डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजचा धार्मिक उन्माद हा या संधिवंचितांना लाभलेल्या संधी हिरावून घेण्याचाच कट आहे; निधर्मीच नव्हे तर कल्याणकारी-समाजवादी लोकशाही व ती देणारी राज्यघटनाच नष्ट करण्याचा कट आहे हे विसरून कसे चालेल? ज्यांनी ज्यांनी 'सनातनी', 'प्रस्थापित सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्थे-विरुद्ध विद्रोहाचे निशाण उभारले, त्या त्या साऱ्यांचाच नायनाट करण्यासाठी आजचा धार्मिक उन्माद जन्माला आलेला आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाचे राजन खान यांचे 1 मार्चच्या अंकातील भाषण वाचले. त्यांच्या भाषणातील अनेक गृहीते व विधाने यांच्या अनुषंगाने काही गोष्टींचे स्मरण करून देणे आजच्या संदर्भात अगत्याचे असल्याने त्या भाषणाच्या अनुषंगाने काही गोष्टी येथे मांडतो आहे.

राजन खान यांची वक्तव्ये ही बरीचशी इच्छाचिंतन, बरीचशी विधानबांजी, बरीचशी चुकीच्या गृहीतांवर आधारलेली, बरीचशी अगोदर होऊन गेलेल्या वाड्मयीन  चळवळींची पुरेशी माहिती नसण्यातून उद्भवलेली आणि चिंतन, विश्लेषणाऐवजी, त्यांतल्या सखोलते ऐवजी निराश करणाच्या वास्तवावरच अधिक बेतलेली, विविध साहित्य प्रवाहातून मराठीला लाभलेले 'विद्रोही' दळ, वेगवेगळे अस्तित्व बघण्याचे नाकारणारी अशीच अधिक झालेली आहेत.

'विद्रोही' साहित्य संमेलनाचे ते भाषण वाटण्याऐवजी 'समरसता' साहित्य संमेलनातून होणाऱ्या भाषणांसारखे ते भोंगळ झालेले आहे. विद्रोहाची, विद्रोही साहित्याची, विद्रोही चळवळीची आणि 'विद्रोही हे मूल्य  म्हणून स्वीकारण्याधी गरज, परिस्थिती, त्याचा मागोवा आणि त्याची वाङ्मयीन परिणती यांचा राजन खान यांच्या 'साधने 'तून प्रकाशित या वृत्तांतात कोणताच मागमूसही नाही.

विद्रोही साहित्य संमेलन ज्या 'विद्रोह' या मूल्याचे साहित्यात प्रतिनिधित्व करते त्या विद्रोहाची चर्चा, मीमांसा, कारणपरंपरा सारेच करण्याचे टाळून, विद्रोह कशाविरुद्ध, कोणाचा, कोणी अभिव्यक्त केलेला, का? या 'विद्रोह' मूल्याची वाङ्मय क्षेत्रात सद्य:स्थिती काय? पुढे या मूल्याची वाङ्मयीन मूल्य म्हणून गरज का व कशी?  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय वक्तव्याचा वृत्तांत 'साक्षेपी कसा काय ठरू शकतो? या संपूर्ण वृत्तांतात'विद्रोही' हे तत्त्वच पूर्णपणे अनुपस्थित आहे. नव्हे, 'विद्रोही" असण्याची गरजच संपुष्टात आणणारे अंतःसूत्र या वक्तव्यांमध्ये दडलेले आहे. 'विद्रोह 'त्या' व्यवस्थेविरुद्ध, 'त्या' व्यवस्येने जन्माला घातलेल्या साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, वाङ्मयीन मूल्ये यांविरुद्ध 'विद्रोह' शोषणाविरुद्ध असमानतेविरुद्ध, भेदाभेदांविरुद्ध, विद्रोह' हा अशा व्यवस्था टिकवण्याच्य सर्वंकष  प्रयत्नाविरुद्ध,  ते  प्रयत्न सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय अशा साऱ्याच स्तरांवरचे असल्याने त्या साऱ्याच स्तरांवर समग्र विद्रोह हे विद्रोहाचे सूत्र व्यवस्था परिवर्तनाचे शास्त्र आहे याचे कोणतेच भान या राजन खान यांच्या 'साक्षेपी' वृत्तांतातून व्यक्त होत नाही. 

साहित्यातील 'विद्रोही' सुराला व ते सूर व्यक्त करणाऱ्या  संमेलनांना त्यामुळे मुळात उद्दिष्ट असायला हवे ते. साहित्य ज्या समाजातून येते. त्या समाजाच्या ईप्सित दिशेने परियर्तनाचे. परिवर्तन साधायचे तर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांच्या, ज्याला राजन खान कप्पे म्हणतात, त्यांच्या 'अस्मिता' फुलवणे, जागवणे, त्यांना "अभिव्यक्त' व्हायला  हवे आणि त्यांच्याच पद्धतीने व्हायला हवे, हे अमान्य करून कसे चालेल?

तालुका, जिल्हा किंवा विभागीय पातळीवरील साहित्य संमेलने ही अशा 'विद्रोही साहित्याची संमेलने ठरू शकत नाहीत, हे मी अनुभवाने सांगतो आहे. जिल्हा साहित्य संमेलनाची मोठी चळवळ राजन खान, आणि मी स्वतः 1978  ते पुढे अनेक वर्षे चालवली आहे. डॉ.द.भि.कुळकर्णी, ना.ग.मोरे, डॉ.यशवंत मनोहरांसारखे त्या संमेलनाचे त्या काळी अध्यक्ष मी केलेले आहेत. त्यांची छापील भाषणेही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात त्याला मोठे समर्थनही त्या काळी लाभले.

व्यवस्था परिवर्तनाचा लढा  लढण्यासाठी साहित्य', साहित्य संमेलने हे "माध्यम म्हणून वापरणे वेगळे आणि साहित्याबद्दल निर्मिती म्हणून, प्रक्रिया म्हणून बघणे वेगळे, व्यवस्था परिवर्तनाचा लढा करण्यासाठी प्रस्थापित साहित्य संमेलने पुरेशी असती तर वेगळ्या "विद्रोही साहित्य संमेलमांच्या आयोजनाची गरजच का भासली असती? त्यामुळे विद्रोही थे विद्रोहीत्व बोथट करण्याची काहीच गरज नाही. ती संमेलने समाजात 'कप्पे' निर्माण करीत नाहीत. त्या त्या कप्प्यांधी ती केवळ सामाजिक, सांस्कृतिक गरज आहे या दृष्टीने त्यांकडे बघितले पाहिजे. अशा वेगवेगळ्या कप्प्यांना' बंदिस्ततेतून, सामाजिक-सांस्कृतिक तुरुंगातून या देशाने अंगीकारिलेल्या केवळ निधर्मी लोक शाहीच  नव्हे तर लोकशाही समाजवादी राज्यघटनेने व प्रजासत्ताकानेच प्रथम संधी निर्माण करून दिली. हे नाकारून कसे चालेल? आणि आजचा धार्मिक उन्माद हा संधिवंचितांना लाभलेल्या संधी हिरावून घेण्याचाच कट आहे. निधीच नव्हे तर कल्याणकारी-समाजवादी लोकशाही व ती देणारी राज्यघटनाथ नष्ट करण्याचा कट आहे हे विसरून कसे चालेलं?  ज्यांनी ज्यांनी 'सनातनी', 'प्रस्थापित' सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्थेविरुद्ध विद्रोहाचे निशाण उभारले त्या त्या सान्यांचाच नायनाट करण्यासाठी आजचा धार्मिक उन्माद जन्माला आलेला आहे. तो येथील उच्च  जाती आणि भांइवली  शक्ती यांनी संयुक्तपणे हातात हात घालून अनिवासी भारतीयांच्या आधाराने बळकट केला आहे. हे विसरून कसे चालेल? 

या साऱ्या वास्तवाकडे 'विद्रोही' साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे राजन खान दुर्लक्ष करून 'विद्रोही' साहित्य संमेलनाचे भाषण कसे काय करू शकतात? या समाजातील जे 'कप्पे' आज विद्रोह' करते झाले आहेस. त्यामुळे जी व्यवस्था कोसळणार असेस ती जर कोसळायलाच हवी असेल, आणि ती तशी कोसळणे म्हणजेच  जर परिवर्तनाची पूर्वतयारी असेल तर विद्रोहाचे उद्दिष्टय पूर्ण होणे संभवते. त्यामुळे हे 'कप्पे' मराठी समाजाला कुठे घेऊन जाणार आहेत, असा प्रश्न 'विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कसा काय  पडू शकतो?

आपला 'कप्पा' म्हणजे जग नव्हे हे  जेवढे  बरोबर आहे तेवढेच कप्पेबंद' व्यवस्थेत प्रत्येक 'कप्पा' हेच स्वतंत्र सामाजिक-सांस्कृतिक जीवन असते; आणि त्या-त्या कप्प्यांमधूनच जागृती- अभिव्यक्ती आल्याशिवाय तिचा आत्मविश्वास जगवला, वाढवल्याशिवाय त्या कप्प्यांमधील बंदिस्त, अवांछित जीवन वांछित दिशेने प्रवाहित कसे होणार? त्याशिवाय ते 'कप्पे' नाहीसे कसे होणार?

'विद्रोही साहित्य संमेलनाचे मुळात उहिष्ट साहित्यच केवळ सुंदर करण्याचे नसून समाजजीवन, हे जग सुंदर करण्याचे आहे. अशावेळी हे 'कप्पे' समृद्ध करायचे की एकदम वैश्विक दर्जाच्या साहित्य निर्मितीची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करायची याचा अग्रक्रम ठरणे आवश्यक आहे. तो ठरत नसेल तेव्हा जसा राजन खान यांचा झाला तसा वैचारिक गोंधळ निर्माण होतो.

विद्रोही साहित्य संमेलन हे ज्या  विद्रोही साहित्याची अपेक्षा करते, साहित्य हे मुळात साहित्यशास्त्रीय घटना नसून ती समाजशास्त्रीय घटना असल्याने त्या घटनेकडे बघण्याची पद्धत अगोदर निक्षित करायला हवी. अन्यथा राजन खान यांच्याप्रमाणे सनातनी साहित्य आणि विद्रोही साहित्य दोहोंकडे एकाच भोंगळ दृष्टीने आपण बघत राहू. तसेच होऊ नये.

Tags: डॉ. यशवंत मनोहर डॉ. द. भि. कुलकर्णी राजन खान विद्रोही साहित्य संमेलन डॉ. श्रीपाद भालंचंद्र जोशी Dr. Yeshwan Mnohar Dr. D.B. Kulkarni Vidrohi Saahity Samelan Rajan  Khan Dr. Shripaad Bhalchandra Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्रीपाद भालचंद्र जोशी,  धरमपेठ, नागपूर

लेखक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त. प्रगतीशील लेखक संघाचे (महाराष्ट्र राज्य) माजी कार्याध्यक्ष आणि विदर्भ साहित्य संघाचे माजी उपाध्यक्ष. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष. 'वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र?' हे पुस्तक प्रकाशित. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके