डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भंडाऱ्याचे डॉ. गो. य. जोशी यांच्या दुःखद निधनाची वार्ता साधनेने यापूर्वीच दिली होती. या लेखात त्यांच्या ध्येयधुंद आणि कार्यमग्न जीवनाचा परिचय त्यांच्या कन्या डॉ. सुधा जोशी करून देत आहेत.

'ज्याला मृत्यू म्हणतात तो तर प्रेमळ मित्र आहे, ईश्वरी विभूती आहे.' माझ्या वडिलांच्या सुहृदांनी सांत्वनपर लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर वारंवार नानांच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देत होता. नानांनी, जगावं कसं आणि मरावं कसं याचा एक आदर्शच आमच्या डोळ्यांसमोर ठेवला. गीतेतील कर्मयोग्याचे जीवन ते जगले. ईशावास्योपनिषदातील पहिल्या श्लोकाचा त्यांनी स्वतःला कधीही विसर पडू दिला नाही. 

ऐन तरुणपणातच कुष्ठकार्याला त्यांनी आपले ध्येय मानले आणि मग कुष्ठरोगीच त्यांचे देव झाले. या देवांची त्यांनी खरोखरच पूजा बांधली. पण ज्या क्षणी त्यांना जाणवले की आपले शरीर या पूजेसाठी आता पूर्वीसारखे सक्षम राहिलेले नाही त्या क्षणी त्यांनी तरुणपणात घेतलेला हा वसा अतिशय अलिप्तपणे व शांतपणे तेच काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना यातून दिला. उर्वरित जीवन अत्यंत संन्यस्त वृत्तीने व्यतीत केले. 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या खेड्यात नानांचे बालपण गेले. दोन मु्लींच्या पाठीवर जन्माला येणारे प्रत्येक मूल मृत्यूला कवटाळत होते म्हणून नानांना जन्मल्याबरोबर भिल्लीणीच्या ओटीत देण्यात आले. म्हणून नानांचे जन्मनाव झाले भिल्या ! वर्षभर भिल्लीणीनेच अंगडी-टोपडी केली. नानांचे वडील यशवंतराव अतिशय कडक, व्यवहारी व शिस्तप्रिय होते. त्यांनी आपल्या मुलांना अगदी लहान वयात छडीच्या प्रसादासोबत गीता , महिम्न, विष्णुसहस्रनाम आणि रुद्र यांची अचूक संथा दिली. 

शाळेत नाना अतिशय खोडकर म्हणून प्रसिद्ध होते. ते उत्तम नकला करीत. सुरेख रेखाचित्रे काढीत. साने गुरुजींच्या धडपडणाच्या मुलांपैकी ते एक होते. गुरुजींच्या पुतण्याचे आणि नानांचे टॉन्सिल्स ऑपरेशन एकाच दवाखान्यात एकाच दिवशी झाले होते. गुरुजींनी आईच्या मायेने पुतण्याप्रमाणेच नानांची सेवा केली होती. जणू त्या ऋणात ते अजूनही आहेत या भावनेने अगदी आतापर्यंत डोळ्यांत पाणी आणून नाना ही गोष्ट आम्हांला सांगत. 

पूर्व बंगालमध्ये कॉलरा व काळा आजार यांची प्रचंड साथ आली होती. 'सर्व्हट्स ऑफ इंडिया' सोसायटीतर्फे महाराष्ट्रातील डॉक्टरांची एक चमू तेथे पाठविण्यात आली होती. त्यात नानादेखील होते. अक्षरशः आपल्या जिवावर उदार होऊनच ही तरुण मंडळी तेथे गेली होती. त्यांची राहण्याची, जेवणाची किंवा प्रातर्विधीची देखील सोय करण्यात आलेली नव्हती. अपुरी औषधे, इजेक्शन्स उकळायलाही अपुरे रॉकेल. 

अशा परिस्थितीत नियतीच्या विक्राळ तांडवाशी हे लोक झुंज देत होते. घरातील एकजण मरणासन्न आहे म्हणून बोलवायला येणारी व्यक्ती दुसऱ्या दिवशी देवाघरी गेली म्हणून कोणीतरी सांगायला येत होते. ठक्करबाप्पा एक दिवस स्वतः ही मुले नकी काय करतात म्हणून पाहायला गेले. प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्यांनी इंजेक्शन्स उकळण्यासाठी लागणाऱ्या रॉकेलची पुरेशी सोय स्वतः करून दिली. 

अशा प्रकारच्या परिस्थितीत देखील नानांनी असंख्य माणसे जोडली. ते स्वतःबंगाली शिकले. बंगाली साहित्याचा आस्वाद घेतला. नदी पार करणाऱ्या नावाड्यापासून ते त्या गावच्या जमीनदारापर्यंत सगळे नानांचे प्रेमाचे लोक झाले होते. गावच्या जमीनदाराने या मुलांना महिनाभर जेऊ घातले होते. कोणाकडून फुकट काही घ्यायचे नाही हे नानांचे सुरुवातीपासूनचे तत्त्व होते. म्हणून या सगळ्या तरुणांनी त्या घरच्या अन्नपूर्णेला चांदीचा एक सुरेख देव्हारा अर्पण केला. ज्या दिवशी त्या देव्हाऱ्यात देव स्थापन केले त्या दिवशी जमीनदाराने गावजेवण दिले. 

त्यानंतर जवळपास तीस वर्षांनंतर त्या कुटुंबातील एक व्यक्ती आमचे घर शोधत शोधत वर्ध्याला आली . मोठे जमीनदार देवाघरी गेल्याची बातमी त्याने स्वतः आम्हांला सांगितली. त्यांच्या मृत्यूसमयी कुटुंबातील बहुतेक सर्व जण एकत्र जमले होते. त्या वेळी जमीनदारांनी नानांची आवर्जुन आठवण केल्याचे त्याने अश्रूभरल्या डोळ्यांनी आम्हाला सांगितले. नानांसाठी त्या कुटुंबाने तीन फोटो पाठविले होते. एक वृद्ध जमीनदाराचा, दुसरा संपूर्ण कुटुंबाचा आणि तिसरा त्या देव्हाऱ्याचा होता. 

कलकत्त्याहून परतल्यावर नानांनी एरंडोलला दवाखाना सुरू केला. स्वस्त व गुणकारी औषध देणारा डॉक्टर असा त्यांचा लौकिक होता. या परिस्थितीत देखील नाना मनातून अस्वस्थच होते. कारण कामाचे समाधान अजूनही मिळत नव्हते. 1942च्या लढ्यात नाना जेलमध्ये जाऊन आले. त्या वेळेस नानांना थोरामोठयांच्या सत्संगतीचा लाभ झाला.

याच सुमारास गांधीजींनी जनतेला आवाहन केले की हरिजनांना आपल्यांतीलच एक मानावे. लगेच घरात हरिजनांना जेवू घालाल तरच मी पण घरी जेवण असे नानांनी घरात सांगितले. त्या दिवसापासून अर्थात घरातील जेवण बंद झाले. एक धर्माची वहीण सौ. विद्याताई राठी आपणहून पुढे आली आणि नानांना म्हणाली, की तुमच्या सोबत माझ्या घरी हरिजन जेवलेले मला चालतील. नाना म्हणाले, की मी फुकट जेवणार नाही. तुम्ही जो काही जेवणाचा मोबदला म्हणून द्याल तो मला चालेल असे विद्याताईंनी कबूल केले. तेव्हापासून दर आठवडी बाजाराच्या दिवशी कासोद्याहून गावरानी तूप नाना बहिणीला आणून देत असत. 

नाना एरंडोलला असताना एकदा गावात एक कुष्ठरोगी मरण पावला. गावातील कोणीही त्याचे प्रेत उचलायला तयार होत नव्हते. नाना व त्यांचे मित्रमंडळ यांनी त्याला स्मशानात पोचवले. त्या वेळी तिरडी कशी बांधायची हे सांगायला देखील कोणी पुढे येत नव्हते. हा प्रसंग नानांना एका निश्चित ध्येयाकडे घेऊन गेला. नानांनी खानदेशात कुष्ठकार्य करायचे मनाशी पक्के केले. त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गुरू सीतारामभाऊ काबरा यांची परवानगी घेऊन नाना वर्धा येथील दत्तपूर कुष्ठधामात आले. भरपूर पैसे मिळवून देणारा खासगी दवाखाना विनोबांच्या एका शब्दाखातर नानांनी बंद केला. वडिलोपार्जित शेती व घर आपल्या धाकट्या भावांच्या नावावर करून नाना तन मन धनाने कुष्ठरोग्यांचे झाले. 

त्या काळात म्हणजे 1950च्या सुमारास कुष्ठरोगी ही समाजातील एक बहिष्कृत व्यक्ती होती. अशांसाठी वेगळी वसाहत निर्माण करून मग औषधोपचार केले जात. बरे झालेले कुष्ठरोगी परत घरात अथवा समाजात येऊन राहू शकत नसत. श्री. मनोहर दिवाण यांनी वर्धा-पवनार रस्त्यावर असलेल्या दत्तपूर या ठिकाणी कुष्ठरोग्यांची वसाहत सुरू केली. तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून ५०/- रुपये पगारावर नाना रुजू झाले. 

वसाहतीतील संथ आयुष्यात उत्साह निर्माण करण्यासाठी औषधोपचारांसोबत कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी शेती, गोपालन, चर्मोद्योग इत्यादी जोड कामेही मनोहरजींनी सुरू केली. तेथील संध्याकाळची सामुहिक प्रार्थना म्हणजे एक छोटासा उत्सवच असे. नानाही प्रार्थनेच्या वेळी अभंग म्हणत. कुष्ठरोग्यांप्रमाणे कुष्ठकार्य करणारे कार्यकर्ते देखील तेव्हाच्या काळात एक प्रकारे समाजाच्या बाहेरच असत. त्यामुळे नानांच्या मनाला लग्नाचा विचारच शिवला नव्हता. 

पण कर्नाटकातल्या तिकोटासारख्या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या जिद्दीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुर्विद्याविशारद झालेल्या आमच्या आईने हे सतीचे वाण हसत हसत पत्करले. अगदी समर्थपणे आयुष्यभर तिने नानांना खंबीरपणे साथ दिली. या लग्नाचा संपूर्ण खर्च मनोहरजी दिवाण यांनी केला आणि विनोबाजींचे धाकटे बंधू शिवाजी महाराज यांनी या लग्नाचे पौरोहित्य केले. 

1960च्या सुमारास वर्ध्याला गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन ही संस्था नुकतीच आकार घेऊ लागली होती. तिला घडविणारे शिल्पकार होते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे व संशोधक वृत्तीचे डॉ. वारदेकर! त्यांची कामाची आखणी व नियोजन करण्याचे कौशल्य अव्दितीय असे होते. ते प्रामाणिक व सचोटीच्या कार्यकर्त्याच्या शोधात होते. नाना त्यांना भावले, एक आयुर्वेदिक पदवीधर असून देखील डॉ. वारदेकरांनी सेवाग्राम कंट्रोल युनिटचे काम नानांच्या स्वाधीन केले. 'सर्व्हे एज्युकेशन ट्रीटमेंट' पद्धतीवर आधारलेले हे जगातील पहिले कंट्रोल युनिट होते. त्या काळात कुष्ठरोगावर फुकट औषधे देत असून देखील रोगी औषधे घ्यायला नियमित येत नसत. 

एकदा नानांनी नियमित न येणाऱ्या रोग्यांना आपल्या सुवाच्य अक्षरांत पत्र पाठवले, 'अमुक दिवशी आपल्याला औषध घ्यायला अमुक ठिकाणी यायचे आहे', एवढेच त्यात लिहिले. पत्र मिळालेल्यांपैकी पन्नास टक्के लोकांना तर ते आयुष्यात आलेले पहिलेच पत्र होते. अक्षरशः पत्र हातात दाखवत ते आपणहून औषध घ्यायला आनंदाने आले. 
लोकांनी तपासून घ्यायला पुढे आले पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जनमानसापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी नानांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. त्यातील 'भारतदर्शन' हा सगळयांत यशस्वी झालेला प्रयोग होता. भारतदर्शनचा स्लाईड शो हा एक आदर्श 'अवेअरनेस प्रोग्रॅम' म्हणता येईल. त्यात भारतातील तीर्थक्षेत्रांची, सणावारांची माहिती असलेल्या अनेक स्लाईड्स होत्या. 

याच स्लाईड्सच्या मालिकेत विसंगत वाटणार नाहीत अशा पद्धतीने कुष्ठरोगांच्या स्लाईड्स गुंफलेल्या होत्या. त्या रंगीत स्लाईड्स बनविण्यासाठी नाना आणि फोटोग्राफर महिन्द्रकाका यांनी सहा महिने फिरून सर्व कुष्ठ वसाहती पालथ्या घालून उत्तमातील उत्तम रोग्यांचे फोटो घेतले घेतले होते. योग्य औषधोपचाराने रोगी पूर्णपणे कसा बरा होऊ शकतो हे या स्लाईड्सद्वारा नाना समजावून सांगत. रुग्णांत झालेली सुधारणा प्रत्यक्ष बघितल्यावर त्याचा लोकांच्या मनावर फार खोलवर परिणाम होत असे.

नानांची भाषणाची शैली ओधवती आणि रसाळ होती. ते मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, मारवाडी, बंगाली या भाषांत अस्खलित भाषण करू शकत. नानांनी बनविलेल्या या स्लाईड्स नंतर भारत असल्याचे एक द्योतक म्हणजे ही योजना आहे असे 'ह्यूमन राईट्स वॉचने आपले मत प्रदर्शित केले आहे. 

धाडसी पुरोगामी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा 

बालमजुरीबाबत खरोखर पोटतिडिकीने काही करावयाचे आहे की नाही याबाबत साशंकता आणि काळजी निर्माण होत असतानाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा 10 डिसेंबर 1996चा निवाडा निश्चितच दिलासा देणारा आहे. या निवाड्याने बरेच काही होऊ शकेल. युनिसेफ निर्मितीला 50 वर्षे पुरी होत आहेत, तसेच बालमजुरीवर झगझगीत प्रकाशझोत टाकण्यास कारणीभूत ठरणारा ह्यूमन राईट्स वॉचचा 'दि स्मॉल हँड्स ऑफ स्लेव्हरी' हा अहवाल प्रसिद्ध होण्याच्या सुमारास हा निवाडा देण्यात आला आहे, हा मोठा योगायोग आहे. 

धोक्याच्या धंद्यांमधून १४ वर्षाखालील मुलांना कामाला लावणे बंद झाले पाहिजे, असा स्पष्ट आदेश देतानाच अशा प्रकारे कामाला लावणाऱ्या मालकाने प्रत्येक बालमजुरामागे रुपये वीस हजारांची भरपाई रक्कम बालमजूर पुनर्वसन तथा कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा हुकूम या निवाड्यात दिलेला आहे. या निधीचा विनियोग बालमजुरांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी करायचा आहे. निवाड्याप्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून प्रत्येक राज्य सरकारने धोकादायक धंद्यांतून काम करत असलेल्या बालमजुरांचे सर्वेक्षण सहा महिन्यांत पुरे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घाम गाळावा लागणाऱ्या धोक्याच्या धंदयांत काम करणाऱ्या बालमजुरांना खरोखरच नैसर्गिकरीत्या जेथे ती असावयास पाहिजेत त्या शाळेमध्ये भरती करण्यामध्ये हा निवाडा खरोखरच यशस्वी ठरेल का?

Tags: गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन डॉ. गो. य. जोशी सुधा जोशी कुष्ठरोग समाजकार्य Gandhi memorial leprosy foundation Sudha joshi dr. G.Y. joshi social work leprosy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके