डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

स्त्रीला स्वतःलाच स्वातंत्र्य हवे आहे का?

प्रा. शिवाजीराव गायकवाड यांनी 'जन्मल्यापासूनच स्त्रीला दुय्यम स्थान आहे' असे सांगून 'आपण गुलाम आहोत याची जाणही स्त्रियांना नाही' असा विचार मांडला. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.विजय दर्प यांनीनी विचार मांडले. ज्या संस्कृतीने स्त्रीला गुलामगिरीची वागणूक दिली, त्या एकूण जीवनपद्धतीत बदल करावा, असे ते म्हणाले. 'स्त्री-मुक्तिची चळवळ' ही ऐतिहासिक चळवळ, असेही ते म्हणाले.

10 मार्चमध्ये अकोल्याला 'समता आंदोलन' या संघटनेच्या वतीने स्त्री-मुक्ती दिवसानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ एक उपक्रम झाला. परिसंवादाचा विषय 'स्त्री-मुक्ती:समज-गैरसमज' होता. याच दिवशी संघटनेतर्फे चित्रप्रदर्शनही भरविले. त्यात मुस्लिम स्त्री, हिंदू स्त्रीच्या परिस्थितीचे वास्तव चित्रण होते. स्त्री गुलामगिरीच्या बंधनात कशी अडकली गेली हे रेखाटले होते. चित्रप्रदर्शन बोलके व उपयुक्त ठरले. हे चित्रप्रदर्शन यशस्वी करण्यात आव्हाड यांचा सिंहाचा वाटा!

परिसंवाद रंगला. त्याला नंतर बरेचसे वादविवादाचे स्वरूप आले! स्त्री वक्त्यांमध्ये सौ.साबळे, सौ.देशपांडे ताईंनी भाग घेतला. सौ. साबळे यांनी हुंडा पद्धतीस विरोध दर्शवून, 'पुरुषांनी मनापासून स्त्री समतेचा पुरस्कार करावा', असे सुचविले! त्यांचे विचार मार्गदर्शक ठरले. प्रा. व्ही. बी. देशमुख म्हणाले, 'प्राप्त परिस्थितीच्या राजकारणाचा आजच्या स्त्रीने अवश्य विचार करावा.' स्त्रियांनी राजकीय परिस्थितीचा डोळस विचार करावा, या विचारावर त्यांनी अधिक भर दिला. तसेच या परिसंवादात (विषयाला धरून पण काही विषयांतर करून) प्रा. व्ही. के. वाणकर यांचे वक्तव्य मात्र परिणामकारक ठरले व तितकेच वादाचेही. 'स्त्रियांना मर्यादित स्वातंत्र्य' द्यावे असे सांगून शिवरायांची संस्कृती विकृती समजू नये असे, आवाहन त्यांनी केले.

प्रा. शिवाजीराव गायकवाड यांनी 'जन्मल्यापासूनच स्त्रीला दुय्यम स्थान आहे' असे सांगून 'आपण गुलाम आहोत याची जाणही स्त्रियांना नाही' असा विचार मांडला. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.विजय दर्प यांनीनी विचार मांडले. ज्या संस्कृतीने स्त्रीला गुलामगिरीची वागणूक दिली, त्या एकूण जीवनपद्धतीत बदल करावा, असे ते म्हणाले. 'स्त्री-मुक्तिची चळवळ' ही ऐतिहासिक चळवळ, असेही ते म्हणाले. श्री.गजे, प्रा. सांडगे, श्री.आव्हाड व सौ.देशपांडेताई यांनीही परिसंवादात भाग घेतला. पण परिसंवादाचे रूपांतर हे वारंवार खटकले! 'समता आंदोलना'चे श्री सुरेश व्ही. बोऱ्हाडे यांनी परिसंवादासाठी विशेष कष्ट घेतले.

Tags: गुलामगिरी. राजकारण समता समता आंदोलन सुनील शिंदे Slavery. #स्त्री स्वातंत्र्य Politics Equality Samata Aandolan Sunil Shinde #Women Freedom weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके