचा परिचय करून देण्यासाठी कार्यक्रम सादर करून त्यात समाजसेवक, कार्यकर्ते व विद्वानांचे भाषण, मार्गदर्शन, शंकासमाधान वगैरे कार्यक्रम ठेवले जातात. येणाऱ्या खर्चासाठी वर्गणी, नोंदणों, प्रवेश-फी व देणगी जमा केली जाते.

समाजात आंतरजातीय विवाह व्हावे, कळावे, यासाठी खेडर्डी-ता. चिपळूण, (रत्नागिरी) येथे स्थापन झालेल्या ह्या संस्थेचे ऐंशी साली रजिस्ट्रेशन झाले. रजि. क्रमांक MAH / 311/ रत्नागिरी असा आहे. महाराष्ट्रात आणि कदाचित भारतातील ही पहिलीच विवाह संस्था असावी की जी जातिधर्मविरहित समाज निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली! अशा प्रकारचे सेवा. भावी कार्य करणारी दुसरी रजिस्टर्ड संस्था आमच्या पाहण्यात नाही.

ह्या संस्थेच्या काही प्रमुख कार्यकत्यांनी स्वत: आंतरजातीय विवाह केले आहेत. हया संस्थेची गरज किती आहे हे एका वर्षाच्या कार्यावरून दिसून येत आहे. संस्थेला एक वर्ष होण्याच्या आतच सुमारे 50 तरुण-तरुणींनी नावे नोंदविली असून त्यातील सुमारे 30 तरुण-तरुणींचे विवाह लावून देण्यात संस्थेला यश मिळाले. संस्था बाल्यावस्येत असल्यामुळे पुरेशी साधनसामुग्री संस्थेकडे नाही, त्यामुळे मोठा कार्यक्रम सादर करणे अजून शक्य झालेले नाही, परंतु कार्यकर्ते पत्रव्यवहाराने अगर समक्ष भेटून संस्थेच्या कार्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत, त्यामुळे दूरपर्यंत संस्थेच्या कार्याची माहिती पोहोचलेली आहे. तळागाळातील शोषित, उपेक्षित तरुण-तरुणी संस्थेच्या कार्याकडे आकर्षित झाले आहेत. प्रशोषित तरुणींचे विवाह जुळविण्याचे व त्यांना अन्न-वस्त्राला लावून सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्थेने केले आहे, करीत आहे.

आर्थिक अडचण लक्षात घेऊन व्यापारी व अन्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकत्यांनी मदत केली आहे. संस्था त्यांची आभारी आहे. अध्यक्ष तात्यासाहेब कोवळे हे ईको. ध्येयवादी (प्रामाणिक) कार्यकर्ते आहेत. सेक्रेटरी श्री. दत्ताराम कदम बाहेत. कायदेशीर सल्लागार म्हणून चिपळूण तालुका ई.का. अध्यक्ष अॅड्. शां. वि. बुरटे काम पहातात. हया संस्थेचे एक प्रचारक श्री. गंगाराम तानाजी कदम हे मुंबईला प्रचार कार्य करीत असून त्यांनी मुंबईतून देणगी रूपाने फारच महत्त्वाची मदत केली आहे. हा संस्थचे दिलीप बी. यलमार हे संस्थेची कराडमध्ये शाखा करण्यासंबंधी प्रयत्नशील आहेत.

अगदी तळागाळातील समाजापासून उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील तरुण-तरुणी व त्याचे पालक ह्या संस्थेला वैचारिक आधिक सहाय्य करीत आहेत. त्यामुळे आमचे जातिधर्मविरहीत नवसमाज निर्माण कारण्याचे स्वप्न 2 5-30 वर्षांत आकार घेऊ शकेल यात शंका नाही.

या ठिकाणी ह्या संस्थेवी बचारिक बैठक, ध्येय, उद्देश, नियम व कार्यपद्धती विशद करण्याचा प्रयत्न करतो.

प्राचीन काळापासून भारतात केव्हाही खरी एकात्मता नव्हती. एका विशिष्ट 'आहे रे' वर्गाने समाजावर आपले वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांच्या अज्ञानाचा उपयोग करून त्यांना जमीनदोस्त केले आहे. यातून लोकांना वर काढण्याचे प्रयत्न पुष्कळ साधु-संतांनी केले, परंतु उक्तीला कृतीची जोड नसल्यामुळे त्यांचे कार्य काळाच्या ओघात लुप्त झाले. मात्र धर्ममार्तडाच्या सत्यविरोधी व तर्कविरोधी विचारांचा प्रचार होत गेला. आम्ही भारतीय सर्व एक आहेत ही भावना आजही आमच्यात निर्माण झाली नाही आणि ही भावना जर लवकरात लवकर निर्माण होऊ शकली नाही तर भारताचे भवितव्य निश्चितच धोक्यात येईल. यासाठी जातिव्यवस्था नष्ट करून भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपण भारतीय आहोत असे सांगण्यास अभिमान वाटला पाहिजे. हे कार्य आंतरजाती-धर्मीय विवाहाने होऊ शकेल असा आमचा विश्वास आहे.

आज तरुण-तरुणींनी पुढाकार घेऊन उच्चनीचतेची शिडी मोडून टाकली पाहिजे. ज्या रूढींनी, ज्या परंपरांनी आम्हास जखडले, त्या रूढी व परंपरा कोणाच्याही (आईवडील, समाज) मर्जीसाठी किंवा दडपणाखाली जोपासू नयेत.

आज असे दिसून येते की, निरर्थक प्रतीकांची पूजा केली जात आहे. देवा-धर्माच्या नावावर अंधश्रद्धा व रूढी जोपासल्या जातात. कालबाह्य ठरलेल्या गोष्टींना उत्तेजन मिळते. एका बाजूला विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला भ्रामक समजुतींच्या जाळ्यात अटकलेला समाज दिसत आहे. अशा हपा अज्ञान अंधारात चाचपडणाऱ्या लोकानाही सहकार्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

आजच्या काळात हुंडा प्रथा फारच बोकाळली आहे. यामुळे विवाहित तरुणींना त्रास होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसते. हे हुंड्याचे भूत गाढून टाकावयाचे असेल तर तरुण-तरुणींनी आंतरजातीय विवाहास तयार व्हावे. केवळ आमच्या वाडवडिलांनी अमूक गोष्ट केली म्हणून आम्ही तेच करणे, योग्य होणार नाही. वाडवडिलांनी ज्या प्रथा सुरू केलेल्या आहेत त्या कदाचित त्याकाळी योग्य असतील; पण आज त्यांतील काही बदलाव्या लागतील.कारण-'रुढी' ह्या माणसांसाठी असतात. माणूस त्यांच्यासाठी नसतो, ज्या अयोग्य असतील त्या बदलण्याचा अधिकार माणसाला असतो व म्हणून अनिष्ट चालीरीती बदलण्यास आपण तयार बसले पाहिजे. अशावेळी तुमच्या विश्व हजारो लोक असतील, त्यांना घाबरण्याची अगर मर्जी सांभाळण्याची गरज नाही. मुलींसाठी व हरिजनांसाठी शाळा, हरिजनांना पाण्याचा हौद खुला, हे करीत असताना मानवतावादी महात्मा फुलेंना हजारो लोकांनी विरोध केला. त्यांच्या खुनाचा कट केला. सावित्रीबाई फुलेंची कुचेष्टा केली. पण त्यांनी आपले काम सोडले नाही. या गोष्टी आम्ही वाचून सोडून द्यावयाच्या का?

थोर समाजसुधारकांनी बालहत्या, बाल-विवाह, जरठकुमारी विवाह, सती जाणे, केशवपन वगैरे अनिष्ट रूढी कायद्याने बंद केल्या. लोकजागृती करून त्यांच्या आचार-विचारात बदल घडविला. पुनर्विवाह छावण्यास सुरुवात केली. परंतु काही जातींमध्ये विसावे शतक संपत आले तरी विधवांची स्थिती सुधारलेली नाही. त्यांना पुनर्विवाहाची संमती दिली जात नाही. एखाद्या स्त्रीचा नवरा मरणे म्हणजे तिच्या नशिबात सुख नाही असे समजून तिला समाजातील स्थान नाकारणे कितपत योग्य आहे? या ऐवजी आमच्या ह्या विधवा भगिनींनी पुनर्विवाह केला आणि सुखी समाधानी जीवन जगल्या तर त्यांचे सुख पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल.

आज आपण लोकशाही युगात वावरत आहोत; परंतु समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या चार गोष्टींचा उपभोग प्रत्येकाला घेऊ दिला जात नाही. यासाठी जातिभेद, धर्मभेद, भाषाभेद, वंशभेद, पंथमद व वर्गभेद विसरून एक व्हायला पाहिजे. जातिधर्माची खोटी प्रतिष्ठा, अयोग्य महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक दुर्बलता यामुळे योग्य गुण व शिक्षण असूनही तरुणांचा कोंडमारा होत आहे. लग्ने आचार विचार, कर्तत्व यांना शून्य मानून केवळ पैशापुढे मान वाकवून होतात, सोन्या-सारख्या मुलांच्या आयुष्याची माती व्हावी, ही गोष्ट आजच्या सुशिक्षित तरुणांच्या लक्षात न येणे यापेक्षा दुर्देव ते कोणते?

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' एवढी उदात्त दृष्टी संतशिरोमणी तुकारामांचे ठायी होती. भारतीय संस्कृतीचे महान सार त्यात साठविले आहे; आणि आम्ही मानव-मानवातच विषमता पाळतो. केवढा घोर अधःपात आहे हा! एक सत्य घटना आम्ही पाहिली. एक मांजरीचे पिल्लु नुकत्याच व्यालेल्या कुत्रीचे स्तनपान करण्यात दंग झाले आहे । अगदी भिन्न प्राणी एकत्र आले; मग जगातील एकच एक असलेला मानवप्राणी-भिन्नता-विषमता का मानतो? केवळ वर्चस्व टिकविण्यासाठीच ना! ही विषमता वर्चस्व-वादी माणसे जोपासतात ही वृत्तीही आपणास नष्ट करावयाची आहे.

ध्येय : जातिधर्मविरहित नव समाज निर्माण करून मानवतावादी दृष्टिकोण वाढीस लावणे.

उद्देशः (1) आंतरजाती-धर्मीय विवाहाद्वारे सामाजिक तसेच राष्ट्रीय एकता व जातिधर्मविरहीत सुसंघटित, निव्र्यसनी व एकसंघ समाज निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करणे.

( 2 ) सामाजिक अंधश्रद्धा व जातीयता नष्ट करण्यासाठी हेतुपूर्वक आंतरजातीय विवाहाचे आयोजन करून समाजात उच्च आदर्श निर्माण होण्यास प्रोत्साहन देणे.

(3) कायदेशीर विवाहासंबंधी मार्गदर्शन करणे.

(4) शोषित, अपंग व निराश्रित तरुण-तरुणींच्या विवाहास प्रोत्साहन,

(5) हुंडा निर्मूलनासाठी तरुण-तरुणींना मार्गदर्शन,

(6) आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांना विवाहासंबंधी मार्गदर्शन,

(7) समाजात आंतरजातीय विवाह-होण्यासाठी संस्कार शिबिरे योजणे.

नियम व अटी : (1) विवाह रजिस्टर्ड किंवा वैदिक पद्धतीने लावले जातील.

( 2 ) संस्थेत विवाह-जुळणी झाल्यानंतर अन्य विधीने किंवा विशिष्ट ठिकाणी विवाह-समारंभ पार पाडावयाचा असेल, त्यांना संस्था तशी परवानगी देईल,

(3) जे स्वतः विवाहाची जुळणी करून संस्थेकडे येतील त्यांचे विवाह संस्था लावून देईल.

(4) नैतिक मूल्यांचे पालन न करणाऱ्या तरुण-तरुणींच्या विवाहाचा विचार ही संस्था करणार नाही. मात्र त्यांच्यात अपेक्षित बदल घडून आल्याचे आढळून आल्यास संस्था त्यांच्या विवाहासंबंधी विचार करील.

(5) शोषित, विधवा, घटस्फोटित, अपंग व निराधित यांचे विवाह करण्यास ही संस्था प्रयत्नशील राहील.

(6) विवाहाच्या वेळी वराचे वय 2 1 वर्षे पूर्ण व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

(8) विवाहेच्छूला 'विवाह प्रवेशपत्र शुल्क' अथवा 'नामांकन शुल्क' रुपये द(8) विवाह प्रवेशपत्र (नोंदणी फॉर्म ) पूर्ण भरून दोन पासपोर्ट साईज फोटोच्या प्रतींसह कार्यालयात प्राप्त झाल्यावरच पुढील विचार करण्यात येईल.

(9) विवाह निश्चित करण्यासाठी संस्था ज्या ठिकाणी व ज्या दिवशी बोलावील त्या दिवशी व त्या ठिकाणी स्वखर्चाने तरुण-तरुणीने आपल्या जबाबदार व्यक्तीसह हजर राहिले पाहिजे.

(10) विवाहाच्या वेळी संस्थेला यथा-शक्ती देणगी देणे वधू-वरांचे नैतिक कर्तव्य राहील.

(11) तरुणांनी हुंडा न घेता कोण-त्याही जाती-धर्मातील तरुणी बरोबर विवाह करून हुंडा पद्धतीला तीव्र निषेध करण्याचा प्रचार व प्रसार करण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे.

(12 ) स्पेशाल केस म्हणून काही सजातीय विवाह लावले जातील मात्र विवाह-जुळणी करण्यासाठी मदत केली जाणार नाही.हा मात्र भरावे लागतील.

कार्यपद्धती : ही संस्था रजिस्टर्ड आहे. संस्था अधिनियमानुसार संस्थेचे कामकाज चालते. अंधश्रद्धा, अयोग्य रूढी व परंपरा दूर करणे हे संस्थेचे प्रमुख उद्देश असल्यामुळे या संस्थेचा प्रत्येक सदस्य व पदाधिकारी त्या दृष्टीने प्रयत्नशील असतो. संस्थेचे सर्व पदाधिकारी विनावेतन सेवाकार्य करतात.

आंतरजातीय विवाहासंबधी वर्तमानपत्रात लेख, जाहिरातो व सूचना प्रसिद्ध केल्या जातात. विवाहेच्छूचे मेळावे भरवून त्यांना एकमेकांचा परिचय करून देण्यासाठी कार्यक्रम सादर करून त्यात समाजसेवक, कार्यकर्ते व विद्वानांचे भाषण, मार्गदर्शन, शंकासमाधान वगैरे कार्यक्रम ठेवले जातात. येणाऱ्या खर्चासाठी वर्गणी, नोंदणों, प्रवेश-फी व देणगी जमा केली जाते.

सुरवातीला तरुण-तरुणी किंवा पालक यांच्याकडून नावनोंदणीसंबंधी पत्र येताच विवाह प्रवेशपत्र व माहिती पत्रक पाठविले जाते. त्यांच्याकडून विवाह प्रवेशपत्र शुल्क रुपये दहा मात्र व पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रतींसह विवाह नोंदणी फॉर्म पूर्ण भरून आल्यावर रजिस्टरवर नाव नोंदविले जाते. नंतर योग्य तरुण-तरुणींची माहिती व फोटो पाठविले जातात. परस्परांना दाखविण्याचे कार्यक्रम होतात; आणि त्यांच्या संमतीनेच विवाह निश्चित होतात. हुंडा न घेता विवाह लावले जातात. वैदिक पद्धतीने होणाऱ्या विवाहासाठी पुरोहित नेमण्यात आलेले असून त्यांना फक्त 10 2 . विवाह-दक्षिणा दिली जाते. विधीमधील कायदेशीर भाग करवून घेऊन अनावश्यक विधी टाळला जातो. रजिस्टर्ड विवाहासाठी रजिस्ट्रारला आणण्याची व्यवस्थाnकेली जाते. विवाहानंतर विवाहाचा दाखला दिला जातो. विवाहाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते. विवाहित जोडप्यांपैकी एक दलित व दुसरा सवर्ण असेल तर शासनाच्या 2 000 रु. अनुदानाची माहिती देऊन फॉर्म मरून घेऊन पाठवले जातात. अनुदान मिळवून देण्यास मदत केली जाते. विवाहितांचा संस्थेच्या वार्षिक समारंभात सत्कार केला जातो.

Tags: समता आंतरजातीय विवाह संस्था संस्थेची ओळख Inter Caste Marriage Organisation #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Arun sudam patil- 19 Feb 2026

    Sir me intercaste maride sathi tayar aahe

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी