डिजिटल अर्काईव्ह

सत्तेची आकांक्षा आणि चैनीची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हाच भ्रष्टाचाराला प्रारंभ होती. त्याला मूठमाती देऊन देशात लोकशाही यावी असे वाटत असेल तर उमेदवारशाही नष्ट झाली पाहिजे आणि नागरिकांची अस्मिता जागृत झाली पाहिजे यासाठी सामाजिक सुरू झाले आहे.

अ‍ॅड्. चिमण लोकूर यांचा एकसष्टिनिमित्त सत्कार

मिरज येथील ज्येष्ठ सामाजिक व समाजवादी कार्यकर्ते, राष्ट्र सेवादलाचे सैनिक व साधना परिवारातील एक कार्यकर्ते चिमण लोकूर यांचा एकसष्ठिनिमित्त सत्कार न्याय मूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते मिरज येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. एम.जोशी सोशैंडिस्ट फाऊंडेशनचे एक विश्वस्त श्री. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी भूषविले होते. सत्कारास सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील सेवादलाचे कार्यकर्ते व इतर विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सत्कारासाठी कोणतेही हारतुरे न स्वीकारता सामाजिक कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्यामुळे सर्व कार्यक्रमास एक घरगुती स्वरूप आलेले होते. व्यासपीठावर राष्ट्र सेवादलाचे बोधचिन्ह व 'सदैव सैनिका पुढेच जायचे' या गीताचे बोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सत्ताधारी व सत्ताकांक्षांनी गुंडगिरी, अन्याय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सध्याचा समाज गोठवून त्याला अन्याय करण्याची सवय लावली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना अशा समाजाचे परिवर्तन करावयाचे असेल तर समाजामध्ये कौटुंबिक भावना व लोकशक्ती जागृत करावी लागेल असे परखड विवेचन केले. आपण परिवर्तन करावयास निघालेल्या सध्याच्या समाजालाच कार्यकर्त्यांनी गुलाम बनविले आहे. त्यामुळे राष्ट्र सेवादलासारख्या संस्कारांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते हे समाजाचे आधारस्तंभ ठरू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेची आकांक्षा आणि चैनीची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हाच भ्रष्टाचाराला प्रारंभ होती. त्याला मूठमाती देऊन देशात लोकशाही यावी असे वाटत असेल तर उमेदवारशाही नष्ट झाली पाहिजे आणि नागरिकांची अस्मिता जागृत झाली पाहिजे यासाठी सामाजिक सुरू झाले आहे. 

आज ना उद्या या विषयांवर व्यापक चर्चा होऊन कार्यकर्त्यांनी स्वतःला वाहून घ्यावे असे आवाहन न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी केले. सत्कारास उत्तर देताना चिमण लोकूर यांनी, राष्ट्र सेवादल व साधना परिवाराकडून झालेल्या संस्कारांबाबत नम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि सामाजिक कार्य पुढे जाये म्हणून आपल्या मिकळतीमधील रु. 61000 /- या रक्कमेचा ट्रस्ट राष्ट्र सेवा विश्वस्त मंडळ या नावाने सुरू करीत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमास राष्ट्र सेवादलाचे विश्वस्त सदाशिवरावजी सुलतानपुरे हे उपस्थित होते. राष्ट्र सेवादलाचे सैनिक व तासगावचे पत्रकार श्री. सुभाष कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या अनुरोधाने आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र आणि देह, मेडिकल कॉलेज मिरज यांना देत असल्याची घोषणा केली व तसेच इतर काही कार्यकर्त्यांनी मृत्यूनंतर आपल्या नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला. अ‍ॅड. चिमण लोकूर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर प्रा. पी.बी. पाटील, अ‍ॅड. एस.वाय गुंडे, डॉ. तारा भवाळकर, अ‍ॅड.व्ही.डी.जाधव व आमदार व्यंकप्पा पत्की, वसंतराव आगाशे यांनी सद्भावना व्यक्त करून त्यांना शुभचिंतन केले.

----------

सामाजिक विकास कार्य पदविका प्रदान समारंभ संपन्न

एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या नानासाहेब गोरे अकादमीतर्फे सामाजिक विकास कार्य पदविका अभ्यासक्रम 1996 साली सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम पत्राद्वारे चालविण्यात आला. अभ्यासक्रमाची माहितीपुस्तके 350 व्यक्तींनी नेली, त्यामधील 145  ज्ञाना्र्थीनी अर्ज पाठविले, या सर्वांची लेखी परीक्षा घेतल्यानंतर त्यांतील 97 स्नातकांनी प्रवेश घेतला. यामध्ये 43 स्नातक उत्तीर्ण झाले. या अभ्यासक्रमात कोल्हापूरमधील श्री. तुकाराम शिवप्पा चव्हाण सर्वप्रथम आले. 5 स्नातक प्रथम श्रेणीत, 17  द्वितीय श्रेणीत तर 21 सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या स्नातकांना पदविका फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. मधु दंडवते यांच्या हस्ते दि. 29  मे 1997 रोजी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या सभागृहात साधेपणाने पण उत्साहाच्या वातावरणात देण्यात आल्या. सर्वप्रथम आलेल्या श्री. तुकाराम शिवप्पा चव्हाण यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. एकूण 17 स्नातकांनी पदविका स्वीकारल्या. अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी व भूमिका फाऊंडेशनचे मानद संचालक, शरद दफ्तरदार यांनी विषद केली. अभ्यासक्रम संचालक श्री. रमेशचंद्र प्रधान यांनी अहवाल सादर केला. आपल्या दीक्षान्त भाषणात प्रा. मधु दंडवते यांनी उत्तीर्ण स्नातकांना आवाहन केले की अभ्यासक्रमातून शिकल्या जाणाऱ्या विषयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 

तेव्हा परिवर्तनशील जनमत तयार करण्यासाठी विचारांचा व मूल्यांचा आधार घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे गेले पाहिजे आणि सामाजिक कार्यकत्यांना संघर्ष, रचनात्मक काम व जनमत तयार करणे तीनही कामे केली पाहिजेत पोधीनिष्ठ विचार न करता बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून प्रशिक्षण घेतले पाहिजे याचा विचार परिवर्तनवादी कार्यकत्याने केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. श्री. शरद दफ्तरदार यांनी अकादमीच्या नव्याने सुरू होणाऱ्या कामगार जीवनाभ्यास पदविका' व 'नागरी विकास या पदविका अभ्यासक्रमांची माहिती दिली व अभ्यासक्रमात साहाय्य केलेल्या सर्वाचे मनःपूर्वक आभार मानले.

Tags: चिमण लोकूर  मिरज चंद्रशेखर धर्माधिकारी Chiman Lokaru Miraj Chandrashekar Dharmadhikari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी