डिजिटल अर्काईव्ह

स्वीडनचे कलाकार स्वेन पुढेसन (62) सध्या तुरुंगात आहेत. जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा नकला करून त्या विकल्या, हा त्यांचा गुन्हा. स्वतः स्वेन मात्र आपल्या या कामगिरी'वर खूष आहेत. ते स्वतःलाच शाबासकी देऊन म्हणतात, 'वर्षानुवर्षे मी हा उद्योग करतोय. रेनो, रेनांसारख्यांच्या कलाकृतींच्या नकला मी केल्या, त्या खऱ्यासारख्या बिनबोभाट विकल्या गेल्या. एकाही 'जाणकारा'ची ओरड नाही आली! आता? 190 लाख डॉलर्सचा धंदा मी केला खरा': स्वेन हळहळतात एवढ्याकरिता की, 'मला पोटाला खायला मिळण्याखेरीज हाती काही लागले नाही. स्तुतीही बाली, पण दुसऱ्या नंबरची. आर्टिस्ट म्हणून शून्य!' सध्या तुरुंगातही ते स्वस्थ बसलेले नाहीत! 'तुरुंगातले खरे आयुष्य'- या विषयावर रेखाटने करताहेत. हीसुद्धा नक्कल नसली म्हणजे मिळवली।

ही पोथी कोणी रचली?

आमचे मुखपृष्ठ आवडले का? बाजूच्या! ‘जनलीलामृता'तल्या बोळी तर पहा. या ओळीचे कर्ते कोण, ओळखा पाहू

कोपलेल्या या जनतेचे महिषासुराचे मर्दन करतानाचे रूप मोठे दर्शनीय आहे. तरी आमचे चित्रकार म्हणाले होते, 'तिला दहा हात दाखवितो. पण म्हटले, नको. उद्या त्या प्रत्येक हातात अस्त्र दाखवाल. भाषण-स्वातंत्र्य, सभा-स्वातंत्र्य ही आयुधे तिने उगारल्याचे दाखवाल! पायांखाली वीस कलमी डोक्यांचा आणखी एक राक्षस चिरडाल; एवढे नको बुवा! आमच्या वाचकांना काय मुद्दाम सांगायला हवे काय, की 'संपादक' या शब्दापुढचेच नाव 'जन-लीलामृताचे कर्ते' म्हणून येईल, हे? बेळगाव विजयी दौऱ्यानंतर आणखी धावपळ करून झाल्यावर भल्या सकाळी या 'लीलामृता'ची रचना करण्यात आली, हे तरी काय सांगायला हवे? 'जनलीलामृता'चे आणखी अध्याय ऐकायला हवेत, नाही?

आता, हा 'दुसरा अध्याय, तर मग पहिला कोणता? 1977 चा पहिला अध्याय कोण विसरेल? वाचक हो, आमच्या 'सामान्य जनांच्या त्या असामान्य विजयाचा विसर कोणाला पडेल? काँग्रेसी राजवट मतपेटीने बदलून तुम्हीच तर तो अध्याय घडविला होता.

*****

रजनीशांचा अफलातून आश्रम

पुण्यातल्या रजनीश आश्रमाचे सध्याचे मुख्य, स्वामी बोधिसत्त्व. त्यांनी बातमीदारांना मोठ्या ऐकण्यासारख्या काही गोष्टी सांगितल्या. अमेरिकेतल्या ऑरगॉन राज्यात रजनीश आश्रमाने ठिय्या ठोकल्याचे आपल्याला माहितीच आहे, त्यांच्या त्या ठिकाणाचे नाव मुक्काम पोष्ट रजनीशपुरम सिटी तिथले कौन्सिल- नगरपालिकेसारखे- त्यांनी म्हणे अनेक नव्या प्रथा पाडल्या आहेत. हसू नका मंडळी- आपल्या म. न. पा. वगैरेची आठवण झाली काय? त्यांच्या प्रत्येक सदस्याने म्हणे सभा सुरू होताना आणि संपताना एकेक नवा कोरा विनोद सांगावाच लागतो! दुसरा ठराव ऐका : पोलिस खाते खतम. त्याच्याजागी 'पीस फोर्स.' म्हणजे 'शांतिसैन्य.' जेल, कायदा, नाही. का, तर त्यामुळे गुन्हयांची साखळीच बनते. मानवी जीवनाचा कस उतरतो. पोलिस म्हटले की (नाही म्हटले तरी) दंडका आठवतो ना? हे शांती सैनिक कसे प्रेमाने दुनिया जिकतील. सहानुभूतीने हवा शुद्ध राहतील. या सैनिकालाही 'बंधू बंदुकधारी 1' म्हणावे लागणार. अर्थात बंधूंनो आणि भगिनींनो, हे अमेरिकेत होते. इथे नाही. इथे आपले बंधू पोलीस 'बेधडक बेळगाव तरुण भारतच्या ऑफिसात घुसणार, दिसेल त्या पेपरवाल्याचे डोके फोडणार. काढा तुमचा पेपर रक्ताने भरुन. नाही का?

*****

आकाशवाणीवरच्या बातम्या

6 जानेवारीची गोष्ट, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे किल्ले ढासळल्याच्या बातम्यांचा पूर लोटला होता. तेस्तु गु देसम आणि कोतिरंगाच्या गुलालाने हवा भरून गेली होती. गंमत अशी की, आकाशवाणीला याचा पत्ताही नव्हता. किंवा, अधिक नेमके म्हणजे- त्यांना या विजयाच्या नगाड्यांचा आवाज फारच उशिरा ऐकू येत असावा. 'झडल्या भेरी, झडतो डंका'- पण लक्षात कोण घेतो? आगामी आसाम-मेघालय निवडणुकांच्या सर्व तपशीलांचे पहाट वळून झाल्यावर निवेदकाने या प्रचंड भीमपराक्रमी विजयाबद्दल सांगितले. इंदिरा कॉग्रेसच्या पराभवाच्या बातम्या देण्यात एवढी खळखळ का? त्रिपुरामधल्या काही जागा ई. कां.ने जिकल्या, त्यांचा एवढा पोर तोंडाने बडेजाव का सांगावा? आपला तो बाब्या-हे तर खरेच आहे, पण मग आकाशवाणीला 'ऑल इंदिरा' वाणी म्हटले तर चुकले कोडे? नभोवाणी मंत्री साळवे यांच्यापाशी काही उत्तर आहे काय?

*****

गुरुजींचे अमृत-बोल

 बरी श्रीमंती आता मला कळून आली आहे. भारताचा नव उदय होत आहे. आपलाही नवा जन्म झाला आहे. श्रीकृष्णाचे हातसुद्धा शेणामातीत मळले, तर माहौका नको? आपण एकादा लहान मळा करू.आपण कविता वाचतो; आता जीवनच काव्यमय करू.'

-'विधाम'मधून

*****

हुबेहूब!

स्वीडनचे कलाकार स्वेन पुढेसन (62) सध्या तुरुंगात आहेत. जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा नकला करून त्या विकल्या, हा त्यांचा गुन्हा. स्वतः स्वेन मात्र आपल्या या कामगिरी'वर खूष आहेत. ते स्वतःलाच शाबासकी देऊन म्हणतात, 'वर्षानुवर्षे मी हा उद्योग करतोय. रेनो, रेनांसारख्यांच्या कलाकृतींच्या नकला मी केल्या, त्या खऱ्यासारख्या बिनबोभाट विकल्या गेल्या. एकाही 'जाणकारा'ची ओरड नाही आली! आता? 190 लाख डॉलर्सचा धंदा मी केला खरा': स्वेन हळहळतात एवढ्याकरिता की, 'मला पोटाला खायला मिळण्याखेरीज हाती काही लागले नाही. स्तुतीही बाली, पण दुसऱ्या नंबरची. आर्टिस्ट म्हणून शून्य!' सध्या तुरुंगातही ते स्वस्थ बसलेले नाहीत! 'तुरुंगातले खरे आयुष्य'- या विषयावर रेखाटने करताहेत. हीसुद्धा नक्कल नसली म्हणजे मिळवली।

*****

यंत्रे नाही, आम्ही जगलो!

'टी. व्ही. नाही, फ्रीज्, कार नाही,' छोट्या नातीने आश्चर्याने आजीला विचारले, 'आजी, तुमच्या लहानपणी हे काहीच नव्हते? मग तुम्ही जगलात तरी कशा ग?'

'होय, आम्ही जगलो : स्वतःचे आयुष्य स्वतः जगलो बरे बाळे-आजीने हसत उत्तर दिले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी