डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

कुणि हिंदु वा मुसलमान कुणि शीख,
बौद्ध आहे अभिमान हा मला की मी भारतीय आहे.

भाषा नि वेषभूषा किति वेगळया निराळ्या!
प्रिय हीच एक भाषा मी भारतीय आहे.

नान्दो विभिन्न राष्ट्रांतुन भिन्न वंश, पंथ,
ना खंत, खेद मजला, मी भारतीय आहे.

मी धर्मनिष्ठ परि मी धर्मान्ध खचित नाही,
'माणूस' धर्म माझा, मी भारतीय आहे.

हे विश्वरूप आले उतरून भारतात,
विश्वात्म मी परंतू, मी भारतीय आहे.

सौभाग्य जन्म येथे सौंदर्यरूप मृत्यू आ
युष्य अमृताचे, मी भारतीय आहे.

प्राणान्त प्रख्यरात्री प्राचोबरी पहाटे
येईल सूर्य साक्षी, मी भारतीय आहे.

Tags: बीड -सुहासिनी इर्लेकर 'मी भारतीय आहे ' Beed -Suhasini Irlekar 'I am Indian' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके