डिजिटल अर्काईव्ह

.

आम्ही उंच उंच चढण चढत होतो

वाटेत गौतमबुद्धाने सांगितलेले लोक होते!

शिवाय त्याने न सांगितलेले किती तरी होते!

आम्ही त्यांच्याकडे पाहिले त्यांनीही पाहिले

मग आम्ही सरळ चढण चढू लागलो

मध्येच आम्हांला उंच उंच बंगले दिसु लागले

आणि चंद्रमौळी सुरेख झोपड्या दिसल्या

अगदी खुलून दिसणाऱ्या गांधी म्हणत तसल्या!

पण शिवाय एक मोर्चाही दिसला!

बिचाऱ्या मार्क्सच्या तोंडाला फेस आलेला!

आम्ही चक्क पाहिले: हसलो : पुन्हा चढू लागलो

तर क्रूसावरचा खिस्त किंचाळला!

गांधींनी हात हालविले नकारात्मक!

आम्ही चढण चढत राहिलो

अगदी संपेपर्यंत!

आम्ही चढणीच्या वर चढण चढून आलो

आम्हांला समजले चढता येते शिवाय उतरताही!

पण नकारात्मक हात दिसले तर चालत राहावे.....

या चढणीत मेले असतील ख्रिस्त बुद्ध गांधी

आम्ही नाही ते जे होते ते!

आम्ही चढण चढणार उतरणार!

आम्हांला कोण अडवणार!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके