डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'कथा दोन गणपतरावांची ' रशियन लेखक निकोलाय गोगोल ह्यांच्या कथेवर आधारित असा हा चित्रपट मला अतिशय आवडला. चित्रपटाचे दिग्दर्शन, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर ह्यांचा उत्तम अभिनय, चित्रपटातील सुंदर संगीत आणि नर्मविनोद मला फार पसंत पडला.

गेल्या जुलै महिन्यात मॉस्को येथे 22 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वीपणे पार पडला. मॉस्को चित्रपट महोत्सवाची परंपरा 1959 सालपासून सुरू झाली तेव्हा पहिला चित्रपट महोत्सव भरला होता. त्यानंतर उलटलेल्या काळात भरलेल्या चित्रपट महोत्सवांना हजारों परदेशी चित्रपट निर्मात, अभिनेते-अभिनेत्र्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांना डझनावारी पारितोषिके बहाल करण्यात आली होती. फ्रान्समधील चित्रपट महोत्सवाएवढे त्याचे अधिष्ठान नसले तरीही जगात मॉस्को चित्रपट महोत्सवाला मोठी ख्याती लाभली. ह्या खेपेलाही महोत्सवात भाग घेण्यासाठी निरनिराळ्या देशांतून खूप पाहुणे आले होते. अमेरिकेचे अभिनेते रॉबर्ट देनिरो, फ्रान्सची अभिनेत्री कंथरिन देन्वेव, इटलीच्या झीना लोलोजीशीदा, सोफिया लॉरेन आणि इतर 'तारका’ हा महोत्सवात झळकून गेल्या. मॉस्कोमधील चित्रपट मंदिरात भारतीय चित्रपटही दाखविण्यात आले. 

सहाव्या दशकात पहिल्या प्रथम रशियात दाखवण्यात आलेल्या 'आवारा' ह्या हिंदी चित्रपटापासून रशियन प्रेक्षकांना भारतीय चित्रपटाची अत्यंत गोडी लागली त्यांतील नृत्य आणि गाणी, नट नट्यांचे अभिनय त्यांना खूप पसंत पडले. म्हणून ह्या महोत्सवात दाखवण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांकडे त्यांचे पुन्हा लक्ष वेधले गेले. मॉस्कोच्या केन्द्रभागी असलेल्या प्रशस्त चित्रपट मंदिरात भारतीय चित्रपटांचे प्रयोग चालू होते. त्यापैकी मराठी चित्रपट होता - 'कथा दोन गणपतरावांची ' रशियन लेखक निकोलाय गोगोल ह्यांच्या कथेवर आधारित असा हा चित्रपट मला अतिशय आवडला. चित्रपटाचे दिग्दर्शन, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर ह्यांचा उत्तम अभिनय, चित्रपटातील सुंदर संगीत आणि नर्मविनोद मला फार पसंत पडला. चित्रपटाच्या प्रयोगानंतर त्याच्या निर्मात्यांशी भेट झाल्याने माझे मन प्रफुल्लित झाले - मला वाटले की मी माझ्या प्रिय भारताला पुन्हा प्रत्यक्ष भेट दिली आहे.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पारितोषिके घोषित करण्यात आली. स्पर्धेसाठी सोळा चित्रपट नोंदवण्यात आले होते. मुख्य पारितोषिक अमेरिकन चित्रपट 'मार्विनची खोली’ (दिग्दर्शक जेरी जेक्स), खास पारितोषिक 'माता आणि पुत्र' ह्या रशियन चित्रपटाला (दिग्दर्शक अलेक्सन्द्र सकूरोव) बहाल करण्यात आले. काही अभिनेते आणि अभिनेत्या 'सेन्ट जर्ज' हे पारितोषिक प्राप्त करून घेऊन घरी परत गेल्या होत्या. 22 या चित्रपट महोत्सव रशियाच्या कठीण आर्थिक परिस्थितीत भरला होता ही गोष्ट इथे उल्लेख करावीशी वाटते. ह्याचा अर्थ असा की जटिल परिस्थितीला न जुमानता आंतरराष्ट्रीय मॉस्को चित्रपट महोत्सवाची परंपरा टिकून राहिली. दोन वर्षांनी  23 व्या नवीन वित्रपट महोत्सवाचे आगमन जरूर होईल असा विश्वास आहे, आम्ही त्याची वाट उत्सुकतेने पाहणार आहोत आणि त्यात भाग घेणाऱ्यांना म्हणणार आहोत : 'परदेशी पाहुण्यांनो! सुस्वागतम्!'

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके