डिजिटल अर्काईव्ह

सुरुवातीस अनाथ आणि निराधार मुलांची संख्या 300 होती, आता 190 आहे. पण ही संख्या काही आपोआप कमी झाली नाही. आर्थिक अडचणींमुळे मनावर दगड ठेवून जाणीवपूर्वक आम्ही ही संख्या कमी केली.

'आपलं घर' च्या मदतीसाठी

मराठवाड्यातील प्रलंयकारी भूकंपाला येत्या 30 सप्टेंबरला तीन वर्षे होतील आणि भूकंपामुळे निराधार झालेल्या मुलांचे अनाथालय 'आपलं घर' राष्ट्र सेवा दलाने सुरू केले, त्याला येत्या 24 डिसेंबरला तीन वर्षे पूर्ण होतील. 

कुणाही मानवतावादी व्यक्तीला अभिमान वाटावा, असे निराधार मुलांच्या आशा पल्लवित करणारे हे सेवादलाने चालवलेले काम आहे. 'आपलं घर'च्या दैनंदिन खर्चासाठी (दोन वेळचे जेवण, चहा-नाश्ता इत्यादी) महाराष्ट्र शासनाकडून गेल्या तीन वर्षात काहीही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे 'आपलं घर'चा संसार ओढग्रस्तीने चालला आहे. 

सुरुवातीस अनाथ आणि निराधार मुलांची संख्या 300 होती, आता 190 आहे. पण ही संख्या काही आपोआप कमी झाली नाही. आर्थिक अडचणींमुळे मनावर दगड ठेवून जाणीवपूर्वक आम्ही ही संख्या कमी केली.

महाराष्ट्रात कुणीही अभिमान बाळगावा असा हा प्रकल्प मूळ धरतोय. अजून पाच-सहा वर्षे आर्थिक मदतीची गरज पडेल. आज 14 लाख रुपयांची कायम ठेव आहे. ती 40 लाख रुपयांची तरी व्हायला हवी. कारण ठेवींच्या व्याजातून 'आपलं घर'च्या परिरक्षणाचा खर्च भागवला जाईल. दर महिन्याचा खर्च 40 ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान होतो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी