डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कृत्रिम पाऊस : निसर्गशक्तींना विज्ञानाची हाक

कृत्रिम पावसाविषयी थोडी वैज्ञानिक माहिती

वातावरणातील नत्रवायू 78 टक्के आणि प्राणवायू 21 टक्के, या दोन्ही वायूंची अभिक्रिया, प्रचंड उष्णता शोषून घेते. ही अभिक्रिया कृत्रिमरीत्या वातावरणात घडवून आणून पाऊस पाडता येतो.

प्राचीन काळापासून ही अभिक्रिया माहीत असावी, असे अनुमान काढता येते. ऋग्वेदा-तील मंडळ 10 सूक्त 86 असे दाखविते की, वृषकपी नावाचे एक यंत्र ढगात सोडून कृत्रिम पाऊस पाडण्यात वैज्ञानिक ऋषींनी यश मिळविले होते. ह्या यंत्रामधून तांबडे आणि पिवळे फवारे सोडून हवेतील अज्ञात घटक उच्च तपमानावर एकमेकांशी संयुक्त करण्यात आले. अग्निबाण सोडून, यज्ञ करून, पाऊस पाडला गेला अशाही दंतकथा आहेत. त्यांचेही या दृष्टीने परिशीलन व्हावयास हवे. 

1794 साली ‘हेटॉन’ या शास्त्रज्ञाने अशा प्रकारचे एक तत्व मांडून निर्सगाची पाऊस पडण्याची क्रिया काय असावी ह्याचा खुलासा केला आहे. त्याने मांडलेल्या तस्वा- प्रमाणे हवेतील दोन घटक उच्च तपमानावर एकमेकांबरोबर संघटित होऊनच पाऊस पडतो.

त्यानंतर 1906 साली ग्लास्टोन या शास्त्रज्ञाने त्याची अभिक्रिया मांडली:-

नत्रवायू + प्राणवायू

2000 या उच्च तपमानाची विजेमुळे निर्मिती = नायट्रिक

ऑक्साईड - 43200 कॅलरी. ( उष्णता शोषून घेणारी अभिक्रिया)

वातावरणामध्ये नत्रवायू (78 टक्के) आणि प्राणवायू (21 टक्के) हे दोन्ही वायू मोठया प्रमाणात उपस्थित आहेत. गडगडाट होऊन वीज चमकल्यामूळे उच्च तपमान निर्माण होऊन ह्या दोन वायूंची उष्णता शोषून घेणारी अभिक्रिया होते. 43200 कॅलरी एवढी प्रचंड उष्णता आजूबाजूच्या ढगांमधून काढून घेतली गेल्यामुळे ढगातील वाफेचे पाण्यामध्ये किंवा गारांमध्ये रूपांतर होत असावे.

ह्याचा प्रत्यय विशेषत: उन्हाळ्यात गडगडाट होऊन विजा चमकल्यानंतर गारांचा पाऊस होताना आपल्याला येतो. याच तत्त्वाला पूरक असा एक संदर्भ आपल्याला ‘आर्टिफीशिअल स्टिम्युलेशन ऑफ रेन’ या पुस्तकात (थंडरस्टॉर्म चार्ज जनरेशन) मिळतो. त्यामध्ये त्यांनी प्रचंड गडगडाटाने निर्माण होणाऱ्या विजांमुळे ढगांमध्ये बर्फाचे स्फटिक तयार होतात असा उल्लेख केला आहे.

वरील सूत्र आणि सेडिंगचे तत्त्व, यांचा उपयोग करुन म्हणजेच कडेन्सेशन आणि  न्यूक्लियाझेशन ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी ढगांमध्ये घडवून आणल्यास कृत्रिम पाऊस पाडणे शक्य होते.

Tags: कृत्रिम पाउस तंत्रज्ञान विज्ञान Artificial Rain rain Science #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके