...
शिमगा, पंचमीचा सण
येई आनंदा उधाण
नको कायद्याची खंत
करा शंखनाद मुक्त!
धन्य राज्य हे देवीचे
ऐका नगारे जगाचे
रॉकेलच झाले फस्त
करू शंखनाद मस्त!
खरा भारत खेड्यात
ऐका 'म्हाताऱ्या'चे वच
त्याचे शब्द जाती फुका
करू शंखध्वनी आता!
देवी होलिके तू आज
ऐक मनातील गूज
कढ जिरवले मनी
सुखे ऐक शंखध्वनी!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या