डिजिटल अर्काईव्ह

शिबिरात काही उद्बोधक, विचारप्रवर्तक पुस्तके वाचण्यासाठी ठेवलेली होती. तसेच स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे दिग्दर्शन करणारी चित्रेही लावण्यात आलेली होती. शिबिराचे आयोजन सीमा दंडिगे, रेखा दंडिगे व संजीवनी बर्जुनवाडकर या युवतींनी केले होते. तरी मीनाक्षी, यामिनी चौधरी, छाया भगत (वर्धा), श्रीमती नेटके (नागपूर) आदी भगिनींनी चर्चेत हिरीरीने भाग घेतला. मीनाक्षीने आपला स्वतंत्र विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे इतरांचे लक्ष वेधून घेतले होते.

महाराष्ट्र हुंडा विरोधी आघाडीतर्फे दि.11 व 1 2 डिसेंबरला नागपूरच्या परांजपे शाळेत शिबिर संपन्न झाले. शिबिरात अमरावती, वर्धा, खामगाव आदि गावांहून आलेल्या, तसेच स्थानिक 2 0- 2 5 युवतींनी भाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन दि. 11 डिसेंबर रोजी खासदार प्रमिला दंडवते यांच्या हस्ते झाले. डॉ. रूपा कुलकर्णी यांनी 'प्रमिलाताई या कोणत्याही पक्षाच्या असल्या तरी त्या स्त्रीपक्षाच्या एक जागरूक राजकारणपटू आहेत' या शब्दांत श्रीमती दंडवते यांचा परिचय करून दिला.

प्रमिलाताईंनी आपल्या उद्घाटनपर भाषणात युवतींना हुंडाविषयक कायद्याची माहिती करून दिली. तसेच या कायद्यात होऊ घातलेल्या सुधारणांची गंभीरपणे दखल घेण्यास सांगितले. प्रचलित विवाहपद्धतीत कन्येचे काय स्थान, हे समजावून सांगताना त्यांचा विशेष रोख 'कन्यादान' या शब्दावर होता. कन्येला एखाचा जडवस्तूप्रमाणे दान दिले जाते! या दानाचे वधुपित्याला पुण्य लाभते! हो कल्पना भयानक आहे, असे त्या म्हणाल्या.

भाषणानंतर पहिल्या चर्चासत्रात विवाहपद्धती विषयी खुली चर्चा झाली. आजही मुलींना निर्णयस्वातंत्र्य असले, तरी आचार-स्वातंत्र्य नाही. ते मिळायचे, तर आधिक स्वातंत्र्य हवे. अर्थात आर्थिक स्वातंत्र्य असूनही स्वत:चा निर्णय आचरणात आणण्याचे धाडस युवतींनीच दाखवायला हवे- असे मत व्यक्त झाले.

रात्री शाम मानव यांच्याशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये युवतींनी अंगात येणे, चेटकीण, ईश्वर, अंधश्रद्धा, आदी विविध विषयांवर आपल्या शंकाकुशंका विचारल्या. ही चर्चा बरीच रंगली.

दि. 12 डिसेंबरला सकाळी चर्चेला सुरुवात झाली. यात दादा धर्माधिकारी यांच्या 'स्त्री-पुरुष सहजीवन' या पुस्तकातील 'स्त्री-पुरुष भेद' या प्रकरणाचे वाचन झाले. व त्यावर उलट-सुलट चर्चा झाली. बलात्काराच्या समस्येवर विचार करताना ही समस्या दोन आघाडीवर सोडवायची आहे, हे लक्षात आले. एक तर बलात्कार होणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे, तसेच बलात्कार होतात ही वास्तवता स्वीकारून बलात्कारित स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलविणे. यासंबंधी काय करावे या दृष्टीने झालेली चर्चा उद्बोधक होती. दुपारच्या चर्चासत्रात डॉ. रूपा कुलकर्णी यांनी हुडाविषयक कायद्याचे वाचन केले, त्यात होणाऱ्या नवीन सुधारणांवर शिबिरार्थीची प्रतिक्रिया अजमावली.

यानंतर छाया औरंगाबादकर, संजीवनी अर्जुनवाडकर, रेखा दंडिगे आदी मुलींनी छोटेसे नाट्य करून दाखविले. शिबिरात काही उद्बोधक, विचारप्रवर्तक पुस्तके वाचण्यासाठी ठेवलेली होती. तसेच स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे दिग्दर्शन करणारी चित्रेही लावण्यात आलेली होती. शिबिराचे आयोजन सीमा दंडिगे, रेखा दंडिगे व संजीवनी बर्जुनवाडकर या युवतींनी केले होते. तरी मीनाक्षी, यामिनी चौधरी, छाया भगत (वर्धा), श्रीमती नेटके (नागपूर) आदी भगिनींनी चर्चेत हिरीरीने भाग घेतला. मीनाक्षीने आपला स्वतंत्र विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे इतरांचे लक्ष वेधून घेतले होते.

Tags: महिला विश्व हुंडा प्रथा हुंडा Women empowerment Women Hunda Dowry #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी