बहुसंख्य ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांची मागणी ही आहे की दहा वर्षे ज्युनिअर कॉलेजात शिकवल्यानंतर त्यांना सीनिअर कॉलेजमध्ये घेण्यात यावे आणि त्यांना या वरिष्ठ गटाची वेतनश्रेणी मिळावी. शासनाने यासंबंधी एकदा अंतिम निर्णय द्यावा. अन्यथा ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांतील असंतोष असाच खदखदत राहणार.
कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला याबद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समाधान आणि प्राध्यापकांमध्ये असमाधान आहे. शिक्षणमंत्र्यांनी प्राध्यापकांच्या सतरा मागण्यांपैकी फक्त तीन मागण्या मान्य केल्या परंतु वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग या संपाशी अजिबात संबंध ठेवला नाही आणि समाजातही संपाला पाठिंबा नव्हता. त्यामुळेच संप मागे घ्यावा लागला.
कनिष्ठ महाविद्यालयांची निर्मिती ज्या पद्धतीने झाली तेथूनच व अन्यायाला सुरुवात झाली. विदर्भात हायर सेकंडरी- म्हणजे 11 वी, 12 वी शाळांना जोडलेली असे. पश्चिम महाराष्ट्रात हायर सेकंडरी हा प्रकारच नव्हता. त्यामुळे कॉलेजांना ही ज्युनिअर कॉलेजेस जोडली गेली.
एकाच आवारात जवळजवळ सारखीच क्वालिफिकेशन्स असलेल्या प्राध्यापकांमध्ये सिनिअर कॉलेजमधील एक गट आणि ज्युनिअर कॉलेजमधील एक गट अशी विभागणी झाल्यावर ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांमध्ये असंतोष निर्माण होणारच.
बहुसंख्य ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांची मागणी ही आहे की दहा वर्षे ज्युनिअर कॉलेजात शिकवल्यानंतर त्यांना सीनिअर कॉलेजमध्ये घेण्यात यावे आणि त्यांना या वरिष्ठ गटाची वेतनश्रेणी मिळावी. शासनाने यासंबंधी एकदा अंतिम निर्णय द्यावा. अन्यथा ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांतील असंतोष असाच खदखदत राहणार.
प्राध्यापकांच्या या संपाला समाजाची सहानुभूती का नव्हती, याचाही प्राध्यापकांनी विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे संघर्ष करावयाचा असल्यास त्यासाठी आवश्यक ती संघटना बळकट केली पाहिजे. यावेळी प्राध्यापकांची संघटनाही फार अपुरी पडली, या कटू सत्याकडे डोळेझाक करता येणार नाही.
Tags: संप प्राध्यापक शिक्षणमंत्री पालक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय strike professor education minister parents students Junior college weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या