डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आंतर भारतीला आता एका अनुभवी कार्यकर्त्याची जोड मिळणार आहे. अनेक भाषा त्यांना अवगत आहेत आणि प्रवासाची त्यांना हौस आहे. त्यांना या मनोवांछित कामासाठी आयुरारोग्य आणि उत्साह लाभावा ही सदिच्छा.

श्री. श्रीपाद जोशी यांनी 23 जानेवारी 1980 रोजी साठी ओलांडली. 

साठी ओलांडली असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटणार नाही इतक्या टुकीने त्यांनी आजवरचे आपले आयुष्य कंठले आहे.

आंतर भारतीचे कार्य सुरू झाले तेव्हा आचार्य भागवत यांच्या दिमतीला ते होते. 

श्रीपाद जोशींचा मन:पिंडच आंतर भारती वृत्तीचा! त्यांनी स्वतःच स्वतःचे जीवन कष्टाने घडवले.

आचार्य काकासाहेब कालेलकर यांच्याकडे वर्ध्याला अनौपचारिक शिक्षण घ्यायला ते गेले आणि आंतर भारती वृत्ती त्यांच्या अंगी बाणली.

तिथे बहुभाषिकत्वाची दीक्षा त्यांना मिळाली. हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली या भाषांची गोडी लागली. 

गांधीजींचा सहवास लाभला. त्यांच्या जीवन दर्शनाने त्यांना अभिमंत्रित केले. जातिधर्मातीत राष्ट्रवादाची दीक्षा त्यांना मिळाली.

काकासाहेब कालेलकर भारतातले अव्वल दर्जाचे घुमक्कड. श्रीपाद जोशींनाही प्रवासाचा चस्का लागला.

बेचाळीसच्या ‘चलेजाव’ चळवळीत दोन वर्षे त्यांनी तुरुंगात काढली.तिथे थोरामोठ्यांचा सहवास मिळाला. व्यक्तिमत्वाची घडण झाली. त्यांच्या मित्रपरिवारात अनेक मतपंथाची मंडळी आहेत, पण श्रीपाद जोशी कोणत्याच मतपंथाच्या जाळयात सापडले नाहीत.आपल्या मर्यादा आणि शक्ती जाणून त्यांनी आपला जीवनमार्ग आखला.आपण लेखन करू शकतो आणि आपले बहुभाषिकत्व त्याला उपयोगी पडणारे आहे हे त्यांनी हेरले आणि गेली चाळीस वर्षे अत्यंत मेहनतीने ते कार्य चालवले. त्यांचे लेखन कष्टसाध्य आहे. रसिकतेने जीवनाचा आस्वाद घ्यायचा, मूल्यांच्या संदर्भात मांडणी करायची आणि सुगम लिहायचे यामुळे त्यांच्या नावाने मराठीत साठ-सत्तर पुस्तके रुजू आहेत. त्यांच्या काही पुस्तकांची इतर भाषांतूनही भाषांतरे झालो आहेत. गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात येण्याची धडपड न करता त्यांनी हे साधले. प्रपंच नेटका केला. आता साठी ओलांडताना त्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. मध्यंतरी आंतर भारतीच्या प्रत्यक्ष कार्यात जो अंतराय निर्माण झाला होता तो आता दूर करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आंतर भारतीची बैठक तयारच आहे. लेखनामुळे व प्रवासामुळे बहुश्रुतताही आलेली आहे. आता आंतर भारतीसाठी कुठे जावे लागले तर त्यासाठी आवश्यक अशी मनाची उमेद आणि शरीराची साथ आहे. रोजची अशी कामे आता नाहीत. वेळ मोकळा आहे. वृत्तीही मोकळी आहे, मनाची मुराद पुरी करता येण्यासारखी इतर परिस्थितीही आहे. आंतर भारतीला आता एका अनुभवी कार्यकर्त्याची जोड मिळणार आहे. अनेक भाषा त्यांना अवगत आहेत आणि प्रवासाची त्यांना हौस आहे. त्यांना या मनोवांछित कामासाठी आयुरारोग्य आणि उत्साह लाभावा ही सदिच्छा.

Tags: आंतरभारती काकासाहेब कालेलकर #श्रीपाद जोशी Antar Bharati Kalelkar Kakasaheb Joshi Shreepad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके