डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपचारासाठी सामाजिक स्तरावर निधी संकलित करण्याचे ठरवले आहे. त्या हेतूनेच हे आवाहन करीत आहोत.

प्रा. तुळशीराम जाधव हे संगमनेर येथील लोकपंचायत या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम गेली सात/आठ वर्षे करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना स्पर्धा परीक्षेत पुढे आणणे, कलापथकाद्वारे शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण व स्थायी विकासात पाणलोट क्षेत्र विकास इत्यादी विषयांवर जनजागृती करणे, दारिद्र्‌य निर्मूलनाबाबत कृती कार्यक्रम राबविणे इत्यादी पातळीवर त्यांची धडपड चालायची. अशाच धडपडीत मोटारसायकलवर प्रवास करीत असताना त्यांना अपघात होऊन त्या अपघातात त्यांच्या मेंदूला जबरदस्त इजा होऊन मेंदूत रक्तस्राव झाला. त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्वरित उपचारासाठी नाशिकच्या कॅनडा केअर या हॉस्पिटलला अ‍ॅडमिट केले. तेथे त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया होऊन उपचार चालू आहेत.

जाधव सरांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. ज्या महाविद्यालयात ते व्याख्याते म्हणून नोकरी करतात ते विनाअनुदानित महाविद्यालय असल्याने पूर्ण पगार मिळत नाही, पण जो काही पगार मिळतो तोही वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत हा उपचाराचा खर्च करणे त्यांच्या आवाक्यातील गोष्ट नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपचारासाठी सामाजिक स्तरावर निधी संकलित करण्याचे ठरवले आहे. त्या हेतूनेच हे आवाहन करीत आहोत. कॅनडा केअर हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च एकूण 70 हजार रुपये सांगितला आहे. उपचारानंतरही त्यांच्या कौटुंबिक गरजासाठी वेगळा खर्च होणार आहे. तरी आपण आमच्या विनंतीचा विचार करून सदर उपचाराकरिता वैद्यकीय मदत करावी ही विनंती. चेक वा रोख रक्कम ‘लोक पंचायत’ संगमनेर, यांचे नावे पाठवावी.

पत्ता : लोक पंचायत, द्वारा, सारंग पांडे, शिवाजीनगर, संगमनेर, 422 605. जि. नगर.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके