डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विधवांना कुंकू लावणं : राजस्थानी महिलांचा एक सामाजिक उपक्रम

एक दिवस माझ्या ओळखीच्या बार्शीच्या सामाजिक कार्यकर्त्या वीणाताई (डॉ. वीणा सुराणा) पुण्याला आल्या आणि फोनवर मला विचारू लागल्या, 'बार्शीची माझ्या परिचयातली सुधा लोढा सध्या पुण्यात राहत असून तिच्या महिलामंडळातर्फे कुंकू लावणे हा उपक्रम करते. त्यात सहभागी होण्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही आज याल का?" माझ्या एकदम काहीच लक्षात येईना- कुंकू लावणं हा काय प्रकार असावा याबद्दल! पण उत्सुकता जाणून मी ताबडतोब होकार देऊन वीणाताईकडे गेले आणि आम्ही दोघी मिळून सातारा रोडवर आतल्या बाजूला असलेल्या सुधालाई लोढा पांच्या घरी जाऊन पोचलो.

एक दिवस माझ्या ओळखीच्या बार्शीच्या सामाजिक कार्यकर्त्या वीणाताई (डॉ. वीणा सुराणा) पुण्याला आल्या आणि फोनवर मला विचारू लागल्या, 'बार्शीची माझ्या परिचयातली सुधा लोढा सध्या पुण्यात राहत असून तिच्या महिलामंडळातर्फे कुंकू लावणे हा उपक्रम करते. त्यात सहभागी होण्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही आज याल का?" माझ्या एकदम काहीच लक्षात येईना- कुंकू लावणं हा काय प्रकार असावा याबद्दल! पण उत्सुकता जाणून मी ताबडतोब होकार देऊन वीणाताईकडे गेले आणि आम्ही दोघी मिळून सातारा रोडवर आतल्या बाजूला असलेल्या सुधालाई लोढा पांच्या घरी जाऊन पोचलो.

तिथे 20-22 स्त्रिया जमल्या होत्या. त्यातली एक प्रौढ, तरतरीत आणि हसतमुख स्त्री हात जोडून पुढे आली आणि म्हणाली, 'मी सुधा लोढा. या इथं जमलेल्या स्त्रिपा 'सत्य-साधना' महिलामंडळाच्या आहेत. आम्हाला आज कांताबाईना कुंकू लावायला जायचं आहे. त्यांचे पती नुकतेच म्हणजे 12 दिवसांपूर्वी वारले आणि आमच्यापैकी काहीजणांनी दोन तीनदा तरी त्यांच्या घरी जाऊन कांताबाईंना व त्यांच्या स्त्रीपुरुष कुटुंबीय मंडळींना भेटून त्यांना कुंकू लावण्याबद्दल समजावून, पटवून दिलं आहे. आज तेराव्यानिमित्त त्यांच्या घरी शोकमिलन आहे, तिथे सर्वांसमक्ष विधवा कांताबाईंना कुंकू लावायचे आहे.

आम्ही जमलेल्या सगळ्याजणी कांताबाईंच्या घरी पोचलो तेव्हा शोकमिलनाची जी वेळ ठरलेती होती त्यापेक्षा तिथे पोचायला आम्हांला पंधरावीस मिनिटं उशीर झालेला होता. तेव्हा सुधाताईंनी गेल्या गेल्या उशीर झाल्याबद्दल अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त केली. काही स्त्रीपुरुष शोक व्यक्त करून निघूनही गेले होते. तर उपस्थित असलेले शेजारीपाजारी, नातेवाईक व आम्ही सर्वजणी एका खोलीत बसलो. तिथे आधीपासूनच एक स्त्री घुंपट ओढून खाली मान घालून बसलेली होती. 

त्याच कांताबाई, अशी ओळख करून देण्यात आली. लगेच सुधाताईंनी एका वाटीत लाल कुंकू (पूड) आणलं होतं ते कांताबाईच्या मोकळ्या कपाळावर, जरा घुंघट बाजूला सारून लावलं. शिवाय एका वाटीत ओली मेंदी होती, तीही त्यांच्या हाताला लावली. मग कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. फोटो, चहापान झाल्यानंतर एकेकट्याने कांताबाईंजवळ जाऊन शोक व्यक्त केला आणि हा कार्यक्रम संपला. 

मी घरी आले पण मनात प्रश्नचिन्ह घेऊनच. मृत पतीच्या भर तेराव्याला विधवेला तिच्या घरी जाऊन सर्वांसमक्ष कुंकू लावायचं- चालू रूढीविरोधी काही करायचं - म्हणजे केवढा साहसी सामाजिक कार्यक्रम. मी प्रभावित तर झालेच, शिवाय अशा प्रकारचा कार्यक्रम इताक्या सहज आणि साध्या पद्धतीने पार पडलेला पाहून चकितही झाले.

लवकरच मग मी एकदा सुधाताईंना गाठलं. आमच्यामध्ये त्यांच्या कार्याबद्दल खालील प्रश्नोत्तरे झाली.

मी - सुधाताई, प्रथम मी तुम्हाला आणि तुमच्या महिला मंडळाला हा कुंकू लावायचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देते. आता मला सांगा की हा विधवांना कुंकू लावण्याचा उपक्रम तुम्हाला कसा आणि कधी सुचला?

सुधाताई - सन 1975 च्या आसपास बॅ. सुनीती पुंगलिया यांनी पुण्यात राजस्थानी महिलांची परिषद घेतली होती. तेव्हा तिथे सौभाग्यवती व विधवा असा भेद न पाळता सर्वांना कुंकू लावण्यात आले पाहिजे, अशी सूचना केली गेली होती. त्याचप्रमाणे नगरचे जैन धर्मगुरु राष्ट्रीय संत आनंद ऋषीजी यांनी पण कुंकू हे सौभाग्यलेणे वगैरे काही नसून ते सर्व स्त्रियांसाठी शक्तीचं प्रतीक आहे असं केलेलं प्रतिपादन ऐकण्यात आलं होतं. मी स्वतः लहानपणापासूनच माझे वडील बार्शीचि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. नगराजभाई पुनामिया पांच्या घरात वाढल्यामुळे माझे विचारही या दिशेने हळूहळू अनुकूल होत गेले होते. 

मी राष्ट्र सेवा दलात पण जात असे. शिवाय माझ्या वडिलांचे गुरू आणि नंतर मीही ज्यांना गुरू मानीत आले, त्या वर्धेजवळच्या बोरगाव येथील सत्याश्रमाचे स्वामी सत्यभक्तजी यांच्या विचार आणि आचारसरणीचा माझ्यावर मोठाच प्रभाव पडलेला आहे. स्वामी सत्यभक्तजींनी स्त्री व पुरुष या दोन जाती नसून ती जीवनातील दोन पूरक अंगे आहेत, नर-नारी समभाव व जसे विचार तसे आचार ही विचारसरणी व्यवहारात आणण्यासाठी चालू अंधरूढी व रीतीरिवाजात बदल घडवून आणले पाहिजेत, असं प्रतिपादलं आहे. 

पुरुष विधुर झाला तर समाजाच्या दृष्टीने त्याच्या रोजच्या जीवनात, वागण्याच्या चालीरितीत काहीच फरक पडत नाही. परंतु स्त्री विधवा झाली तर तिचन जिणं कठीण होऊन जातं. पतिनिधनानंतर तिला विद्रूप न करता ती जशी विवाहाआधी दिसत होती तशीच दिसली पाहिजे आणि एक माणूस म्हणून आपलं स्वत:चं अस्तित्व टिकवून तिला स्वतंत्र जीवन जगता आलं पाहिजे ही विचारसरणी स्वामीजींनी मांडलेली आहे. या सर्व विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही तीनचारजणींनी मिळून तेव्हा 1984 साली 'सत्य साधना' महितामंडळाची स्थापना केली तेव्हा हळूहळू मंडळातर्फे एक चालू रूढी रीतिरिवाजात सुधारणा करण्याचा कार्यक्रम म्हणून हा विधवांना कुंकू लावण्याचा सामाजिक उपक्रम हाती घ्यायचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे सर्वसंमतीने 1989 साली ठराव पास करून घेतला. 

त्या नंतरच्या काळात म्हणजे गेल्या तीन वर्षात आम्ही कुंकु लावण्याचे 15 तरी यशस्वी कार्यक्रम केले आहेत. शिवाय स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे आम्ही विवेक व विनय यांची कास न सोडता संबंधित लोकांना समजावून त्यांचे मतपरिवर्तन करून हा कार्यक्रम अमलात आणण्याचा प्रयत्न करतो. विधवांना कुंकू लावलेल्या घरी वेळोवेळी जाऊन या कार्यक्रमामुळे तिथे काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांचाही निराकरण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच अशा घरांशी आम्ही संबंध जोडून असतो.

मी - तुमच्या पहिल्या यशस्वी कार्यक्रमाबद्दल जरा विस्ताराने सांगता का?

सुधाताई -  पुण्यातील जुने सामाजिक कार्यकर्ते श्री. परशुरामजी चोरडिया आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सुलभाबाई चोरडिया सर्व प्रकारच्या सामाजिक कामांत पुढाकार घेऊन मदत करीत असत. त्यातच श्री.परशुरामजी चोरडिया यांचे वृद्धत्व आल्यामुळे निधन झाले. तेव्हा आम्ही वृद्ध सुलभाबाईंबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनाही सुलभाबाईंनी कुंकू लावले पाहिजे हे पटवून देऊ शकलो. या कामात सुलभाबाईंची भाची श्रीमती आशा बलदोटा यांची खूप मदत झाली. या पहिल्या यशस्वी घटनेने आम्ही अधिक उत्साहित झालो. वयस्क सुलभाबाई स्वतः नंतरच्या प्रत्येक कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात अग्रभागी राहून सहभागी होत राहिल्याने आम्हांला मानसिक बळ मिळत राहिले. सुलभाबाईंना कुंकू लावण्याच्या घटनेचा 'संगम' नावाच्या मासिकात 'सामाजिक क्रांती पूनामें' असा उल्लेख स्वतः स्वामी सत्यभक्तजींनी केला आहे.

मी - आणि ज्या घरी अपयश आलं तिथे ते कोणत्या कारणामुळे आलं असं वाटतं? वय, शिक्षण, सांपत्तिक स्थिती यावर काही अवलंबून आहे का?

सुधाताई - सात आठ ठिकाणी तरी अयशस्वी ठरलो, पण नेमकं कारण नाही सांगता येणार. एका घरी विधवा वृद्ध होती तर घरची माणसं म्हणाली की यांना कुठे आता कुंकू लावून नाचायचे आहे? तेव्हा काही नको. आम्ही म्हणालो की आम्ही सर्वजणी कुंकू लहानपणापासून लावतो आहोत तर शुभ-अशुभाच्या कल्पना सोडून द्यायच्या आहेत म्हणून कुंकू लावत रहायचं. आमचे म्हणणे एवढंच की स्त्री जर लग्नाआधीपासून कुंकू लावत असेल तर तिला ते पतिनिधनानंतरही लावता आलं पाहिजे. तिला हवी ती रंगीत साडी नेसता आली पाहिजे. तिने विद्रूप होता कामा नये.

अशिक्षित स्त्रियांना समजावून देणं आम्हांला सोपं वाटतं. उलप काही सुशिक्षित स्त्रियांची मतन या याबाबतीत इतकी घट्ट झालेली आहेत की त्यांना ही कुंकू लावण्याची गोष्ट आम्हाला पटवता आलेली नाही.

एका गरीब घरी गेलो असता प्रत्यक्ष विधवा काहीच बोलली नाही, पण इतर सगळे स्त्रीपुरुष नातेवाईक म्हणाले की तुमच्या सारख्या स्थितीतल्या महिलांचं ठीक आहे. पण आमच्या घरी असं काही आम्ही केलं तर लोक वाळीत टाकतील आम्हांला.

मी - घरच्या पुरुष मंडळींनी विरोध केला म्हणून अडचण आली असा अनुभव आला का?

सुधाताई - हो. श्रीमती सोनाबाई मुथ्था यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना कुंकू लावण्यास घरच्या काही पुरुषांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यामुळे कुंकू लावणं जमणार नाही असंच वाटायला लागलं होतं. पण आमच्या महत्वाच्या कार्यकर्त्या म्हणजेच सोनाबाईंच्या कन्या विमल संचेती यांच्या प्रयत्नाने घरच्या स्त्रिया संघटित झाल्याने पुरुषांचे काही चालले नाही आणि कुंकू लावणं पार पडलं.

मी - तुमचा जो काही अनुभव आहे तो शहरी भागातला आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रिया काय म्हणतील असं तुम्हाला वाटतं?

सुधाताई - आमचं काम अजून इतकं वाढलेलं नसल्यामुळे, खरं तर हा सगळा विचार आम्ही केलेला नाही.

मी - तुम्ही पुण्यात हा कार्यक्रम करता. पण समजा इथून एखादी विधवा स्त्री कुंकू लावून राजस्थानात गेली तर तिथला समाज ही गोष्ट मान्य करेल का? काही अनुभव?

सुधाताई - अहो, इथेच हरतऱ्हेचे अनुभव येतात. अगदी पुणे शहरातली तरुण विधवा भाग्यश्री कोठारी हिच उदाहरण घ्या. ती कुंकू लावून गळ्यात काळे मणी (मंगळसूत्र) घालून तिच्या लहान मुलींच्या शाळाप्रवेशाबद्दलच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेत गेली तर तिथले कर्मचारी तिच्यावर तिचा पती मृत झालेला आहे याबद्दल विश्वास ठेवेनात. अगदी मरण-दाखला दाखवछनसुद्धा. या प्रकरणाने तिला अतिशय मानसिक त्रास दिला. 

राजस्थानात आमच्यापैकीच फुलवती सांकळा या विधवा बाई कुंकू लावून गेल्या होत्या. त्यांना तिथे विरोध झाला. पण या बाई विचाराने खंबीर असल्याने समाजाला तोंड देऊ शकल्या. म्हणजे स्त्री जर आत्मनिर्भर झाली तर ती स्वतःचा बचाव करू शकते. काही काही वेळा स्त्रीला जर अतिविरोध होत असेल तर मृत पतीची, त्याची स्मृती म्हणून कुंकू  पुसलं नाही पाहिजे, अशी इच्छा होती असे पण विधवा स्त्रियांनी सांगावं असे आम्ही सुचवत असतो.

मी - विचार हे आचारात प्रतिबिंबित होत असतात हे जरी खरं असलं तरी शेवटी कुंकू लावणं, न लावणं ही वरवरचीच गोष्ट आहे. कुंकवाला शक्तीचं प्रतीक मानलं तर तीही एक रूढीच होऊन बसेल. शिवाय कुंकू लावलं तरी स्त्री मनापासून स्त्रीपुरुष समानता मान्य करते आहे असं म्हणता येईल का?

सुधाताई - सुरुवातीला आम्ही कुंकू म्हणजे शक्तीचं प्रतीक असा शब्दप्रयोग केलेला आहे, पण आता आम्ही, तो गाळायचा असं ठरवलेले आहे. शिवाय स्त्री जर आधीपासून कुंकू लावत नसेल आणि तिची इच्छा नसेल तर तिने कुंकू लावलं पाहिजे असे आम्ही म्हणणार नाही. कुंकू लावण्याचा कार्यक्रम करण्यात आमचा एवढाच हेतू आहे की स्त्रीच्या इच्छेप्रमाणे तिला राहता आलं पाहिजे. विधवा स्त्रियांना परंपरागत अंधविश्वासामुळे समाजाकडून अवहेलना सहन कराव्या लागतात. त्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आमचं काम जसं वाढत जाईल, त्याचा जितका प्रचार आणि प्रसार होईल तशी विचारांची बैठक पण पक्की होत जाईल असं वाटतंय.

मी - तुम्ही मला दिलेली स्वामी सत्यभक्तजींची पुस्तकं मी वाचून काढली आहेत. त्यांची घुंघट घेणं, हुंडा पद्धतीवरची टीका तुम्ही पण वाचलेलीच आहे. त्याच संदर्भात स्वामीजींनी जो स्त्रीधनाचा विचार मांडला आहे तो मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. विवाहाच्या वेळीच स्त्रीला सासरच्या लोकांनी स्त्रीधन दिलं पाहिजे, कारण ती आता त्यांच्या कुटुंबाची सदस्य झाली आहे. अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यावर अधिक चर्चा पण करता येईल आणि तुम्ही तुमच्या महिलामंडळात तर ती कथालच. पण इतर महिलासंघटनांनीही या सूचनेची दखल घेण्याइतकी ती महत्वाची आहे असं मला वाटतं.

हल्ली विशेषतः शहरातील काही कुटुंबांत तरी, विधवा स्त्री पतिनिधनानंतर कुंकू लावतच राहते, पण ही कृती वैयक्तिक पातळीवर राहून जाते. जर हीच कृती सर्वांच्या संमतीने, सहभागाने, सामुदायिकरीत्या पार पडली तर कदाचित् रोजच्या जीवनात स्त्रीला कौटुंबिक समस्यांना समाजात अधिक धीराने सामोर जाण्याची शक्ती मिळेल. या दृष्टीने पाहिल्यास 'सत्य-साधना' महिलामंडळ एकंदर स्त्रीजागृती आणि संघटनेच्याच कामाला हातभार लावीत आहे हे नि:संशय.

Tags: सुधाताई लोढा सत्यभक्त स्त्रिया समाजसेवक बार्शी विमल रथ विधवा कुंकू राजस्थान Sudhatai Lodha. Satyabhakta Women Social worker Barshi Vimal Rath Widows Kumkum Rajasthan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके