डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्य आले म्हणजे नेमके काय झाले ते मला कळले नाही. देशाची फाळणी का झाली, फाळणीमुळे काय होणार हेही मला समजले नाही. मात्र 'मुंबई समाचार' या गुजराती वर्तमानपत्रामध्ये मी मधूनमधून हिंदु-मुसलमान दंग्यांच्या बातम्या वाचल्या होत्या.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन…

राजकारणाबद्दल मला स्वातंत्र्यपूर्व काळात मुळीच आकर्षण नव्हते. मी वर्तमानपत्रही वाचीत नसे. माझ्या वडिलांचे बोहरी आळीत दुकान होते आणि त्या दुकानाच्या वरतीच आम्ही राहात होतो. आमचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध होते. परंतु राजकीय घटनांचे महत्त्व मला वाटत नसे. आमचा व्यापार हेच आमचे सर्वस्व असे. स्वातंत्र्य आले म्हणजे नेमके काय झाले ते मला कळले नाही. देशाची फाळणी का झाली, फाळणीमुळे काय होणार हेही मला समजले नाही. मात्र 'मुंबई समाचार' या गुजराती वर्तमानपत्रामध्ये मी मधूनमधून हिंदु-मुसलमान दंग्यांच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यात कोण मृत्युमुखी पडले यांची नावे असत. 

पुण्यात हिंदु-मुसलमान दंगा झाला नाही. परंतु वातवारणात तणाव होता. आमचा बोहोरी समाज राजकारणापासून अगदी अलिप्त असे. सुन्नी मुसलमान आम्हांला मुसलमान मानत नसत आणि हिंदू मात्र आम्हाला मुसलमान समजत या सर्व चमत्कारिक परिस्थितीमुळे पहिल्या स्वातंत्र्यदिनाची बेहोषी मला जाणवलीच नाही. मला आज जे आठवते ते इतकेच की मला, आमच्या समाजाला, असुरक्षित वाटत होते. भविष्यात काय घडेल ते समजत नव्हते. वातावरण धूसर होते आणि एका अनामिक चिंतेमुळे माझे मन अस्वस्थ होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाच्या उत्सवात मी सामील झालो नाही याचे आज वाईट वाटते.

Tags: मुसलमान हिंदु पुणे ताहेरभाई पूनावाला musalaman Hindu Pune Taherbhai Punawala weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ताहेरभाई पूनावाला

(1922 - 2017)

विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके