डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझा गणेश नाही मखरात मावणारा

सेनापती बापटांची ही आठवण, अहमदनगर जिल्ह्यात पारनेरला सेनापती आपल्या वडिलांकडे राहात होते त्यावेळी गावात झाडलोट करीत. वडिलांनी त्यांना विचारले, “तू हे कशासाठी करतोस?” ते म्हणाले, तुमचा गणपती देव्हाऱ्यात आहे, पण माझा गणपती सर्वत्र आहे, त्याची मी पूजा करतो.”

त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा 
माझा गणेश नाही मखरात मावणारा।। धृ0।।

नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी 
आरक्त सूर्य भाळीं सिंदूर लावणारा

मूर्ती अमूर्त त्याची रेखाल काय चित्रीं 
विज्ञानरूप सूत्रीं भूगोल ओवणारा

स्वार्थी लबाडं लोभी रोगी अपत्यकामी 
येता पवित्र धामीं हाकून लावणारा

भक्तांस नाकळे हा पोथीतुनीं पळे हा 
संशोधकां मिळे हा सत्यास पावणारा

आहे प्रकाशरूपं विश्वात कोंदलेला 
रेणूत कोंडलेला बुद्धीस भावणारा 

Tags: बुद्धी विश्व विज्ञान भूगोल मूर्ती सूर्य सिंदूर नक्षत्र गणपती पावनेर अहमदनगर Intelligence Mind Universe Science Geography Figurine Sun Sindur Star Ganapati Pawaner #Ahmednagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके