नुसती स्तुती नको. आपण केलेल्या नव्या उपक्रमांविषयी लिहावे. योग्य, इतरांना प्रेरणा देणाऱ्या मजकुरास जरूर प्रसिद्धी दिली जाईल. या सदरातूनही वाचकांना नवे काही मिळावे, हा हेतू आहे.
सेवा दल युवकांचे साहस
लक्ष्मीवाडीपासून जवळच असलेल्या निघोज शिवारातील श्री. विठ्ठल जगताप यांच्या शेतातील 4 परस विहिरीत लक्ष्मीवाडी येथील रहिवासी सी. मेहमूद्दा मयुद्दीन शेख ( 2 2 ) या महिलेने परच्या त्रासाला कंटाळून उडी मारली, हे बघून जवळपासच्या महिलांनी आरडाओरड केली. जवळूनच चाललेले भागवत काळे यांनी कपड्यानिशी विहिरीत उडी टाकली. पाणी चार पुरुष असूनही त्यांनी त्या महिलेस वर ओढुन आणले. या साहसाबद्दल सेवा दल युवक भागवत काळे यांचे अभिनंदन.
- अरुण पाटील, लक्ष्मीवाडी
*****
मालगुंड (रत्नागिरी) युवक शिबिर
येथील बळीराम परकर विद्यालयात राष्ट्रसेवा दलाचे 5 दिवस युवक नेतृत्व शिबिर उत्साहाने साजरे झाले. 15 ते 2 5 वयातील 50 युवक-युवतींनी त्यामध्ये भाग घेतला. उद्घाटन भाईसाहेब मयेकर यांनी केले. शामराव पटवर्धन, महेंद्र मोहन, भाई शेटपे, नंदिनी प्रकाश कांबळे, प्रभृतींनी मार्गदर्शन केले. विद्यारण्यातील सेवक वर्गाने शिबिराच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
- सदानंद परकर, रलागिरी
*****
मुकादम- पारितोषिक खरातांना
कर्मवीर कै. भाऊराव पाटील यांचे एक दानशूर सहकारी मुकादम यांचे चरित्र श्री. भंडारे गुरुजींनी लिहिले आहे. त्याचे प्रकाशन 2 9 जानेवारीला प्रा. ग.प्र.प्रधान यांचे हस्ते, पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुसूर येथे होईल. 'तराळ-अंतराळ चे लेखक श्री. खरात यांच्या पुस्तकाला 501 2 . पुरस्कार त्याच वेळी देण्यात येईल.
- सुरेश शिंदे, फलटण
*****
मी हे केले आहे
मी एक साधी गृहिणी. छोटी कार्यकर्ती. तपोवनातील ' मंगलकलश' योजना कुणालाही आवडेल. करता यईल. मुलांना कुष्ठरोगी आपले बांधव असल्याचे सांगून रोज 5 पैस त्यांच्या हातांनी एका ताब्यात जमा करावे व वर्षाचे 15 रुपये 'तपोवन'कडे पाठवावे, मुलांवर संस्कार होतील. मी असे 64 सभासद यंदा केले. त्यांचे 9605. तपोवनला पाठविले. हा नवा वसाच आहे.
- सौ. शशीताई लाड, मुंबई
*****
-नवे व्रत आपणास यशदायी व्हावे । ते अनुकरणीय आहे. अभिनंदन.
- सं
*****
तळवलकर मुलाखत आवडली
विनोबांवरचा 'विरून गेलेले विनोबा नावाचे आकाश', 'जानेवाला बाता नहीं' हा श्री. आण्णासाहेब जोशी यांचा लेख । इतर लेख आवडले. त्या अगोदर 2 3 ऑक्टोबरच्या साधनेतला 'चला पेख्या, उगवेल हाही केसा आवडला. साधनेचे अंक जपून ठेवतो.
चालू ( 18-1 2 -8 2 ) अंकातील नाना साहेब तळवलकरांची मुलाखत "ज्ञानदेव अक्षर दर्शन 'खुप आवडली.
– ल. ग. निमकर, विरार-पूर्व
*****
आंतर भारती विद्यालय संमेलन
चलकरंजीच्या या विद्यालयाचे संमेलन खा. मधु दंडवते यांच्या हस्ते संपन्न झाले. 'समाजाचे मर्म, वर्म समजून आपले कर्तव्यमान करणारे खरे क्रियाशील'-असे त्यांचे वर्णन आत्तार सरांनी केले. मुला-मुलींनी शिक्षणाच्या संधीचा योग्य फायदा करून घ्यावा, आंतर भारती कल्पना रूपाला आणावी, असे प्रा दंडवते यांनी सांगितले. म. फुले, भाऊराम पाटील, यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला अध्यक्ष नगरशेठ मदनलालजी बोहरा यांना शाळेच्या सतत घडपडीचे कौतुक केले.
- श्री. ढवळे, कोल्हापूर
*****
भावांजली
विनोबा,
तुम्ही गेलात तेंव्हा
श्वास सुटकेचा
सोडला आम्ही.
तसा तुमचा धाक
नव्हताच हल्ली
आम्हाला
केव्हातरी फार पूर्वी
भारावून गेलो होतो
तुमच्या उंचीने
पण,
गर्दीचा धुराळा,
खाली बसल्यावर,
डोळे चोळून पाहिल्यावर
आज
जाणवतं एकच
मरणावर
हे असं
निस्सीम प्रेम
जाता जाता
बुचकळून काढत,
गंगेच्या पाण्यातून
राहून जातात
सर्व वस्त्रे
काठावर
- मंजिरी गणपुले, सातारा
*****
टपाल सदरासाठी
नुसती स्तुती नको. आपण केलेल्या नव्या उपक्रमांविषयी लिहावे. योग्य, इतरांना प्रेरणा देणाऱ्या मजकुरास जरूर प्रसिद्धी दिली जाईल. या सदरातूनही वाचकांना नवे काही मिळावे, हा हेतू आहे.
- संपादक
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या