डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

चित्रपट हे नव्या दमाचं, नव्या जगातलं सशक्त माध्यम आहे!

अगदी डोकं बाजूला काढून ठेवा म्हणणाऱ्या चित्रपटातही काही छानसं टिपता मामला लागतं. तसंच भूतकाळातल्या महान समजल्या जाणाऱ्या चित्रपटांकडेही केवळ ते ‘आपले’ म्हणून ‘महान’ अशा रंगाच्या चष्म्यातून बघणं कमी होत जातं. अशा स्वानुभवाचा आणि बाल, तरुण, प्रौढ प्रेक्षकांशी एक शिक्षक म्हणून होणाऱ्या संवादाचा आधार घेऊन सिनेमाच्या जगाची सैर साधनाच्या वाचकांबरोबर करावी या हेतूनं ही मासिक-लेखमाला सुरू करायचं धाडस करते आहे.

सध्या मराठी चित्रपटांना आणि चित्रपट विषयक लिखाणालाही खूपच बरे दिवस आले आहेत. उदंड निर्मिती होते आहे. तुम्ही वर्तमानपत्रातल्या सिनेमांच्या जाहिरातींचं पान आणि पुस्तक परीक्षणं नियमित बघत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. अशा सुगीच्या दिवसांत निर्मितीचा दर्जा संख्येबरोबर ओघानं चांगलाच घडतो असं मात्र होत नाही. जगभरातल्या चित्रपटांचा इतिहास हेच सांगेल-दाखवेल आपल्याला. दर्जेदार निर्मितीसाठी खास प्रयत्न व्हावे लागतात. तसे ते इतिहासाच्या विविध टप्प्यांवर विविध राजकीय -सामाजिक परिस्थितीमध्ये झालेले दिसतातही. हे निर्माते-दिग्दर्शक यांच्याकडून झालेले दिसतात तसे क्वचित राज्यकर्त्यांच्या प्रोत्साहनातूनही झालेले दिसतात. तसेच अभ्यासक, समीक्षक, चित्रपटविषयक शिक्षण देणारे शिक्षक,फिल्मलब, फिल्म फेस्टिव्हल यांच्या कडूनही झालेले दिसतात. या सगळ्या प्रयत्नांमुळे घडतो चोखंदळ, रसिक, जाणकार प्रेक्षक. (शिवाय खिशात बऱ्यापैकी पैसा असलेला, असंही आता मल्टिप्लेसच्या जमान्यात म्हणावं लागेल.)

असा प्रेक्षक घडत रहायचा असेल तर त्यासाठीचे प्रयत्न मात्र सातत्यानं करत रहावे लागतील. कारण काळ बदलेल तशी निर्मिती बदलेल आणि तसा प्रेक्षकही बदलायला हवाच. चित्रपटनिर्मिती आणि चित्रपट पाहणं हे दोन्हीही तंत्रज्ञानावर अवलंबून असल्यामुळे दोन्हीही फुकटघडत नाही. अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत, माणसांचं चित्रपटांशी असलेलं नातं पैशावर अवलंबूनच राहिलेलं आहे. अगदी उच्च कलात्मक पातळीवरची निर्मिती असली तरीही. तेव्हा तंत्रज्ञानात आणि निर्मिती-वितरण प्रक्रियेत बदल होत असताना, मराठी चित्रपटांचंही मार्केटिंग आक्रमक पद्धतीनं व्हायला लागलेलं असताना आपल्याला चित्रपटांचे फक्त प्रवाहपतित-ग्राहक रहायचं आहे का? हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारूया. रसिक, विचारी प्रेक्षक-ग्राहक व्हायचं असेल तर चित्रपटविषयक वैचारिक लेखनाची मदत नक्कीच होईल. तसे प्रयत्न पूर्वी ‘साधना’नंही केलेले आहेतच. चित्रपटरसग्रहणाची छोटी छोटी शिबिरंही आता घेतली जात आहेत. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. अशा तऱ्हेनं स्वत:हून अधिक सुजाण होऊ पाहणाऱ्या प्रेक्षकाला चित्रपटविषयक लेखनाबद्दल(‘पेज थ्री’वरचं फिल्मी लिखाण नव्हे)उत्सुकता आहे. अशा उत्सुक वाचकाला काम काम उपलब्ध आहे बरं?

चित्रपट ही एक मंत्राधिष्ठित कला आहे असं मानून अभ्यास करणारे, चित्रपटकला समजावून घेण्याविषयी लिखाण करतात, तसे चित्रपटप्रेमी लोक आपल्याला आवडलेल्या चित्रपटांच्या कथांविषयी, अभिनेत्यांविषयी, दिग्दर्शकांविषयी उत्कट भावनिक पातळीवरूनही लिहितात. सततविविध प्रकारच्या चित्रपटांच्या शोधात राहून, ते पाहून त्याबद्दल लिहिणारेही असतात. इंटरनेटवर तर तज्ज्ञ आणि सर्वसामान्य प्रेक्षकांनी केलेल्या चित्रपटविषयक लिखाणाचा खजिनाच सापडतो. रिव्ह्यू किंवा ब्लॉग स्वरूपात. जितक्या परीचे चित्रपट तितक्या लेखकांच्या परी. सुजाण प्रेक्षक घडविण्याच्या प्रक्रियेत या सगळ्यांचाच सहभाग असायला हवा. पण सुजाणतेच्या घडणीचा प्रत्यक्ष प्रयत्न मात्र आपला आपल्यालाच करावा लागेल. जे आवडतं किंवा आवडत नाही ते कशामुळे? जे समजलं नाही ते समजावून घेता येईल का? एखाद्या चित्रपटाचा माझ्यावर वैचारिक, भावनिक प्रभाव पडला का? तसा तो कशामुळे पडला? जे काही

समजलं, वाटलं त्याला चित्रपटाच्या रचनेत काही आधार आहे का? असे काही प्रश्न त्यासाठी उपयोगी ठरतील. आपण शाळेत आपल्याला कळलेल्या कवितेचं रसग्रहण करायला शिकतोच ना, मग तसंच चित्रपटांबद्दल शिकायला काम हरकत आहे? खरं तर नकळत आपण शिकतच असतो. पण अधिक जाणीवपूर्वक शिकण्यासाठी मात्र तज्ज्ञांची मदत घेतली तर ते शिकणं आनंददायी ठरतं. पुस्तक-गप्पा असतात तशा चित्रपट-गप्पाही उपयोगी पडतात.

सर्वसामान्य प्रेक्षक ते अधिक डोळस प्रेक्षक हा माझा प्रवास मला स्वत:लाच फार रंजक आणि उद्‌बोधक वाटत आलेला आहे. या प्रवासात माझे समजून घेण्याचे प्रयत्न जसे महत्त्वाचे आहेत तसं विविध प्रकारचे चित्रपट पाहण्याची संधी मिळणं हेही महत्त्वाचं आहे. आपल्या इथल्या आणि जगातल्या अनेक बऱ्या-वाईट, उत्तमचित्रपटांची ओळख होताना जो नीरक्षीर विवेक विकसित होत जातो ना, तो व्यावहारिक जीवनातही अनेक प्रकारच्या अनुभवांना भिडताना, माहितीच्या प्रचंड ओघाला तोंड देताना उपयोगी पडतो. ‘चित्रपट म्हणजे आपली उगीच दोन घटका करमणूक, एवढा काय त्याचा विचार करताय’ असं ते रहात नाही मग. अगदी डोकं बाजूला काढून ठेवा म्हणणाऱ्या चित्रपटातही काही छान संटिपता मामला लागतं. तसंच भूतकाळातल्या महान समजल्या जाणाऱ्या चित्रपटांकडेही केवळ ते ‘आपले’ म्हणून ‘महान’ अशा रंगाच्या चष्म्यातून बघणं कमी होत जातं. अशा स्वानुभवाचा आणि बाल, तरुण, प्रौढ प्रेक्षकांशी एक शिक्षक म्हणून होणाऱ्या संवादाचा आधार घेऊन सिनेमाच्या जगाची सैर साधनाच्या वाचकांबरोबर करावी या हेतूनं ही मासिक-लेखमाला सुरू करायचं धाडस करते आहे. त्याला आणखी एक कारणही आहे.

सध्या पुण्या-मुंबईकडच्या प्रेक्षकांनातरी चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं खूप चित्रपट बघायला मिळताहेत. अशा ठिकाणी चित्रपटासाठी रांग लावून उभं असताना लोक जे बोलतात त्याकडे लक्ष दिल्यावर प्रेक्षकांच्या ही अनेक परी सापडतात. खूप सारे चित्रपट पाहिले...विशेषत: कलात्मक म्हणजे आपल्याला तज्ज्ञतेनं कुठल्या ही चित्रपटावर काहीही बोलता येत असा फाजील आत्मविश्वास बाळगणारे आढळतात. काही न कळलेली मंडळी अतिशय नम्रतेनं जाणून घ्यायचा प्रयत्न ही करताना दिसतात. ही दोन प्रकारची मंडळी एकमेकांशी बोलली तर काय काय होतं तेही कानावर पडतं. चित्रपटांना आपापली वैयक्तिक प्रतिक्रिया देण्याचा हक्क प्रत्येकाला आहेच. परंतु या माध्यमाची आणि चित्रपटांच्या विविध प्रकारांची जवळून ओळख करून न घेता आपल्या हक्काचीच अंमलबजावणी करत राहिलो तर मनापासून चित्रनिर्मिती करणाऱ्यावर आपण अन्याय करतो असं होईल. तसंच आपल्याला अतिशय आवडू शकणाऱ्या चित्रपटांकडे पूर्वग्रहामुळे पाठ फिरवली असंही होईल. आनंददायी अनुभवापासून वंचित राहिलो किंवा मानवी जीवनाच्या नव्या पैलूंची ओळख करून घेण्याची संधी दवडून बसलो असंही होईल. म्हणूनच आपल्या प्रेक्षकपणाची घडण होतेय का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण कथा-कादंबऱ्यांतून, चरित्र-आत्मचरित्रांतून पोचतं तसंच वैविध्यपूर्णमानवी जीवनाचं वैविध्यपूर्ण चित्रणचित्रपटांतूनही आपल्या पर्यंत पोचतं. या माध्यमाला वाचनाच्या तुलनेत सतत कमीलेखण्याचं आपण जितकं लवकर थांबवू तितकं पुढच्या पिढीच्या दृष्टीनं बरं पडेल.

लहानपणी आम्हा मुलांना जे चित्रपट दाखवले जात आणि आवडत ते आताच्या मुलांना दाखवले तर त्यांच्या प्रचंड वेगळ्या, स्पष्ट प्रतिक्रिया येतात. उदाहरणार्थ, ‘देवबाप्पा’. आता वाटतं तो मुलांचा चित्रपट म्हणून का दाखवला जायचा? लहान मुलगी मुख्य पात्र म्हणून? नाचरे मोरा हे गाणं आहे म्हणून? आताची मुलं हे प्रश्न स्पष्ट विचारतीलही, पण तशा वेगळ्या प्रतिक्रिया माझ्या वयाच्या मुलांनी स्पष्टपणे दिलेल्या मला आठवत नाहीत. तेव्हाच्या हिंदविजय थेटरात रविवारी सकाळी मुलांचे चित्रपट दाखवत. त्यात ‘श्यामची आई’ होता. ‘मुकीवारीसू’ अशा काही नावाचा चित्रपट पाहिल्याचं आणि आवडल्याचं आठवतं. इतरही परक्या संस्कृतीतले चित्रपट असायचे. त्यातले जाड्या रड्या आणि काही तत्सम चित्रपटपुसटसे आठवतात. पण हा प्रयोग अल्पजीवीच ठरला. बाकी मग पठडीतलं. आईवडिलांना आवडणाऱ्या म्हणजे मराठी कौटुंबिक, सामाजिक वगैरे चित्रपटांना त्यांच्या बरोबर जाणं आणि जे जमेल ते समजून घेणं याला फारसा पर्याय नव्हता. कोणते चित्रपट पहावे? असा प्रश्नविचारण्याइतकी व्हरायटीही उपलब्ध नव्हती. मुलगी असल्यामुळे भलत्या चथेटरात जाता येतं असली काही जाण असण्याची शक्यताही नव्हती. त्या मुळे‘चित्रपट कसा बघावा?’ असा प्रश्न पडण्याचा प्रश्नच नव्हता. तारुण्यात प्रवेश करेपर्यंत ही परिस्थिती बदलली. हिंदी चित्रपटांचं जग ओळखीचं झालं. इंग्रजी चित्रपटांचं अस्तित्व जाणवू लागलं. त्यातलं काम बघायचं हे ठरवण्याचं मर्यादित स्वातंत्र्य (अर्थातच वेळेची, पैशाची मर्यादा) मिळालं. तरीही आपणहून ॲडल्ट चित्रपटांना जाण्याचं धाडस नव्हतं. वडिलांनीच आपणहून एका ॲडल्ट-विज्ञान काल्पनिकेला नेल्याची आठवण मात्र आहे. हे असलं अचंबित करणारं काही

आपल्याला पुन्हा पहायला मिळेल का नाही कुणास ठाऊक अशा मूडमध्येच तो चित्रपट पाहिल्याचं आठवतं. मग पठडीतले प्रेमकहाण्यांचे हिंदी चित्रपट आवडण्याची दोनतीन वर्षं गेली आणि मॅटिनीला गुरुदत्त सापडला. पुढे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म लॅब सुरू झाला. तिथे चुकून कुणाबरोबर गेस्ट म्हणून जाऊन एखादा फ्रेंचचित्रपट पहायला मिळाला. पण... वो उस टाईममे हमारे बसकी बात नही थी.

मग अगदी वेगळेच श्याम बेनेगलांचे चित्रपट आले. लोजअपमध्ये तळागाळातल्या दु:ख दाखवणारे. त्या गोष्टींना ‘आवडल्या’ असं म्हणायची सुद्धाभीती वाटली होती तेव्हा. मराठीत असं काही पाहिलेलंच नव्हतं. अशा धक्का देणाऱ्या ‘अंकूर, आक्रोश’ बरोबरच बासू चटर्जी आणि बासू भट्टाचार्यही आले. एखादा ‘रायन्स डॉटर’ किंवा ‘सनफ्लॉवर’एकूण काम... तर काम बघायचं याची निवड आपल्या हातात असते इथपर्यंत समजेची मजल गेली. मग बऱ्याच मोठ्या वयात या सवयीच्या चित्रपटांपेक्षा वेगळे चित्रपट पाहिलेल्यांशी संपर्क आला. माझ्या सवयीच्या चित्रपटांना त्यांचे येणारे वेगळे प्रतिसाद समजायला लागले आणि ‘चित्रपट कसा बघावा?’ हा प्रश्न विचारता येतो इथपर्यंत मजल गेली. माझ्या गुरू-मैत्रिण श्यामला वनारसे यांना प्रश्न विचारून भंडावणं वगैरे. मग अशा सगळ्यांच होतं तेच. चित्रपट रसग्रहणाचा फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स करणं. सतीश बहादूर या अफलातून चित्रपट-शिक्षकाच्या शिकविण्याचा अनुभव घेणं ओघानंच आलं.

आताच्या मुलांना हाच प्रश्न विचारला तर काम होईल? तख विनोदबुद्धी असलेले आणि बालपणापासून चित्रपटपहात आलेले काही तरुण-तरुणी लगेच म्हणतील ‘थेटरात खुर्चीत बसून बघावा, नाहीतर घरात कोचावर पाम पसरून डीव्हीडी प्लेअरवर बघावा. होम थिएटर असेल तर तसाही बघावा. लॅपटॉप सहित लोळत यूट्यूबवर बघावा. तेही जमलं नाहीतर अगदी जत्रेतल्या तंबूत किंवा व्हीडिओ-पार्लरमध्ये व्हीडिओ प्रोजेटरवरून भिंतीवरसुद्धा बघावा ना. इतक्या गोष्टींचे ‘विषय’ झालेत आता, पिक्चर बघायचा विषय करू नका बुवा. लेट अस एन्जॉय देम.’ काय ही धिटाई! माटिपिकल प्रतिसादातून बाहेर आलो तर काही वेगळं दिसेल. यातला त्यांच्या नाराजीचा आणि उपरोधाचा भाग सोडला तर आपल्याला चित्रपटाच्या प्रेक्षकांमध्ये होत गेलेले बदलच दिसतील या त्यांच्या वक्तव्यातून. आज आपल्याला चित्रपटबघण्यासाठी साधनांचा इतका मोठा चॉईस आहे. मग त्यामुळे आपल्या आस्वादघेण्याच्या पद्धतीवरही परिणाम होत असेल ना! त्याकडे बघूया.

सुरुवातीच्या चित्रपटांतील हाल त्याप्रतिमा म्हणजे अचंबित करणारी गोष्ट होती. चित्रपटातील आगगाडी अंगावर येईल अशी भीती वाटण्याचे दिवस होते. तसंच चित्रपटातल्या संत तुकारायांना किंवा श्रीरामाला खरं मानून वंदन करण्याएवढीच समज होती. चित्रपट मध्यम जसं विकसित होत गेलं तसा प्रेक्षक विकसित होत गेला. चित्रपट समजण्यासाठी साक्षरतेसारखं विशेष कौशल्य आत्मसात करण्याची गरज नव्हती. त्या मुळे जीवनाचं हुबेहूब चित्रण प्रेक्षकांना समजायला सोपं वाटत होतं. पाहून पाहून ते जमत होतं. पण एक गोष्टमात्र बदलली नव्हती. ती म्हणजे कसल्याका होईना थेटरात अंधारातच बसून, मोठ्या पडद्यावर प्रेक्षक सिनेमा पहात असत आणि त्यांनी ते तसे बघावेत म्हणूनच ते तयार केलेले असत. आता मात्र चित्र बदललं आहे. थेटरात पाहण्यासाठी तयार केलेले चित्रपट आपण छोट्या, मध्यम, मोठ्या, आडव्या, चौकोनी कसल्या कसल्या पडद्यांवर अंधारात, अर्ध अंधारात, उजेडात, घरात, लहान हॉल्समध्ये, लबात कुठेही कसेही, केव्हाही बघतो. मध्ये चजेवतो, आवाजी प्रतिक्रिया देतो, फोन घेतो आणि तरीही मोठ्या तज्ज्ञतेनं अशा तऱ्हेनं पाहिलेल्या चित्रपटावर बोलतोही. आपल्या प्रेक्षक म्हणून होणाऱ्या घडणीतला हा महत्त्वाचा भाग. चित्रपट कसा बघावा? या प्रश्नाकडे ‘चित्रपट समजून कसा घ्या वा?’ या अर्थानं बघायच्या आधी शब्दश: अर्थ घेऊन पाहणंही तितकंच गरजेचं आहे. कारण आपण कसे, किती गांभीर्यानं किंवा आनंदानं रंगून चित्रपट पाहतो किंवा पहातनाही यावर आपली चित्रपटविषयक समजूत अवलंबून असणारच आहे. हे लक्षात घेतल्या वर चित्रपटाचा रंजन म्हणून आणि माहिती, विचारांच्या आदानप्रदानाचं साधन म्हणूनही आपल्या ला अधिक चांगला उपयोग करून घेता येईल . कलेचा व्यवसाय होतो तेव्हा असं ग्राहक प्रशिक्षणही आवश्यक असतंच ना!

आता परत आपल्या मराठी चित्रपटांच्या लाटेकडे वळू. सध्याच्या भाषाभिमानाच्या लाटेवर स्वार होऊन केवळ ‘आपले’ म्हणून कौतुकानं या बक्कळ निर्मितीकडे पहात गेलो तर या दर्जा राखण्याच्या कामात आपला प्रेक्षक म्हणून हातभार लागणं अवघड आहे. आपला‘श्वास’ ऑस्करवारीला गेला किंवा इतर काही चित्रपटांना परदेशी महोत्सवात पुरस्कार मिळाले याचं कौतुक आहेच; परंतु तेवढंच करत न बसता जरा विचार करूया. त्याच वेळी आपल्या सारखीच परिस्थिती असणाऱ्या देशांत आणि प्रगत देशांतही कसले चित्रपट बनले? ते आपल्या लापाहता आले तर पाहूया. ज्यांनी ते पाहिले त्यांना या कौतुकवाल्या चित्रपटांबद्दल काय म्हणायचंय तेही पाहूया. कारण आपल्या चित्रपटांचे आपणच रसिक-चिकित्सकप्रेक्षक झालो तर वेगल्या संस्कृतीतल्या वेगळ्या  चित्रपटांचा आस्वाद घेणं अधिक सोपं जाईल. जागतिकीकरणाच्या लाटेत अशी सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायलाच हवी आहे. सहिष्णुवृत्तीच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे आणि चित्रपट हे त्यासाठीचं नव्या दमाचं, नव्या जगातलं सशक्त माध्यम आहे. मग समजून घेऊया?

सिनेमातलं जग आणि जगातला सिनेमा.

Tags: marathi films cinema sushama datar सिनेमातलं जग आणि जगातला सिनेमा सुषमा दातार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके