डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

(जातीय दंगली पाहून एक प्रतिक्रिया)

सावट, परकेपणाचं 
व्देषाचं 
अविश्वासाचं.
पातं धारदार
कापतं आरपार
स्नेहधागे,शेजारधर्म.
झेंडेच प्रबळ माणसांपेक्षा.
घोषणाच खऱ्या
विवेक खोटा,
शौर्य एकच :
प्रतिस्पर्ध्यांवर मात
कशीही, केव्हाही.
जरब हवीच नाहीतरी
शत्रूला आपल्या,
पहाता पहाता
वैरी झाले
आपलेच लोक,
जगण्याची मूळ
सेळ झाली.
लहान माणसं
लुबाडली, नागवली.
साव सापडले
तावडीत चोरांच्या,
निदेयाचं शस्त्र
दुबळ्याच्या छातीत
कायद्याचा रक्षकही
भित्याच्याच मागं.
नको घोर मुळीच :
राष्ट्र प्रगतिपथावर
नेते सत्तेवर
परिस्थिती काबूत
समाजकंटक कैदेत
एकविसावं शतक
हाकेच्या अंतरावर!
महात्माच्या हत्येला
झाली किती वर्ष?
होऊन गेलाच का तो खरोखर
कधी काळी या देशात?

Tags: औरंगाबाद श्रीकांत तांबे जातीय दंगली सावट Aurangabad Shrikant Tambe Ethnic riots Sawat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके