डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जे धार्जिणेपणातून होते ते अंधानुकरण नको

'साधना’ च्या 30 जुलैच्या अंकात बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील माझ्या लेखविषयी श्री. वसंत पळशीकर यांचे टिपण छापून आले आहे. त्यामध्ये सदर लेखात मी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काही गैरसमज मूलक मांडणी वाटली म्हणून ही प्रतिक्रिया.

'साधना’ च्या 30 जुलैच्या अंकात बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील माझ्या लेखविषयी श्री. वसंत पळशीकर यांचे टिपण छापून आले आहे. त्यामध्ये सदर लेखात मी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काही गैरसमज मूलक मांडणी वाटली म्हणून ही प्रतिक्रिया.

पाश्चिमात्यधार्जिणे बहुराष्ट्रीय कंपन्यांची भलावण करतात असे मांडले याचा अर्थ बहुराष्ट्रीय कंपन्यांचे समर्थन करणारे सर्वच पाश्चिमात्यधार्जिणे आहेत असा घेण्याचे काहीच कारण नाही. पाश्चिमात्यधाजिर्ण पक्षपाती यामध्ये पाश्चिमात्य जीवनशैली, जीवनदृष्टी, वैज्ञानिक व भौतिक प्रगती यांनी भारावून त्यांचे अंधपूजक बनलेले लोक अभिप्रेत आहेत. भारतातील निसर्ग, संस्कृती, लोकमानस, समाजाच्या गरजा या सर्वांच्या संदर्भामध्ये जागतिक विचार डोळसपणे तपासून घेणे आवश्यक वाटते; जे धार्जिणेपणातून होते ते त्यांवर आक्षेप आहे. याचा अर्थ पाश्चिमात्य अंधानुकरण नको- देशांत विकसित झालेले विज्ञान, तंत्रज्ञान वा उदारमतवाद, समाजवाद असे विचार अव्हेरणे असा नाही.

पाश्चिमात्य देशांतली तंत्रवैज्ञानिक प्रगती, चैनचंगळ, उपभोगवादाची लालूच, 'स्वार्थपोशी' नीती यांचे आकर्षण, उच्चशिक्षित धनिक म्हणजे सबळांमध्ये आहे- बळी तो कान पिळी अशा बाजारनियंत्रित भांडवली व्यवस्थेत प्रगतीला मोठी संधी मिळते यामध्ये रुपयाला विशेष अनुकूलता आहे, हे भांडवली सत्ताधारी दाम भेद या मार्गाने जनसामान्यांचेही या व्यवस्थेमध्ये सामिलीकरण करून घेतात. परंतु स्वार्थाबरोबर निसर्गाचा विचार,समाजाचा विचार, स्वहिताबरोबर इतरेजनांचे हित विचारात घेण्याची मानसिकता, 'चांगले' करण्याची सदिच्छा ही मानवी प्रवृत्ती आहे, पण ती जोपासावी लागते . त्यासाठी समाजापुढे तसे आदर्श असणेही महत्त्वाचे आहे. भारतातील दलित, आदिवासी, स्त्रिया अशा पिढयानपिढ्या दडपलेल्या व शेतकरी-कामकरी आदि एकूणच कष्टकरी समाजाच्या भौतिक व सांस्कृतिक उन्नतीच्या दृष्टीने योग्य अशा विकासाच्या मार्गातिक्रमणासाठी एकसंघ जूट उभारण्याचे कठीण आव्हान आपणापुढे आहे. कारण आज जगभर स्वार्थपोशी भांडवलशाही ठाण मांडून आहे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांदारा तिचा प्रसार सर्वदूर होतो आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा यामध्ये मोठा वाटा असल्याने भारतातल्या जनकेंद्री विकासाच्या वाटेतले ते मोठे अडसर बनतात, खलनायक ठरतात. याचा अर्थ त्यांच्यापाशी काही 'कर्तृत्व' नाही असा नाही. प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन, प्रचंड आर्थिक ताकद, भुलवणारी जाहिरातबाजी यांच्या बळावरच त्यांनी जागतिक साम्राज्ये स्थापन केली आहेत, व त्या भारत पादाक्रांत करू पाहत आहेत, भारताच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी 'सामील' करून घेतले आहे. अशा परिस्थितीत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या साम्राज्यवादाचे धोके जाणून विरोधाची फळी उभारणे हे एक आव्हान. लेख बहुराष्ट्रीय कंपन्यांबाबत असल्याने त्यामध्ये पर्यायी विकासाच्या उद्दिष्टांबाबत केवळ एक परिच्छेद घातला आहे. 'साधना च्या चोखंदळ वाचकांनी श्री. पळशीकर यांनी सुचवल्याप्रमाणे ही उद्दिष्टे साधण्यासाठी कोणते अर्थ-राजकीय प्रतिमान पुढे आहे याची चर्चा करायला हवी. तो एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके