डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. वीणा सुराणा यांनी आपल्या भाषणातून मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देण्याविषयी आग्रहाचे प्रतिपादन केले. श्रीमती. रत्नप्रभा बेंबळकर यांनी स्त्री-शिक्षणाचे महत्त्व पटवून एक स्त्री शिकली तर संबंध कुटुंब सुधारते. म्हणून मुलापेक्षा मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व जास्त आहे हे पटवून दिले.

नवभारत विद्यालयात 'वसुंधरा स्मृतिदिन’

दरवर्षाप्रमाणे यंदाही नवभारत विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका दिवंगत वसुंधरा नूलकर यांचा 15  वा स्मृतिदिन 12 ऑगस्ट 97 रोजी कुर्डूवाडीच्या माजी नगरसेविका श्रीमती. उषाताई कुंतल शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या लातूरच्या लाहोटी कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. रत्नप्रभा बेंबळकर होत्या. त्यांच्या हस्ते 'वसुंधरा विद्यार्थी कल्याण’ योजने मार्फत विद्यार्थ्यांना    गणवेष वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात 'जय जगत् ' या गीताने झाली. श्री. जयद्रथ वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. पाहुण्यांची ओळख ज्येष्ठ शिक्षक श्री. ह. ल. कुलकर्णी यांनी करून देऊन वसुंधराबाईच्या कार्याचा गौरव केला. 

याप्रसंगी माजी विद्यार्थी शंकर - शिंदे व देवकुळे यांनी बाईच्या प्रेमळ व प्रेरक आठवणी सांगून त्यांनी विद्यार्थ्यांवर कसे संस्कार केले याविषयी आपले अनुभव सांगितले माजी मुख्याध्यापक श्री. शरद नूलकर यांनी नवभारत विद्यालयाच्या घडणीतील बाईच्या व कै. तुकाराम शिंदे यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून शाळेची उज्वल परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या श्रीमती. रत्नप्रभा बेंबळकर यांनी वसुंधराताईंच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा वेधक आढावा घेऊन सावित्रीबाई फुलेंचा वसा चालवण्याची थोर कामगिरी त्यांनी हृदयविकाराचा त्रास होत असतानाही निष्ठेने व तळमळीने केली याबद्दल गौरवोद्गार काढले. व 'वसुंधरा विद्यार्थी कल्याण’ योजने साठी रु. 1001 ची देणगी दिली. अध्यक्षीय भाषणात श्रीमती. उषाताई शहा यांनी वसुंधराताईंनी त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा दिल्याचे आवर्जून सांगितले. शिक्षक प्रतिनिधी या नात्याने श्री. नागेश परदेशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षणप्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री. पांडुरंग उबाळे, विश्वस्त रामभाऊ कांबळे, डॉ. वीणा सुराणा, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

----------

वसुंधरा महिला मंडळातर्फे मेळावा संपन्न 

12 ऑगस्ट 97  रोजी दारफळ येथे कै. वसुंधरा स्मृतिदिनानिमित्त 'वसुंधरा महिला मंडळाने महिला मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वीणा सुराणा श्रीमती. रत्नप्रभा बेंबळकर, श्रीमती. उषाताई शहा व श्रीमती. सुनंदा शहा उपस्थित होत्या. डॉ. वीणा सुराणा यांनी आपल्या भाषणातून मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देण्याविषयी आग्रहाचे प्रतिपादन केले. श्रीमती. रत्नप्रभा बेंबळकर यांनी स्त्री-शिक्षणाचे महत्त्व पटवून एक स्त्री शिकली तर संबंध कुटुंब सुधारते. म्हणून मुलापेक्षा मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व जास्त आहे हे पटवून दिले. दारफळ येथील जि.प.सदस्या श्रीमती. उषाताई शिंदे यांनी महिला विकासाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ ग्रामीण स्त्रियांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले श्रीमती. जिजाऊ उबाळे यांनी कै. वसुंधराताईच्या जीवनातील आठवणी सांगितल्या. दारफळची माता, भगिनी कन्या असे नाते असलेल्या दारफळच्या भाग्यविधाता श्रीमती. वसुंधराबाईंना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: डॉ. वीणा सुराणा  रामभाऊ कांबळे पांडुरंग उबाळे रत्नप्रभा बेंबळकर वसुंधरा नूलकर Dr. Vina Surana rambhau Kambale Pandurang Ubale Ratnabrabha Bebalkar Vasundhara Nulakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके