डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संघर्ष आणि नवनिर्माणाची 20 वर्ष : नर्मदा बचाओची वाटचाल

मध्य प्रदेशातील, निमाड क्षेत्राच्या बडवानी शहरात 27 नोव्हेंबर 2005 रोजी हजारोंच्या संख्येने एकत्रित आलेल्या मध्य प्रदेशच्या मैदानी क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर आणि मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी भव्य मोर्चा काढून आपली जगण्याच्या अधिकाराधी 'लठाई" अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मध्य प्रदेशातील, निमाड क्षेत्राच्या बडवानी शहरात 27 नोव्हेंबर 2005 रोजी हजारोंच्या संख्येने एकत्रित आलेल्या मध्य प्रदेशच्या मैदानी क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर आणि मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी भव्य मोर्चा काढून आपली जगण्याच्या अधिकाराधी 'लठाई" अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. गुजराथ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, दिल्ली अशा भारताच्या काना-कोपऱ्यातून तसेच नेपाळपासून इटलीपर्यंत विविध देशांतून आलेल्या जनसंघटनांच्या प्रतिनिधींनी यात सहभागी होऊन न्यायासाठीच्या ह्या लतयाला आपले समर्थन जाहीर केले. सरदार सरोवर धरणाची उंची 110 मीटरवर थोपविण्याचा आनंदोत्सव साजरा करतानाच, पुनर्वसनाच्या नावाने सुरू असलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा "पर्दाफाश' करण्याचा व आपल्या अधिकारासाठी आणखी 20 वर्षे लवण्याची तयारी असल्याची घोषणा केली. सरकारने व सर्व समर्थकांनी 'एकसो दस, अब बस' अशी भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. (याच दिवशी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झाला, हा केवळ योगायोग का?) बडवानी परिसरात ह्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना गावा गावांतून मोठया संख्येने पोलीस पहारा वाढविण्यात आला होता. लोकांना धमकावण्यात येत होते, ज्येष्ठ स्थानिक कार्यकर्त्यांच्या नावे 'अटक वॉरंट' काढण्यात आले होते. 'मोर्चे काढून काय होणार, मुहावजा मान्य करा' अशी भित्तीपत्रकेही लावण्यात आली होती. ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करीत निमाडथी जनता मोटया जोमाने संघटित होताना पाहून शासन हादरले' हे उघडच होते.

आदल्या दिवशी 26 तारखेला दिवसभराचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सरदार सरोवर धरण, तसेच नर्मदेवरील व अन्य धरणांच्या विरोधात लढे देणाऱ्या अभ्यासकांनी ह्यात सहभाग घेऊन अनेक अंगांनी विश्लेषणात्मक मांडणी केली. नैसर्गिक साधनसंपत्तीवरील- पाणी जमीन, खनिजे ह्यांवरील स्थानिक जनतेचा अधिकार मान्य व्हावा या दृष्टीने पुढील रणनीती कशी असावी ह्यावरही विचार करण्यात आला. 

ह्या उत्सवाची सुरुवात 23 नोव्हेंबर- पासून नर्मदा घाटीतून निघालेल्या दोन संवादयात्रांनी झाली. एका गटाने धुळे येथील समर्थन गटाचे स्वागत स्वीकारत या संवादयात्रेला सुरुवात केली. दुसरा टप्पा होता शहादा तालुक्यातील शोभानगर (बडछील पुनर्वसाहत) डोमखेडी, निमगवाण, सुरूंग द्या कट्ट्या लढवय्या गावांनी स्वतःच्या पसंतीने सरकारला जमीन खरेदी करायला लावली. ह्यासाठी मोठे योगदान दिलेल्या शोभा वाघ च्या स्मृतीने ह्या वसाहतीला शोभानगर असे नाव ऑगस्ट 2005 मध्ये देण्यात आले. निमगवाणावी जीवनशाळाही आता इये स्थलांतरित करण्यात आली आहे. विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या रेडीने पाहुण्यांचे स्वागत केले. चित्रप्रदर्शनातून लहानग्यांनी मूळ गावातील नदी, मासळी, जंगल-डोंगर इथे नाहीत, ही खंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मूळ गावातल्या पिकांची विविधताही त्यांनी नमुन्यांच्या मांडणीतून दाखविली होती. गावकन्यांच्या सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्या केवलसिंग गुरुजींनी 19 नोव्हेंबर 93 रोजी पोलीस अत्याचाराचा पहिला बळी ठरलेल्या रहेमळ पुन्या वसावे ह्याला श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात केली. डोमखेडी येथे सरदार सरोवराच्यामुळे 'रवाड' ह्या नदीच्या उपनदीत आलेल्या गाळात फसून मरण पावलेल्या जीवनशाळेतील लता बसावे आणि शोभाताई बाघ तसेच ज्येष्ठ समर्थक धुळ्याचे श्री.दशरथ तात्या पाटील व डॉ.चौधरी ह्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. सभेतील भाषणांमध्ये डेडलीबाई व केशुभाईंना अजूनही कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते; कोणते प्रश्न अजून शिल्लक आहेत ह्याबद्दल सविस्तर मांडणी केली. ह्या वसाहतीत भरपूर दिव्याचे खांब दिसत असले तरी नेमकी रात्री 6 ते 11 या वेळात वीज नसते; पाण्याची टंचाई, संडास पुरेसे नाहीत, या अडचणी सांगितल्या. अजूनही जमिनीचे सीमांकन होऊन सातबारावे उतारे मिळालेले नाहीत. जमीन देतानाच्या कागदांवर बागायती जमीन' लिहिलेले असले तरी मूळ मालकांनी 'सरकारने पैसे दिले नाहीत' म्हणत मोटारी काढून नेल्पा- म्हणून सिंचन नाही. कोरडवाहू शेतीवर जगणे कठीण होत आहे. अजूनही अनेक कुटुंबांना जमीन मिळालेली नाही, वयस्कर मुलांचा प्रश्नही सुटलेला नाही. त्यामुळे 'सर्वांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा मूळगावी परत जाण्याचा विचार करीत असल्याचा इशाराही देण्यात आला.

पुढचा कार्यक्रम संध्याकाळी धडगावच्या तहसील कार्यालयाजवळ झाला. मोठ्या जाहीर सभेत संवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. नर्मदा किनाऱ्यावरील गावातील स्थिती, पुनर्वसन प्रक्रियेतील गलथानपणा तसेच बनगावातील लोकांच्या रेशनापासून जमिनीच्या हकांसंबंधीच्या विविध अडचणी, सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार अशा विविध मुर्याबद्दल गावोगावच्या प्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनी मांडणी केली. 'साथी, तेरे सपनों को मंझिल तक पहुचाऐँगे' अशा जोरदार नाच्यांसह लतधात शहीद झालेल्या रहेमलभाई लता वसावे, शोभाताईंना श्रद्धांजली वाहत 'लढाई जारी' ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

रात्रीचा मुक्काम बिलगाव येथे ठरविला होता. गावकऱ्यांनी श्रमदानाने कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या मार्गदर्शन आणि सहयोगाने उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या रोशनीत पाहुणे पोहोचले. गावात निजानीज झालेली. दुसऱ्या दिवशी इंजिनिअर समर्थक धुळ्याचे श्याम पाटील यांनी 'बीज तयार कशी होते (अजिबात बुदडित न आणता) ते समजावून देत असताना युवासार्थींनी धबधब्याच्या नितळ पाण्याचाही आनंद घेतला, त्यामुळे सातपुड्याची डोंगररांगा चढत-उतरत नदीकिनारी पोहोचण्याला त्यांना विशेष उत्साह बाटला. सावच्या- भुस्या इथे बोटीत बसून नर्मदा पार करीत मध्य प्रदेशातील पैलतीरावरच्या 'अंजनवारा' येथे पोहोचताना नर्मदेच्या पात्राच्या रुंदीमुळे तिला 'नदी' म्हणणे जरा अवघड वाटत होते. पूर्वी म्हणजे अगदी 94 पर्यंतसुद्धा लहानशा होडयांतून कसे सहज पैलतीरी जाता येत असे अशा गप्पा रंगल्या. अंजनवारा हे विंध्य पर्वताच्या कुशीतील मध्य प्रदेशच्या आदिवासी पट्ट्यातील साधारण मध्यावरचे ठिकाण. तिथे काही घरांमधय जाऊन आया-बहिणींना व ज्येष्ठांना भेटून त्याचे 'जगणे', त्यांचे 'म्हणणे' समजून घेत, गावप्रतिनिधींकडून आजवर 20 वर्षे दिलेल्या लढ्याची हकीगत ऐकत संवादयात्रा पुढे निघाली, पुन्हा नर्मदा पार करीत नर्मदेच्या सातपुड्यालगतच्या किनाऱ्याकडे, भादलाच्या दिशेने. भादल हे महाराष्ट्राचे ह्या किनाऱ्यावरचे शेवटचे गाव. मध्ये एक उपनदी (धडगावकडून येणारी) अन् नंतर 'खान्या भादल' मध्य प्रदेशचे या किनाऱ्यावरचे पहिले गाव. हाकेच्या अंतरावर अन् छोटघाशा होडधांतून सहज जा-ये करण्यासारखे. हे ऐकून शहरी-मैदानी पाहुण्यांना फारच गंमत वाटली. असेच महाराष्ट्रात खाडनदी नर्मदेला मिळते, तिथे डोमखेडी गाव. दोन्हीकडे एका तीराला डोमखेडीला जोडून निमगवाण सुरूंग-तिथल्या लोकांना आपण शोभानगरमध्ये भेटलो. नर्मदा ओलांडली की समोर हापेश्वराचे प्रसिद्ध मंदिर. दोन वर्षांपूर्वी पूर्ण पाण्याखाली गेले. ते गुजराथ आदिवासी पट्टयातील शेवटचे गाव अन् लगेच जलसिंधी- मध्य प्रदेशचे पहिले गाव. तिकडून दुसरी संवादयात्रा येत आहे हे ऐकल्पाबर 'आपल्याला पण नाही का तिकडे जाता येणार', अशी हुरहूर सर्वांनाच लागली. ह्या गप्पांमध्ये सूर्यास्त बघत दीड तासाचा बोटीचा प्रवास आटोपला अन् संध्याकाळची रात्र होता होता आम्ही किनाऱ्याला लागलो. दोन ठिकाणांहून मुळांच्या जोरदार घोषणा ऐकू येत होत्या, त्यामुळे सर्व पुन्हा ताजेतवाने झाले. ह्या वेळी मुक्कामाची सोय असलेल्या मध्य प्रदेशच्या 'खान्य भादल मध्ये सामानासह बहुतेक सर्व पाहुण्यांना उतरवून थोडे कार्यकर्ते महाराष्ट्र भादलमध्ये गेले आणि जीवनशाळेच्या मुलांना व जमलेल्या गावकऱ्यांनाही इकडे घेऊन आले. कार्यक्रमाची जय्यत तयारी होती. पाहुण्यांचे स्वागत, ओळख, मुलांची गाणी, नाटक असा कार्यक्रम लगेच सुरू झाला. गावकन्यांनी आंदोलनाचा इतिहास सांगितला. आताची परिस्थिती मांडली व बाटणारी चिंता व्यक्त केली. सोवऱ्यापासून आलेल्या इतरही अनेक प्रतिनिधींनी न्यायासाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला.

सकाळी 'महाराष्ट्र भादल'च्या जीवनशाळेत गेलो, नदीकिनान्याची झोपडी, मागच्या 15 ऑगस्टला द्या शाळेच्या दारात पाणी आले, शेते, घरे तर पार उद्ध्वस्त झाली म्हणून ह्या पावसाळ्यात उंच टेकडीवर झोपडी बांधून शाळा हलबली, पण पाहुण्यांसाठी मुद्दाम प्रदर्शन मांडून मूळ झोपडी पुन्हा सजवण्यात आली होती. मांडलेल्या प्रदर्शनातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गावचा नकाशा... येथील भूगोल समजावणारा, मुंबईहून आलेल्या 'संप्रीत' ह्या कार्यकर्त्याने नंतरच्या सभेत ह्याचा उल्लेख करताना म्हटले की, ह्यातूनच जीवनशाळेतील आगळी शिक्षणपद्धती दिसून येते. शिक्षणाला रोजच्या जीवनाशी, स्वतःच्या परिसराशी जोडणारी. (शहरी शिक्षणापेक्षाही निराळी).

सकाळच्या नव्या दमाने सुरू झालेल्या चर्चेत 'भादल-साबन्या'चे लोक महाराष्ट्र शासनाच्या धोरणावर प्रखर टीका करीत सांगू लागले- 'इथे आम्ही एवढी 70-80 कुटुंबे जगतो आहोत; पण सरकार फक्त 40 कुटुंबच मोजते, अन् एवढया कमी संख्येसाठी निराळे गावठाण न करता आम्हांला 'शोभानगर'मध्येच जाण्याचा दबाव आणते आहे. पण आधीच तिथे पोहोचलेल्या कितीतरी जणांना जमीन मिळणे अजून बाकी आहे..."

मध्यप्रदेशचे लोक सांगू लागले, आमच्या सरकारकडे जमीन नाहीच, अन् ते आमची नुसताच 'नगद मुहावजा देऊन बोळवण करू बघते आहे.... नर्मदा ह्या एकाच नदीच्यावरील सरदार सरोवर ह्या एकाच प्रकल्पाने बाधित होणारे आम्ही सर्व विस्थापित; मग हा भेद' कसा? हा कसला न्याय? ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही एकत्रितपणे लता चालूच ठेवू-आणखीन तीव्र करू.'

त्यांच्या या निर्धाराला सर्व समर्थकांचा पाठिंबाच राहील असे सांगताच 'दुनिया की ताकद, हमारे साथा बांध रोखना हमारे हाथ', अशा दणदणीत नान्यासह आम्हांका निरोप देण्यात आला.

एक जीप व एक ट्रक भरून आम्ही सुमारे चाळीसजण दोन तासांच्या प्रवासानंतर 'मवरीया' गावात पोहोचलो.

ह्या ठिकाणी पोहोचलेस्या पाहुण्यांचे तीन गट करण्यात आले, त्यामुळे गावागाबांतून निधणार्या 'मशाल जुलूस'मध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पाहुण्यांचा सहभाग शक्य व्हावा, आम्ही पिप्री गावाच्या गटात होतो, वाटेत निसरपूरला भव्य मशाल यात्रेने आमचे स्वागत केले व सर्वच पाहुणे उत्साहाने त्यात सामील झाले, 'ले मशाले चल पड़े है, लोग मेरे गाव के..." हे फक्त गीत नाही, वास्तव आहे. ह्याचा अनुभव घेत आम्ही सर्व पिप्रीला पोहोचलो. तेथील जुलूसमध्ये मशालींबरोबर ढोलही होता. साहजिकच नव्या-जुन्या समर्थकांना, ताईसह निमाडच्या भाभी बरोबर ताल धरण्याची संधी मिळाली. त्यामुळे उत्साह अधिक वाढला. ह्या गावातील सभेसाठी दिल्ली, आसाम, बिहार आणि नेपाळ अशा ठिकठिकाणचे आणखी समर्थक पोहोचले व सभा अधिकच 'ताकद देणारी' होत गेली.

26 नोव्हेंबरच्या परिसंवादासाठी मुद्दाम येणारे इंदोर, धुळे, मालेगावचे ज्येष्ठ समर्थक वडवानीत रूजू झाले. बी.डी.शर्माजीसारख्या ज्येष्टांनी संवाद यात्रांतून आलेल्या समर्थकांशी चर्चा करून नदीकिनान्याच्या गावांतील वस्तुस्थिती समजून घेतली. आंदोलनाच्या 20 वर्षाच्या वाटचालीतील फोटो व पोस्टर प्रदर्शनाने सजलेल्या भव्य शामियानांत जुन्या साधींना भेटत, आठवणींना उजाळा सर्वच देत होते. संघर्ष अन् निर्माणच्या अनेक टण्यांवर फेरकुवा पासून 94 च्या भोपाळच्या रोशनपुरा चौराहवरील दीर्घ सत्याग्रह अन् उपोषणात सामील झालेले निमाडये ज्येष्ठ साथी सर्वाची आपुलकीने स्वागत करीत होते. मध्य प्रदेश सरकारचे माजी मुख्य सचिव डॉ.शरदचंद्र बेहर, केरळचे गांधी म्हणून मान्यता पावलेले प्रसिद्ध मल्याळी साहित्यिक सुकुमार अझिकोड, मॅगसेसे पुरस्कारविजेते राजेंद्रसिंह, विधायक सुनीलम् आदी मान्यवर ह्या परिसंवादात अन् उत्सवात सामील होण्यासाठी आवर्जून आले. आंदोलनाशी दीर्घकाळ जोडलेल्या आशीष कोठारी, अंजली परांजपे, विनोद रैना, राकेश दीवाण, श्रीपाद धर्माधिकारी, आलोक आगरवाल, हिमांशु उपाध्याय साथींनी विनाशकारी सरदार सरोवर प्रकल्प तसेच नर्मदेवरील आणि अन्य मोठया बांधाच्या विरोधाची लठाई, त्यातील जटिलतेची उकल करीत सध्याची परिस्थिती असे चित्र मांडले. 20 वर्षाच्या ह्या महत्त्वाच्या टण्प्यावर आंदोलनाने कसे वळण घ्यावे ? पुढील वाटचाल कशी असावी? ह्यावद्दल सर्व जेष्ठ सार्थींनी सल्ला यावा, अशी विनंती करीत मेधाताईंनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमानिमित्त सरकारला इशारा देण्यासाठीचा नवा नारा सर्व विचारमंयनातून पुढे आला. 'एक सो दस, अब बस."

27 तारखेला निमाडच्या काना कोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने सतत येणारे अन् आदिवासी क्षेत्रातून आलेले प्रतिनिधी व सर्व समर्थक द्यांची रँली' ही बडवानी शहरच नव्हे तर मध्य प्रदेशचे शासनही हादरवून गेली.

रेखीची सांगता बडवानीतील आमसभेने झाली. ह्यावेळी 21 लढाऊ स्त्री-कार्यकर्त्यांनी मशाली पेटवून 'उवाई जारी' असल्याचा संकेत दिला. 

नर्मदेच्या संघर्षामुळे सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 10,000 कुटुंबांचे पुनर्वसन झाले असले तरी आणखी 35,000 पेक्षा अधिक कुटुंबांचे 'जमीन आधारित' पुनर्वसन बाकी आहे. धरणाचे, सिंचनाये लाभ पोहोचूच शकले नाहीत, 'खर्च' गुजराथ सरकारच्या आयाक्याबाहेर गेला आहे म्हणून आता सर्व सरकारांनीही 110- आता पुरे हीच भूमिका घ्यावी असे आवाहन करीत शक्तिमेळाव्यात सहभागी सर्वांनीच 'जमीन नही, बांध नही' असा निर्धार पुन्हा जाहीर केला.

नर्मदा खोन्यातील लढा हा केवळ एका धरणाचा लढा राहिला नसून तो खन्या विकासाचा आणि जनसामान्यांच्या अधिकाराचा लढा झाला असल्याचेही सर्वांनी पुन्हा पुन्हा दाखवून दिले. 

Tags: सुहास कोल्हेकर संघर्ष आणि नवनिर्माणाची 20 वर्ष : नर्मदा बचाओची वाटचाल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके