डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

  • मुस्लिम सत्यशोधक मंडळ
  • दुष्काळ निवारण, निर्मूलन मंडळ : विनंती

मुस्लिम सत्यशोधक मंडळ 

मंडळाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर 4 व 5 जूनला हमाल भवन पुणे येथे होत आहे. उद्घाटक श्री.एस्.एम्.जोशी व 'मुस्लिम कायद्यात सुधारणा' या परिसंवादात प्रा.सत्यरंजन साठे, अैड.शेख अब्दुल प्रभूती भाग घेतील. स्त्रीमुक्तीविषयी प्रा. मुमताज रहिमतपुरे, कु.नजमा बांगी, विद्या बाळ, डॉ.नीलम गोऱ्हे आदी; तर 'जातीय दंगलीं'वर डॉ. बाबा आढाव, प्रा.अलिम वकील वगैरे बोलतील. 5 जूनला 'समाजप्रबोधना'वर श्री. विनायकराव कुलकर्णी, प्रि.डी.डी. अतार आदी, तर 'संघटनात्मक बांधणी'वर बाबूमिया बँण्डवाले बोलतील. शिवाजीनगर रेल्वेस्टेशन बस नं. 15 तर पुणे स्थानकावरुन 241 नं. च्या मार्गावर हमाल भवन आहे. भोजन-निवासाची सोय असून कार्यकर्त्यांनी तशी सूचना द्यावी असे सय्यदभाई कळवितात.

दुष्काळ निवारण, निर्मूलन मंडळ : विनंती 

दुष्काळ आ वासून गिळायला उठलेला. गलितगात्र जीवांचे तांडे शहराकडे निघाले आहेत. दुष्काळी कामे कोठे आहेत? ती पुरेशी आहेत काय? पिण्याच्या पाण्याचे काय, वैरण? असंख्य प्रश्नांवर सरकारी हालचाल हवीच, पण लोकांचा सहभाग हे खरे उत्तर आहे. 1952-53च्या दुष्काळात प्रा.घ.रा.गाडगीळांनी यासाठी एक समिती स्थापिली. 1965-66 मध्ये तिची पुनर्घटना केली. सर्व पक्ष, उद्योग मंडळे, सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी व तज्ज्ञ अशा 74 सभासदांच्या या समितीचे अध्यक्ष सध्या डॉ. वि.म.दांडेकर आहेत. विश्वस्त कायद्याखाली नोंदलेल्या या समितीने 1972-73 च्या दुष्काळात विविध भागांत निरीक्षक नेमले होते. दुष्काळी परिस्थितीची तपशिलवार माहिती समितीस देणे, हे त्यांचे काम. या दुष्काळातही निरीक्षक नेमायचे आहेत. नडीच्या वेळी पूरक धान्य, बी-बियाणे, प्रथमोपचार दूध केंद्रे, जनावरांसाठी खावटी केंद्रे. अशी मर्यादित मदत-कामे समिती करील. यासाठी आर्थिक मदत हवी. प्रत्येकाने उदारहस्ते मदत करावी, विशिष्ट भागात वा कारणावर आपली देणगी खर्च व्हावी असे कोणास वाटल्यास त्यांच्या इच्छेप्रमाणे देणगीचा विनियोग केला जाईल. जास्तीत जास्त इष्ट, युक्त प्रकारे समिती रकमेचा उपयोग करील, असे विनंतीपत्रक डॉ.आर.जी.रानडे, (ऑ.सेक्रेटरी, महा. राज्य दुष्काळ निर्मूलन मंडळ, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, पुणे 4) व डॉ.वि.म.दांडेकर यांनी काढले आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके