डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

सदर लेखाचं शीर्षक- ‘कार्ल मार्क्स आणि आपला काळ’ हे आहे. म्हणजे आपल्या काळाशी असलेला मार्क्सचा संबंध सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये आहे.

दारिद्य्र व विषमता यांची शास्त्रीय समीक्षा सर्वप्रथम मार्क्सने केली आणि आजही त्या प्रश्नांशी आपण झगडत आहोत.

दारिद्य्र व विषमता दूर करायची असेल, तर मार्क्सचा सिद्धांत उपयोगाचा नाही. समकालीन अर्थतज्ज्ञ यासंबंधात मांडणी करत आहेत. त्यातून युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना पुढे आली आहे. हा सदर लेखाचा पैस वा आवाका आहे.

आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. परंतु देश बदलण्यासाठी काय करायला हवं, आर्थिक धोरण कोणतं असावं, निवडणुकांचा खर्च कोणी करावा, देशाला परदेशी भांडवलाची गरज का नाही, परकीय विचारधारांपासून देशाने का दूर राहायला हवं- इत्यादी विषय वा मुद्दे माझ्या लेखाशी संबंधित नाहीत. तो माझ्या अभ्यासाचा विषयही नाही.

Tags: 23 मे 2020 लडगे संजय सुनील तांबे 23 may 2020 ladage sanjay karl marx sunil tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील तांबे,  मुंबई
suniltambe07@gmail.com

सुनील तांबे हे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके