समाजाच्या सेवेचे काही काम, हाच धर्म! तोच यज्ञधर्म! मी पिकवीन, तुला देईन. तू विणून मला दे. सारे जण आपला विकास साधू!’
‘चहाला या! लवकर या!’ आमचे चित्रकार कडू उत्साहाने म्हणत होते, ‘तुमचे मुखपृष्ठ तयार झालेय्!’ फोन खाली ठेवला आणि कामात बुडून गेलो. आठवण झाली, तेव्हा धावतच कडूंकडे जाण्यासाठी बाहेर पडलो. कसला तरी मोर्चा आडवा आला. त्याला वळसा घालून पुढे जातो, तो लोकांचा आणखी एक गट ‘झालाच पाहिजे’- अशा गर्जना करीत पुढे उभा! त्यातून निसटलो, आणि अगम्य घोषणा देणाऱ्या आणखी चक्क दोन मोर्चांमधून जीव बचावून कडूंचे ऑफिस गाठले! ‘बघा! कसे झालेय चित्र!’- चित्रकार, ‘मी प्रत्यक्षच केले आहे!’ व्वा! सुंदर. बालमहोत्सवाची आनंद यात्रा. औरंगाबादेचे रस्ते. जीप. फेटा बांधलेली बालके. कानी जणू त्यांच्या आनंद घोषणा येऊ लागल्या: देशकी इज्जत- हम बच्चे! देशकी दौलत- हम सब बच्चे- देशका निर्माण हम करेंगे, हम करेंगे’- मोर्चे अनेक भेटतात.
पण हा हुरहूर लावणारा. हाही एक ‘मोर्चा’च! पण आनंदाचा. चित्रातल्या जीपवर स्वार झाल्यासारखे वाटले. वाचक हो! वाटते का महोत्सवात सामील व्हावेसे? चला तर, औरंगाबादच्या बालमहोत्सवाबद्दल यात काही लेख तुम्हाला भेटतील. ओढून नेतील आपल्याला त्यांच्या महोत्सवात नकळत आपणही म्हणू- ‘एक भारत माँग हमारी, काश्मीर हो या कन्याकुमारी!’ – ओव्हर टु औरंगाबाद!
------
गुरुजींचे अमृत बोल
‘हळूहळू सारे नाचू लागले. अग्निकुंड, देव, दानव, सारे नाचू लागले. ऐरावत, कल्पवृक्ष नाचू लागला. शेठ नाचू लागले. त्या नाचात त्रैलोक्य ओढले गेले. शेतकऱ्याच्या सेवा कर्मात, स्वधर्म आचरणात सर्वांना खेचून घ्यायची शक्ती! ज्ञानकिरणांच्या प्रकाश नारदांना कळाले. समाजाच्या सेवेचे काही काम, हाच धर्म! तोच यज्ञधर्म! मी पिकवीन, तुला देईन. तू विणून मला दे. सारे जण आपला विकास साधू!’
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या