डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मोदींची राजकीय रौरव यात्रा

हिंदुत्ववाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता हा या निवडणुकीतील वैचारिक संघर्ष आहे. गुजरातच्या दंगली मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळल्या, त्यांत धर्मनिरपेक्षतेचाच बळी गेलेला आहे. अल्पसंख्य मुस्लिमांना तेथे आता असुरक्षित वाटत आहे. ही दुरवस्था करणाऱ्या मोदींच्या पक्षास पुन्हा सत्तेवर आणायचे नाही असा जागृत मतदारांनी व धर्मनिरपेक्षवादी पक्षांनी निर्धार करायला हवा.
 

गुजरातेत लवकरच निवडणुका घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा डाव फसला आपल्या आहे. निवडणूक आयोगाची निवडणुकीस योग्य वेळ ठरविण्याची स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आयोगाने नोव्हेंबर डिसेंबरात निवडणुका घेता येतील असे मत परिस्थितीची पाहणी करून अहवालात दिले होते. दोन अधिवेशनांच्या दरम्यान सहा महिन्यांपेक्षा अधिक खंड पडू नये हे घटनेच्या 174 कलमातील बंधन त्यामुळे पाळता येणार नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्याय अहवालात सुचविला होता. पण भाजपचे नेते राष्ट्रपती राजवट लागू करण्यास तयार नाहीत; कारण अशी राजवट लागू केली तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल आणि सत्तेवर असलेल्या सरकारी यंत्रणेचा फायदा त्यांना घेता येणार नाही. मोदींनी गौरवयात्रा काढली. त्यांचा गौरव करण्यासारखे त्यांनी खरोखर काय केले आहे ? आपल्या स्तुतीपाठकांकरवी स्वतःची आरती ओवाळून घेण्याचाच तो प्रकार होता. आत्माराम आणि अहंकाराचे दर्पोक्तीयुक्त दर्शन या निमित्ताने झाले. सोनिया गांधींचा उल्लेख 'इटलीची बेटी' या शब्दांनी त्यांनी केला आणि काँग्रेस इटालियन चष्म्यातून पाहात असल्याने त्यांना आमची प्रगती दिसत नाही', अशी टीका त्यांनी केली. गोर्या चमडीवाल्यांच्यापासून मुक्ततेसाठी राष्ट्रपिता लढले पण इटलीच्या बेटीला अध्यक्ष करून काँग्रेसने त्यांचा अपमान केला आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.

काँग्रेसने निवडणूक मोहीमप्रमुख म्हणून शंकरसिंह वाघेलांना नेमले आहे. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडा जिल्ह्यातील फगळेलपासून मोदींनी आपल्या यात्रेस सुरुवात केली. बाघेलांचा त्या भागातील मेळावा नुकताच संपला होता. त्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले, "एका नेत्याचा मेळावा येथे संपला. काँग्रेसचा शेवट झाला, तेथे भाजपचा उदय होत आहे." सभेला मोठी गर्दी असली तरी बाहेरचेच लोक त्यात जास्त होते, स्थानिक थोडे होते.

मोदींची प्रचारपद्धती आणि बेताल भाषा भाजपच्या काही नेत्यांनाही आवडलेली नाही. मोदींच्या अशा भाषणांमुळे पक्षाला विजय मिळवणे कठीण जाईल, असे त्यांना वाटते. मोदींना नेतेपदावरून हलविले तर निवडणूक होण्यापूर्वीच ती हरल्याची कबुली देण्यासारखे होणार आहे. आणि ते ज्या पद्धतीने प्रचारमोहीम करीत आहेत ती अशीच चालू ठेवली तर जनमत प्रतिकूल होऊन आपण सत्ता गमावू. असे काही भाजप नेत्यांना वाटते. अर्थात ते तसे उघडपणे बोलत नाहीत.

महाराष्ट्रातील एका पक्षाने मोदींच्या गौरवयात्रेस 'कौरव-यात्रा' म्हटले आहे. पण कौरव-यात्रेपेक्षाही त्याला 'रौरव यात्रा' म्हणणे अधिक सार्थ होईल. पापारथी धडी भरलेल्याची रौरव नरकात रवानगी होते अशी आपल्याकडे परंपरागत समजूत आहे. मोदींनी एवढी राजकीय पापे केली आहेत की जागृत मतदार त्यांचा पराभव करून त्यांना राजकीय रौरवाचीच जागा दाखवील.

निवडणुकांचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाही; तरी भाजप आणि काँग्रेसने निवडणूक प्रचारमोहिमेस सुरुवात केली आहे. मुख्य लतत या दोन पक्षांतच आहे. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला जो हादरा बसला, त्यातून पक्षाला पुन्हा वर आणण्यासाठी गुजरातची निवडणूक त्यांना जिंकायचीच आहे. ही निवडणूक जिंकून दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना अनुकूल वातावरण त्यांना निर्माण करायचे आहे, तर गुजरातच्या निवडणुका जिंकून आता लोकमत काँग्रेसकडे वळत आहे आणि लोकसभा निवडणुका जिंकून काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार, अशी हवा कांग्रेस नेत्यांना निर्माण करायची आहे.

हिंदुत्ववाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता हा या निवडणुकीतील वैचारिक संघर्ष आहे. गुजरातच्या दंगली मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळल्या, त्यात धर्मनिरपेक्षतेचाच बळी गेलेला आहे. अलपसंख्य मुस्लिमांना तेथे आता सुरक्षित वाटत नाही. त्यांची ही दुरवस्था करणान्या मोदींच्या पक्षास पुन्हा सत्तेवर आणायचे नाही असा जागृत मतदारांनी व धर्मनिरपेक्षवादी पक्षांनी निर्धार करायला हवा, आणि आपसांतील मतभेद बाजूला ठेवून आणि आपसांतील लढती टाळून संयुक्त कार्यक्रमावर संयुक्त आघाडी उभारायला हवी. निवडणूक मोहिमेची ही सुरुवात आहे. तारखा जाहीर झाल्यावर त्याला अधिक निश्चिततेचे स्वरूप येईल.
 

Tags: नरेंद्र मोदी 'इटलीची बेटी' शंकरसिंह बाघेला काँग्रेस धर्मनिरपेक्षता हिंदुत्ववाद Narendra Modi 'Daughter of Italy' Shankarsinh Baghela Congress Secularism Pro-Hinduism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके