डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लग्नात कोणी किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असा युक्तिवाद केला जातो. संपत्तीचे हिडीस प्रदर्शन हे हीन अभिरुचीचे लक्षण आहे आणि समाजाला ते हानिकारक आहे, हे म्हणणे अनेकांना पटत नाही. अशा वेळी या प्रश्नाची कायदेशीर बाजूही मांडणे आवश्यक ठरते.

सध्या लग्नसराईत सर्वत्र विवाह समारंभ धूमधडाक्याने साजरे होत आहेत. ज्या कुटुंबातील मुलाचे वा मुलीचे लग्न असते त्या कुटुंबाला आणि त्यांच्या इष्टमित्रांना तो आनंदाचा प्रसंग असतो हे स्वाभाविकच आहे. असे असले तरी सध्या ज्या पद्धतीने आपल्या समाजात विवाह समारंभ साजरे होतात त्यांत कौटुंबिक आनंदापेक्षा संपत्तीचे उन्मत्त प्रदर्शन आणि डामडौल हाच भाग मुख्यत्वाने आढळून येतो. कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक समारंभाचे रूप देऊन स्वतःची प्रतिष्ठा मिरविणे हाच अनेक श्रीमंतांचा उद्देश असतो. लग्नात पूर्वी प्रेमाने ज्या गोष्टी केल्या जात त्या आता हक्काच्या मानल्या जातात. 

त्यामुळे जबरदस्त हुंडा घेणे, वधूपक्षाकडून वरपक्षाने हुंड्याऐवजी मोटारी, फ्लॅट आणि अन्य चैनीच्या वस्तू तसेच सोन्याचे दागिने घेणे या गोष्टींना दुर्दैवाने सामाजिक मान्यता मिळालेली आहे. या अनिष्ट प्रवृत्तीस कायद्याने आळा घालता येणार नाही. परंतु लोकांनीच याबाबत ज्या लग्नात हुंडा घेतलेला असेल आणि जेथे रोषणाई आणि निमत्रितांना मेजबानी यांवर भरमसाट खर्च केला असेल अशा विवाह समारंभांना हजर रहावयाचे नाही असा निर्णय घेतला पाहिजे.

लग्नात कोणी किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असा युक्तिवाद केला जातो. संपत्तीचे हिडीस प्रदर्शन हे हीन अभिरुचीचे लक्षण आहे आणि समाजाला ते हानिकारक आहे, हे म्हणणे अनेकांना पटत नाही. अशा वेळी या प्रश्नाची कायदेशीर बाजूही मांडणे आवश्यक ठरते. ज्या ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने भरमसाट खर्च केला जातो अशा ठिकाणी प्राप्तिकर खात्याने धाड घालून नियमानुसार दंड वसूल केला पाहिजे. आपल्याकडे खर्चावरील कराची आकारणी आणि वसुली चोखपणे झाली, तरच सध्या बोकाळलेल्या भपकेबाज विवाह समारंभांना काही प्रमाणात तरी आळा बसेल.

Tags: हुंडा लग्न Dowry  Wedding weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके