डिजिटल अर्काईव्ह

अखिल भारताचा मराठवाडा अशक्य’ ‘आम्ही प्रेमाला पारखे झालो- वृद्धांची अवहेलना- प्रेक्षकांची निराशा’ ही लिहिणाऱ्या मुलांना खरं तर काही गंभीर गोष्टी सांगायच्या असतील असंच दिसतं. मराठवाड्यासारखे वारंवार तंग असणारे वातावरण अखिल भारतात होणार नाही अशी आशा तर तो करीत नसेल? किंवा वृद्ध प्रेमाला पारखे झाले तर?

बाल आनंद महोत्सवाच्या फेरफटक्यात एका कोपऱ्यातल्या तंबूच्या दाराबर ही पाटी दिसली. टेन्ट ऑफ नॉनसेन्स आणि त्याखाली बाहेरूनच वाचता येईल अशी एक ‘ठळक’ सूचना- ‘यहाँ सिर्फ पागल आ सकते हैं!’ बुचकळ्यात पडलो, काय करावं? आणि खरोखर बघितलं तर तंबूच्या आत चिकटवलेल्या कागदावरला मजकूर वाचून आत गेलेला प्रत्येकजण ‘पागल’सारखा हसतच बाहेर येत होता!

तिथल्या स्वयंसेविकेला विचारलं, ‘पागल नसणाऱ्यांनी आत आलं तर चालतं ना?’ तिने उलटा प्रश्न केला, म्हणजे तुमच्याच बाबतीत विचारताय ना? तुम्हाला कोण नाही म्हणणार? ती मला काय समजली माहीत नाही पण मी तंबूत शिरलो. आतमध्ये वर्तमानपत्रातले वेगवेगळे मथळे कापून एकत्र चिटकविले होते. त्यातून त्या शब्दांना वेगळाच अर्थ मिळत होता! हे नॉनसेन्स तर! उदाहरणच घ्यायचं तर ‘रोजगार हमी योजनेवर’ हा एक अर्धा मथळा आधी चिकटवून त्यापुढे ‘अनुभवी खेळाडू हवेत’ असं चिकटवीलेले. अशीच काटछाट आणि चिकवाचिकटवी करून झालेले काही नमुने- ‘अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा पुरावा- नगरजवळ दुर्योधनाचे मंदिर सापडले’, 'मोपले अमिताभला भेटले आणि त्यांचा थरकाप उडाला’ ‘ट्रक उलटून- पंतप्रधानांचा दौरा सुखरूप’ 

असे विनोदी मथळे वाचत, हसतच पुढे जात असता ह्याच प्रकारच्या काही मथळ्यांनी मात्र विचार करायला लावला- ‘अखिल भारताचा मराठवाडा अशक्य’ ‘आम्ही प्रेमाला पारखे झालो- वृद्धांची अवहेलना- प्रेक्षकांची निराशा’ ही लिहिणाऱ्या मुलांना खरं तर काही गंभीर गोष्टी सांगायच्या असतील असंच दिसतं. मराठवाड्यासारखे वारंवार तंग असणारे वातावरण अखिल भारतात होणार नाही अशी आशा तर तो करीत नसेल? किंवा वृद्ध प्रेमाला पारखे झाले तर? दुसरा प्रकार पहायला मिळाला तो जाहिरातींचा, ‘आपके दातों को पिला बनाने के लिए विनमाका टूटपेश’ किंवा ‘टॅंक छाप छत्री वापरा- एका आयुष्याची गॅरन्टी. सूचना- छत्री ऊन, पाऊस, वारा वादळ असताना वापरू नये हिवा’ किंवा ‘स्टेट बँक- ताजी ऑफर पंधराशे द्या आणि लगेच पाचशे घ्या!’  तिसरा प्रकार म्हणजे असबद्ध बातम्या गोष्टी! ‘मुंग्यांच्या सभेत चार माणसे चिरडून ठार!’ संदीप शहाची एक छोटी गोष्ट: रेल्वे फाटक नसलेल्या जागी बैलगाडीची इंजिनाला धडक! इंजिनाचा चेंदामेंदा! गाडीवान फरारी- बैलांना अटक!’

इंदोरच्या वीना या आठ वर्षांच्या मुलीने स्वतःच प्रश्न करून स्वतःच दिलेलं उत्तर: ‘मुर्गी अंडेपर क्यों बैठती है?’ ‘क्योंकि उसके पास कुर्सी नहीं!’ अजून एका बातमीनेही गंमत आणली, ‘चोरांच्या समेलनात फुलनदेवीची पर्स गेली!’ आणखी एक प्रकार चित्रांना सजवायचा. एक मुलगी सतीचं चित्र काढत होती. भोवताली माणसं जमलेली दाखवली. वर हेडिंग चिकटवल ‘पोलिसांच्या उपस्थितीत स्त्रीवर अत्याचार रोज 3 खेळ...’ ओ हो! नॉनसेन्स! गांभीर्य माझ्यावर! तिच्यापलीकडे एक मुलगा 10-12 वर्षांचा कागदावर फोटो कापून चिटकावत होता. मधोमध एक पुरुष आणि भोवताली 9 बायका. बराच वेळ तो अजून फोटो धुंडाळत होता, पण बहुधा सापडले नाहीत, मग त्याने त्या कागदावर लिहिले ‘अजून 3 बायका हव्या, म्हणजे एक डझन बायकांचा नवरा होईल!’ दुसऱ्या एका ठिकाणी चहा-बिस्किट खाणाऱ्या अमिताभच्या फोटोसाली लिहिलेलं: ‘खाऊन पिऊन उपाशी!’

आणखी एक प्रकार म्हणजे शब्दांशी खेळ! शब्द अक्षर, काना, वेलांटी, बदलणे गाळणे. एकाने ‘दै. लोकमत’चे ‘दें. जोकमत’ केले, तर ‘संभाजी प्रभाकर खाडे’ ह्या पहिले पहिले व दुसरे अक्षर सोडून ‘भाजी भाकरी खा’- अशी आज्ञा केली!  हे सर्व पहाताना गंमत वाटली, हसू आलं पण ह्यात विकृती आहे असं वाटत होतं. विनय नावाच्या एका स्वयंसेवकाशी बोललो. विचारलं, ‘ह्यात तुम्ही मुलांना मुद्दाम विकृतीतून गंमत करायला का शिकवताय?’ त्याचं उत्तर मला आवडलं. तो म्हणाला, ‘माणसाच्या मनात कुठंतरी डिस्ट्रक्टिव्ह विकृत विचार असतातच ना? ते दडपण्यापेक्षा वाट करून देणे अधिक चांगलं! होळीची बोंबाबोंब त्यासाठीच ना? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकृती म्हणजे काय हे समजलं तर माणसाला प्रकृती, सेन्स हेही समजेल! वेड्याला आपण वेडाचार करतोय हे समजत नाही. त्याला शहाणपणा म्हणजे काय हेच माहिती नाही, पण सर्वसाधारण माणसाला विकृती कळाली की त्याला शहाणपणा समजून येतो!’

‘तुमच्या टेन्टला मुलांचा प्रतिसाद कसा आहे?’ 
‘इथ थोडी मोठ्या वयाची म्हणजे 10 वर्षांवरची मुलंमुली येतात. खरं तर यासाठीच हा विभाग! थोडीशी बौद्धिक करामत, शोधून पहाण्याची दृष्टी शब्दांची मांडणी आणि सजावट मुलं इथे शिकतात!’ 
मी मान डोलावली. आहे बुवा! म्हणत बाहेर पडलो. हसत, खिदळत. नवी मुले घोळक्याने आत जाताच होती. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी