मानवी संसाराला उन्नत करणान्या मूल्याकित तत्त्वज्ञानाचा जन्म निसर्ग सहवासातच झाला. निसर्ग हे एक ज्ञानपीठ असून तेथील प्रत्येक पानावर मानवी मूल्ये कोरली आहेत. मानवी व्यवस्थेला पूर्णत्व साध्य करून देणारी निसर्ग सृष्टी ही जीवनगाथा होय!
निसर्ग आणि मानव हे निर्मितीचे दोन प्रमुख टप्पे, त्यांचे संबंध फार निकटचे आहेत, हे साधारण निरीक्षणाने ही बनुभवास यावे. एकवार निसर्ग एकट्याने जगू शकेल, परंतु मानवी सृष्टीला निसर्गाचे वरदान मिळाल्यामुळेच मानवी अस्तित्व स्थायी आहे. मानवि संसाराचा प्रत्येक अवसर हा निसर्गाच्या तालबद्ध यंत्रणेवर निर्भर आहे. निसर्ग है निर्मितीचे पूर्व पर्व, तसेच महान योगदानही! निसर्गाची यंत्रणा स्वयंनियंत्रित असून त्याचा प्रत्येक घटक सतत कार्यान्वित असतो, जणू काही समस्त जीवसृष्टीला फुलवण्यासाठीच निसर्गाची निर्मिती झाली आहे. निसर्ग ही संपूर्णतः मानवी विश्वाला अगाधता व सधनता प्राप्त करून देणारी संजीवनीच होय, अथवा प्रचंड शक्ती होय.
निसर्गाची वाटचाल नियमित, अखंड आहे. त्यामुळेच मानवी संकल्पांना ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या त्या निसर्गच पुरवीत असतो. त्या मात्र मानव निर्माण करू शकत नाही. निर्मितीचे आधिपत्य निसर्गाकडेच असून त्याची उपयोगिता मात्र मानवासाठीच आहे.
ऋतूंचे बदलते प्रहर सृष्टीला नवे रंग-रूप देतात. नियमितपणे आषाड येतो, बरसून जातो, सृष्टीचा कायापालट होतो. पक्ष्यांनी टाकलेली बीजे जीव धरतात, पालवतात, फुलारतात आणि बहरतात. धनधान्य समृद्धीने मानवी संसार तृप्त होती. निसर्गाच्या या कार्यक्रमणाला कधीच खंड पडला नाही, तसाच कासक्रमणाचा अखंडित प्रवाह कधीच संपुष्टात आला नाही. नाही तर मानवी सृष्टीची काय अवदशा झाली असती कोण जाणे ।
सर्वांगीण संपन्नता निसर्गाजवळ आहे. समुद्रांनी मीठी दिले नसते तर, पहाडांनी हिरे जोपासले नसते तर, खंदकांनी सुवर्ण जपले नसते तर, मानवी सौंदर्याला अलंकृत कुणी केले असते? सुवर्ण, हिरे याणि मोती निर्माण करण्याची क्षमता मानवाला अजूनही मिळालेली नाही।
कशासाठी सूर्य रोज पूर्वेची कवाडे उघडून केशरी प्रभा शिंपीत येतो? प्राणिमात्राला सुखवण्यासाठी. सूर्य परतल्यानंतर कशास चंद्र नभांगणात प्रविष्ट होतो? गडद अंधारात मानवांनी हतबल होऊ नये म्हणून. पहाडीच्या उतरणीवर वृक्ष डेरेदार छावणी घालतात, कशासाठी? जलमारांनी वाकलेल्या मेघांना विसावा देण्यासाठी, पण हे सारे कशासाठी? मानवाचे सुकले ओठ भिजवण्यासाठी. कशाला उन्हे पिऊन बान जोपासतात मोहर? केवळ कोकिळेच्या स्वागतासाठी नसून मानवाचे जीवन रसपूर्ण करण्यासाठी.
एवढी जर तटस्थ, चिरेबंदी व सुसज्ज यंत्रणा माणसाच्या मागे युगे युगे उभी आहे, तर मग मानवी विकासाचे पाऊल संपूर्ण समृद्धीच्या पारावर का पोहोचत नाही, हा विचार सहजच कुणाच्याही मनात येईल. निसर्गाची एवढी जबरदस्त कार्यक्षमता असताना, मानवाला दुर्दिम अवस्थेचे स्मरणदेखील व्हायला नको. परंतु मानवी व्यवस्थेला पदोपदी खंड पडलेले दिसतात. पूर्णत्वाची क्षितिजे जवळ येण्याऐवजी दुरावत आहेत. याचे मुख्य कारण मानवाने निसर्गाशी जवळीक साधलेली नाही. मानवी बुद्धीचा उपयोग निसर्गावर मात करण्यात होत आहे. भौतिक शास्त्राचे थोडे बहुत ज्ञान प्राप्त झाल्यावर माणसांच्या निसर्गोपासक प्रवृत्तीला तडे बसत गेले. निसर्गाच्या उपकाराचे तसूभरही भान राहिले नाही. थोडक्यात शास्त्रीय प्रमाद याडत गेला व निसर्गाची जवळीक नष्ट झाली. मानवाची शोधक दृष्टी प्रशंसनीय आहे. परंतु अकारण निसर्गावर प्रहार करण्याची आक्रमक प्रवृत्ती घातक आहे. निसर्गाची अंतस्थ घडण विस्कळित करणे म्हणजेच विनाशाला अथवा प्रलयाला आमंत्रण देण्यासारखेच आहे.
निसर्ग एक शास्त्रीय रचना आहे. त्यात बिघाड झाला तर त्याचे अंतिम परिणाम मानवी सृष्टोलाही भोगावे लागतील.
म्हणून निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते ठेवणे हे मानवाचे माथ कर्तब्य ठरते. विज्ञानाने वास्तविक निसर्गाचे बळ शोधायला पाहिजे, त्याला उद्ध्वस्त करायला नको. निसर्गाला आपण अपायला हवे. निसर्ग मानवाच्या गुरुस्थानी आहे. निसर्गाची उत्पत्ती मानवी विकासासाठीच आहे. निसर्गपवस्येवर आपण जर उगाचच हात उगारला तर क्षुब्ध समुद्र खबळेल, पहाट पेटून निघतील, जमीन उसवू लागेल व मानवी सृष्टीचा निःपात होईल असे भय बाळगण्याला जागा आहे.
मानवी संसाराला उन्नत करणान्या मूल्याकित तत्त्वज्ञानाचा जन्म निसर्ग सहवासातच झाला. निसर्ग हे एक ज्ञानपीठ असून तेथील प्रत्येक पानावर मानवी मूल्ये कोरली आहेत. मानवी व्यवस्थेला पूर्णत्व साध्य करून देणारी निसर्ग सृष्टी ही जीवनगाथा होय!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या