डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परिशिष्टे (अपरिचित सत्यजित राय)

‘गोपी ग्याने बाघा ब्याने’ व ‘हिरक राजार देशे’ या सत्यजित राय यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा पुढील भाग संदीप राय यांनी ‘गोपी बाघा फिरे इलो’ या नावाने करावयास घेतला. त्या वेळी राय यांची प्रकृती खूप बिघडली होती तरी त्यांनी या सिनेमाचे मधुर संगीत तयार करून दिले. राय यांचे निधन झाल्यावर संदीपचा ‘उत्तोरण’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी सत्यजित यांनीच संगीत दिले होते.

1. राय यांचे इतरांच्या चित्रपटातील योगदान

सत्यजित राय यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. चौतीस चित्रपट आणि पाच वृत्तचित्रे एवढी विपुल निर्मिती त्यांनी केली. यापैकी सर्व चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. ‘तीन कन्या’ पासून पुढील साऱ्या चित्रपटांचे संगीत त्यांनीच तयार केले. आपल्या चित्रपटासाठी पात्र योजना तेच करीत, त्या पात्रांचे पोशाख कसे असावेत, याची चित्रे काढत एवढेच नव्हे तर अनेकदा बाजारात जाऊन त्यासाठी कापडाचीही स्वत:च निवड करीत. चित्रपटाची पोस्टर्स ते स्वत: काढत, जाहिरातीसाठी पत्रके तयार करीत. चित्रपटाशिवाय त्यांनी सुमारे चाळीस पुस्तकांचे लेखन केले, मुलांसाठी पुस्तके लिहिली, त्यांची चित्रे काढली, मासिकाचे संपादन केले. इतका प्रचंड व्याप असतानादेखील त्यांनी इतर अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या कामात सहकार्य केले. शिवाय बहुतेक वेळा ही मदत विनामूल्य असे. स्वत: चित्रपट बनविण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी 1948 मध्ये त्यांचे मित्र हरीसाधन दासगुप्ता यांच्या – Perfect Day या नॅशनल टोबाकोसाठी बनविलेल्या जाहिरातपटासाठी पटकथा लिहून दिली. याच हरीसाधन दासगुप्तासाठी त्यांनी 1957 मध्ये ‘The  Story of Tata Steel’ या वृत्तचित्रासाठी आणि 1960 मध्ये ‘Our Children Will Know each other Better.' या ‘डनलॉप’साठी बनविलेल्या जाहिरातपटासाठी व 1978 मध्ये ‘The brave Do not Die' साठीदेखील पटकथा लिहिल्या.

1965 मध्ये नित्यानंद दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बक्सा बदल’ या सिनेमाची पटकथा व संगीत राय यांनी तयार केले होते.

राय यांचा आवाज अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यांनी स्वत:च्या अनेक वृत्तचित्रांसाठी commentary केली आहे. याशिवाय फिल्म्स डिविजनच्या ‘Creative Artists of India' 1963 या बी.डी. गर्ग दिग्दर्शित वृत्तचित्रासाठी तसेच Tidal Bore 1967 या विजया मुळे दिग्दर्शित अनुबोध पटासाठी आणि 'Max Muller' 1973 या दिग्दर्शक John Thiel दिग्दर्शित वृत्तचित्रासाठी त्यांनी आपला आवाज दिला.

चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्त हे राय यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्या ‘Glimpses of West Bangal' 1967, ‘गंगासागर मेला’ 1970 आणि ‘दार्जीलिंग’ 1974 या वृत्तचित्रांना राय यांनी अप्रतिम संगीत दिले.

हे सारे सत्यजित यांचे जवळचे मित्र होते, मात्र 1965 च्या ‘शेक्सपिअरवाला’ या चित्रपटाची कथा आणखी वेगळीच आहे. जेम्स आयव्हरी दिग्दर्शित या चित्रपटात शशी कपूर आणि त्याची पत्नी जेनिफर कपूर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे निर्माते त्या वेळी खूप आर्थिक अडचणीत होते. त्यांनी राय यांना या चित्रपटासाठी संगीत देण्याची विनंती केली. यावेळी राय ‘चारुलता’ हा त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट तयार करीत होते. मात्र निर्मात्यांची अडचण पाहून त्यांनी वेळात वेळ काढून हा सिनेमा पाहिला व तो त्यांना आवडल्यामुळे त्याचे संगीत देण्याचेही मान्य केले. सत्यजित यांच्या पत्नी विजयाबाई यांनी लिहिले आहे की यासाठी राय यांनी कसलाही मोबदला घेतला नाही. राय यांनी या सिनेमासाठी इतके अप्रतिम संगीत दिले की, जेव्हा या संगीताची रेकॉर्ड निघाली तेव्हा अनेक दिवस ती अमेरिकेतील बेस्ट सेलर रेकॉर्डच्या यादीत होती. राय यांनी संगीतामुळे सिनेमाचे रूपच पालटून टाकले.

संदीप हा सत्यजित राय यांचा मुलगा. तो अनेक वर्षे वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करीत होता. जेव्हा त्याने स्वत: चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरविले, तेव्हा त्याने राय यांचीच ‘फटीकचंद’ ही कथा निवडली. या कथेवर सत्यजित यांनी त्याला पटकथा लिहून दिली आणि त्यासाठी संगीतही दिले.

पुढे 1985 ते 1987 च्या दरम्यान संदीप राय याने दूरदर्शनसाठी ‘सत्यजित राय प्रेजेंट’ ही हिंदी मालिका करण्याचे ठरविले. दोन सीझनमध्ये दाखविल्या गेलेल्या या मालिकेतील सर्व भागांच्या पटकथा सत्यजित यांनी लिहिल्या होत्या व त्याचे संगीत दिग्दर्शनही केले होते. पहिल्या भागात ‘किस्सा काठमांडू का’ ही एकच दीर्घ कथा होती. तिच्यात फेलुदा या जासूसचे काम शशी कपूर याने केले होते. मोहन आगाशे आणि उत्पल दत्त यांच्याही त्यांत महत्त्वाच्या भूमिका होत्या. दुसऱ्या भागातील विविध कथांत अमोल पालेकर, सुप्रिया पाठक, अन्नू कपूर, श्रीराम लागू वगैरेंनी विविध भूमिका केल्या होत्या.

‘गोपी ग्याने बाघा ब्याने’ व ‘हिरक राजार देशे’ या सत्यजित राय यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा पुढील भाग संदीप राय यांनी ‘गोपी बाघा फिरे इलो’ या नावाने करावयास घेतला. त्या वेळी राय यांची प्रकृती खूप बिघडली होती तरी त्यांनी या सिनेमाचे मधुर संगीत तयार करून दिले. राय यांचे निधन झाल्यावर संदीपचा ‘उत्तोरण’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी सत्यजित यांनीच संगीत दिले होते.

2. राय वंश वृक्ष

मूळ पुरुष - रमाकांत मजुमदार राय

लोकनाथ राय

कालीनाथ पत्नी जयतारा

शरद रंजन, उपेंद्र किशोर पत्नी विधुमुखी

आणखी तीन मुले एक मुलगी

सुकुमार पत्नी सुप्रभा  पुण्यलता  सुविनय  सुविमल

सत्यजित पत्नी विजया

संदीप पत्नी ललिता

सौरवदीप

3. चरितकहाणीतील ठळक घटना व मानसन्मान

12 मे 1863 : सत्यजितचे आजोबा उपेंद्रकिशोर राय यांचा जन्म

30 ऑगस्ट 1887 : वडील सुकुमार राय यांचा जन्म

20 डिसेंबर 1915 : उपेंद्रकिशोर राय यांचा मृत्यू

27 ऑगस्ट 1917 : पत्नी विजया दास यांचा जन्म

2 मे 1921 : सत्यजित राय यांचा जन्म

10 सप्टेंबर 1923 : वडील सुकुमार राय यांचे निधन

1936 : सत्यजित मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण

1940 : सत्यजित राय बी.ए. उत्तीर्ण

1940 : चित्रकलेच्या शिक्षणासाठी शांतिनिकेतन मध्ये प्रवेश

7 ऑगस्ट 1941 : रवीन्द्रनाथ टागोर यांचे निधन 

1942 : शांतिनिकेतनचा निरोप एप्रिल

1943 : D. J. Keymer Co मध्ये चित्रकार म्हणून नोकरी सुरू.

5 ऑक्टोबर 1947 : भारतातील पहिल्या फिल्म सोसायटीची स्थापना

3 मार्च 1949 : विजया दास यांच्याशी लग्न

एप्रिल ते जून 1950 : इंग्लंडचा प्रवास व वास्तव्य

8 सप्टेंबर 1953 : मुलगा संदीप याचा जन्म

1953 : ‘पथेर पांचाली’ या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात

26 ऑगस्ट 1955 : ‘पथेर पांचाली’ प्रदर्शित

1956 : ‘पथेर पांचाली’ला कान अंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक

1959 : पद्मश्री पुरस्कार

1959 : संगीत नाटक अकादमी पुरस्कार

1966 : पद्मभूषण

1967 : मेगेसेसे पुरस्कार

1971 : Yugoslav Star with Golden Wreath पुरस्कार

1973 : डी.लिट. दिल्ली विश्वविद्यालय

1976 : पद्म विभूषण

1978 : डी. लिट. ऑक्सफोर्ड विश्व विद्यालय

1980 : डी.लिट. बरद्वान विश्व विद्यालय डी. लिट. जाधवपूर विश्व विद्यालय

1981 : डी.लिट. बनारस हिंदू विश्व विद्यालय

1982 : विद्यासागर स्मृती पुरस्कार

1985 : दादासाहेब फाळके पुरस्कार

1985 : फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘लिजन ऑफ ऑनर’

1992 : विशेष ऑस्कर सन्मान

1992 : भारतरत्न 23 एप्रिल

1992 : महानिर्वाण

4. दिग्दर्शित चित्रपट व महत्त्वाची पारितोषिके

पथेर पांचाली : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली / ‘बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट’ कान महोत्सव / व्हाटिकन अवॉर्ड, रोम / गोल्डन लॉरेल, बर्लिन

अपराजितो : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली / गोल्डन लोयन, व्हेनिस / गोल्डन लॉरेल, यू.एस.ए./ गोल्डन लॉरेल, बर्लिन

जलसाघर : राष्ट्रपती रौप्य पदक, दिल्ली.

अपूर संसार : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली./ डिप्लोमा ऑफ मेरीट, एडिनबरो/ बेस्ट फोरिन फिल्म, यू.एस.ए.

देवी : राष्ट्रपती रौप्य पदक, दिल्ली.

तीन कन्या : राष्ट्रपती रौप्य पदक, दिल्ली/ गोल्डन बूमरंग, मेलबॉर्न/ गोल्डन लॉरेल, बर्लिन

रवींद्रनाथ टागोर : सुवर्णपदक, दिल्ली/ गोल्डन सील, लोकार्नो

अभिजान : राष्ट्रपती रौप्य पदक, दिल्ली.

महानगर : सिल्व्हर बीअर, दिग्दर्शनासाठी बर्लिन

चारुलता : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली,/ सिल्व्हर बीअर, दिग्दर्शनासाठी बर्लिन/ कॅथोलिक अवार्ड, बर्लिन

नायक : स्पेशल ज्युरी अवार्ड, बर्लिन

गोपी ग्याने बाघा ब्याने : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली,/ मेरिट अवार्ड, टोकियो/ बेस्ट फिल्म, मेलबॉर्न.

प्रतिद्वंदी : राष्ट्रपती रौप्य पदक, दिल्ली.

सीमाबद्ध : राष्ट्रपती सुवर्णपदक, दिल्ली/ पिप्रेस्की अवार्ड, व्हेनिस

अशानी संकेत : बेस्ट रिजनल फिल्म, दिल्ली/ गोल्डन बिअर, बर्लिन, गोल्डन बिअर, शिकागो

सोनार केला : राष्ट्रपती रौप्यपदक, दिल्ली

जन अरण्य : सर्वोत्तम दिग्दर्शन, दिल्ली/ स्पेशल अवार्ड, कार्लोवी वारी

शतरंज के खिलाडी : सर्वोत्तम हिंदी चित्रपट, दिल्ली/

जय बाबा फेलूनाथ :सर्वोत्तम बाल-चित्रपट, दिल्ली/ बेस्ट फिल्म, केपस घेपस

हिराक राजार देशे : सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गीते, दिल्ली/

सद्गती : स्पेशल ज्युरी अवार्ड, दिल्ली

घरे-बाईरे : सर्वोत्तम बंगाली चित्रपट, दिल्ली

गणशत्रू : सर्वोत्तम बंगाली चित्रपट, दिल्ली

आगंतुक : सर्वोत्तम चित्रपट व दिग्दर्शन, राष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्ली.

5. लेखक सत्यजित राय

अ) चित्रपट विषयक लेखन आणि आठवणी

Bisay Chalachchitra (On Cinema), 2nd edn, nanda Pubs, 1982 (articles in Bengali)

Childhood Days, Bijoya Ray, trans., Delhi: Penguin,

My Years with Apu, Delhi: Penguin, 1994/ London: Faber and Faber, 1997 (memoir)

Our Films Their Films, Delhi: Orient Longman, 1976

ब) कथा कादंबरी वगैरे

सत्यजित राय यांच्या अनेक कथा व कादंबऱ्या प्रथम ‘संदेश’ किंवा ‘देश’ आणि ‘आनंद मेला’ या मासिकांत प्रकाशित झाल्या. नंतर त्या ‘आनंद पब्लिशर्स’ कलकत्ताने पुस्तकरूपात प्रकाशित केल्या. 1981 साली राय यांनी स्वत: आपल्या ‘संदेश’मधील निवडक कथांची निवड केली व ती आवृत्ती ‘सेरा संदेश’ या नावाने प्रकाशित झाली.

क) फेलुदा आणि प्रोफेसर शंकू कथा :

फेलुदा या पात्राला मध्यवर्ती ठेऊन सत्यजित यांनी 35 लघु कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी पहिली 1965 साली तर शेवटची 1992 साली प्रकाशित झाली. त्याचप्रमाणे प्रो. शंकू या पात्राभोवतीची त्यांची पहिली कथा 1964 साली तर शेवटची 1990 साली प्रकाशित झाली. या साऱ्या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये अनुवादित झाल्या आहेत.

Complete Adventures of Feluda, Volumes 1 and 2, Chitrita Banerjee and Gopa Majumdar, trans, Delhi: Penguin, 2000 Am{U "The Incredible - dventures of Professor Shonku, Surabhi Banerjee, trans., Delhi: Penguin, 1994'

याशिवाय राय यांनी काही भयकथा व विस्मयकथाही लिहिल्या आहेत. त्यांच्या निवडक 49 कथांचे ‘Satyajit Ray-The collected Short Stories' या नावाने  Penguin यांनी 2012 साली पुस्तक प्रकाशित केले आहे.

6. निवडक संदर्भ ग्रंथ

Marie Seton : portrait of a Director: Satyajit Ray, Vikas Publications, 1972

Chidanand Das Gupta : The Cinema of Satyajit Ray, Vikas publications, 1980

Pauline Kael : I lost it at Movies, Lowe and Bryden, London

Robin Wood : The Apu Trilogy: Praeger Publications, New York, 1971

Bijoya Ray : Manik and I, Penguin Books, 2012

Sandip Ray Ed : Satyajit Ray's Ravi Shankar, Collins, 2017

Sandip Ray Ed: Travails with the Alien, Harper Collins, 2018

Sandip Ray : Ed Pather Panchali Sketchbook, Harper Collins, 2016

Andrew Robinson : Satyajit Ray: The Inner Eye, Second Edition, 2004, I B Tauris and Co. London and New York

Darius Cooper : The Cinema of Satyajit Ray, Cambridge Un. Press, 2000

John W Wood : Beyond the World of Apu, Orient Longman, 2008

Jayanti Sen: Looking Beyond, Roli Books, 2012

Nemai Ghosh : Satyajit at 70, Eiffel Edition

Nemai Ghosh : Manikda : Harper Collins, 2011

Bijoya Ray : Satyajit Ray at Work, Roli Books

Ben Nyce : Satyajit Ray : A Study of His Films

Aloke Mitra : Ray

Suranjan Ganguli : In Search of the Modern

Soumitra Chatarji : Master and I, Supernova Publications, 2014

Madhavi Mukharji : My Life My Love, The Stanford Theatre Foundations, California

Bidyut Sarakar : The World of Satyajit Ray, University Press, 1002

Tarapad Banarji : A Portrait in Black and White Surabhi Banarji : Satyajit Ray Beyond the Frame

Devapriya sanyal : Through the Eyes of a Cinematographer : A Biography of Soumendu Roy, Harper Collins, 2017

विजय पाडळकर : ‘गगन समुद्री बिंबले’, 2016, राजहंस प्रकाशन, पुणे 

7. सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

Tags: सिनेमा सत्यजीत राय कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar t cinema bhartiy chitrapa bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके