संगमनेरचे प्रा.लामखडे यांनी 'महात्मा फुले. व्यक्ती व विचार' या विषयावर 17 डिसेंबरला तिसरे व्याख्यान दिले, 'कर्ते सुधारक यांचे जीवनकार्य सांगून ते म्हणाले,' फुल्यांनी सुरू केलेली कामगार चळवळ साम्यवादी- समाजवादी पुढे घेऊन गेले. फुल्यांच्या क्रांतिकारक विचारांचा स्वीकार कारण्यास एवढा काळ जाऊनही आपण पुरेसे समर्थ झालो नाही, ही खंत आहे.'
संगमनेर-अकोला परिसरातील आदिवासी-कामगार-पोतकरी वर्गासाठी संपूर्ण जीवन पाहिलेले कार्यकर्ते, व बेचाळीस आंदोलनातील थोर स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या स्मृतिविमानिमित्त संगमनेर शहरात 'प्रवरा व्याख्यानमाला' गेली दोन-तीन वर्षे योजिली जाते. दुर्वेनानांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यानुरूप व्याख्यान-मालेतील वक्ते व विषय ठरतात, समाजाचे वैचारिक प्रबोधन समाजवादी समाजनिर्मितीसाठी काही करू मागणाऱ्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन ही उद्दिष्ट समोर ठेवून व्याख्यानमालेच्या रूपाने नानांचे स्मरण साजरे केले जाते. यंदाचे व्याख्यानमालेचे तिसरे वर्ष. 13 डिसेंबर हा भास्करराव दुर्वे यांचा स्मृतिदिन. पण व्याख्यानमाला 15 ते 2 0 डिसेंबर अशी सहा दिवस पार पडली. इंदूताई केळकर, शं. नीलम गोऱ्हे, प्रा. मा. रा. लामखडे, श्री. मोहन धारिया, डॉ. अस्लिम पफील, भाई वैद्य, व एस. एम. जोशी यांनी यावर्षी व्याख्याने दिली. संगमनेरच्या सिद्धार्थ विद्यालयाच्या पटांगणात रोज सायंकाळी ठीक 700 वाजता व्याख्याने सुरू होत. श्रोत्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्तम असे. किमान चारशे ते एक हजार असे श्रोते दररोज या ज्ञानसत्राचा लाभ घेत.
पुण्याच्या प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्या इंदूताई केळकर यांनी व्याख्यानमालेचे उद्घाटन करून पहिले पुष्प गुंफले. 'स्वदेशीची पीछेहाट' या आपल्या विषयावर बोलताना इंदूताई म्हणाल्या, 'गांधीजींच्या नावाचा सर्वचजण उदो उदो करीत असताना स्वदेशीच्या विचारांची पीछेहाट होत आहे. खादो, ग्रामोद्योग, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील विकेंद्रीकरणाची कल्पना यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जाऊन पाश्चात्यांचे अंधानु-करण होते आहे. डॉ. लोहियांनी या स्वदेशी विचार-आचारांचा सतत आग्रह धरला, आज तसा कुणी नेता दिसत नाही. मातृभाषा-लोकभाषा यांचा आग्रह धरणे हा स्वदेशीचाच भाग आहे. इंग्रजीचे स्तोम नवी संस्कृती निर्मील, ती सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठावास्यांची संस्कृती. स्वदेशी तत्वज्ञान नव्या पिढीने स्वीकारावे.
दि. 16 ला क्रांतिकारी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांवरील अत्याचार व स्त्री-मुक्तीची चळवळ' या विषयावर आपल्या अनुभवांचे विचार मांडले. या व्याख्यानाविषयी महिलांमध्ये मोठी उत्सुकता. त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्त्री मुक्तीच्या चळवळीचा प्रारंभ ज्या म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी केला, त्यांना अभिवादन करून त्यांनी, स्त्रियांवरील होणारे अत्याचार केवळ बलात्कार विनयभंग कनिष्ठ वागणूक, छळवणूक एवढ्यापुरते मर्यादित नसून त्याचे अनंत प्रकार संभवतात, असे सांगितले. स्त्रीला अनेकदा अन्यायाची जाणीवच नसते. ती करून दिल्यावरही तिला ते पटत नाही. महिलांमध्ये काम करताना वेळोवेळी येणाया अनुभवांचे कथन त्यांनी केले. स्त्रीला दुसरी स्त्री कशी समजावून घेऊ शकत नाही हे सांगताना 'पती मारहाण करीत असे' अशा स्त्रीविषयी दुसऱ्या स्त्रिया ती पतीच्या शब्दाला प्रतिशब्द का देते? असे विचारीत, हा अनुभव त्यांनी सांगितला. शहरी स्त्रीने आपली व्यासपीठे निर्माण केलेली असली तरी ती पूर्णत: मुक्त नाही. ग्रामीण स्त्रीची स्थिती तर भयानक म्हणून स्त्रीने संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
संगमनेरचे प्रा.लामखडे यांनी 'महात्मा फुले. व्यक्ती व विचार' या विषयावर 17 डिसेंबरला तिसरे व्याख्यान दिले, 'कर्ते सुधारक यांचे जीवनकार्य सांगून ते म्हणाले,' फुल्यांनी सुरू केलेली कामगार चळवळ साम्यवादी- समाजवादी पुढे घेऊन गेले. फुल्यांच्या क्रांतिकारक विचारांचा स्वीकार कारण्यास एवढा काळ जाऊनही आपण पुरेसे समर्थ झालो नाही, ही खंत आहे.'
माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया अलीकडे फारसे बोलत नाहीत. पण या व्याख्यानमालेत 18 डिसेंबरला त्यांच्या 'मुक्त चितना' चा लाभ संगमनेरकरांना मिळाला. 'भारतीय लोकशाहीची दिशा' हा त्यांचा विषय. व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी आपण गेली दोन-तीन वर्षे कोणतेही जाहीर विचार न मांडता स्वातंत्र्योत्तर वाटचालीसंबंधी चितन करीत आहोत असे सांगितले. लोकशाही संसदीय की अध्यक्षीय, या वादासंबंधी ते म्हणाले, 'आमची संसदीय पद्धतीच योग्य आहे. डॉ. आंबेडकरांची घटना राबविण्यात आम्ही कमी पडतो आहोत म्हणून संसदीय पद्धतीला दोष देण्यात अर्थ नाही. एक मात्र जरूर होते की आम्ही लोकप्रतिनिधींसाठी घटना लागू झाल्यानंतर लगच एखादी 'आचार संहिता' कायद्याच्या रूपात मान्य करायला हवी होती. तिचा भंग करणारा लोकप्रतिनिधी हा आपल्या पदाला काही निश्चित काळासाठी अपात्र ठरला असता तर आजची पक्षांतर' परिस्थिती आली नसती. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची व्यवस्था जर निवडणूक आयोगाने केली असती, तर निवडणुकीतील पैशाचा प्रभाव व भ्रष्टाचार यांना आळा बसला असता. आज अनेक जटिल समस्या समोर उभ्या आहेत. त्या राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान ठरत आहेत. समाननागरी कायदा प्रारंभीच मान्य केला असता, तर अनेक गुंतागुंती मिटल्या असत्या. कुटुंबनियोजनासारखा प्रश्न पक्षातीत आहे. कुटुंबनियोजन सक्तीचे करा म्हटल्याबरोबर धार्मिक अडचणी पुढे करण्यात येतील, पण कुटुंबनियोजनाला पर्याय नाही.'
19 तारखेचे नियोजित वक्ते प्रा. ज. रा. शिंदे अडचणीमुळे येऊ न शकल्याने संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अलिम वकील यांनी 'राखीव जागांचा प्रश्न' या विषयावर आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. डॉ. वकिलानि या विषयावर एक ग्रंथ लिहिला असल्याने त्यांचा या प्रश्नावर बोलण्याचा मोठा अधिकार आहे. ते म्हणाले, 'जात हाच राखीव जागा व सवलतींचा निकष शकतो. आर्थिक पायावर या सवलती द्यायच्या ठरल्या तर ते अशक्य होईल. दलिताना मिळणाऱ्या सवलती म्हणजे मेहेरबानी नव्हे. तो त्यांचा अधिकार आहे. रेल्वे खात्याचा अपवाद वगळला तर अन्यत्र या जागा पूर्ण भरलेल्या आहेत असे दिसत नाही. त्या मरल्या असे दाखविले जाते तेही मोठे चलाखीचे असते. तिसऱ्या व चौथ्या श्रेणीत या जागा भरल्या जातात. मात्र प्रथमश्रेणीसाठी उच्चवर्णीयांची मक्तेदारी असते.'
व्याख्यानमालेची प्रकाशदायो ज्योत सतत तेवढी रहावी अशी कोणीही इच्छा करील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या