डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनामिकाचे अंतरंग (29 सप्टेंबर 1983)

भोरजवळची गोष्ट. माननीय राज्यमंत्री ना. अनंतराव थोपटेजी यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ व्हायचा होता. पण त्यांना अर्जंट' काम निघाल्याने भोरच्या भाविकांना बोपटे सहवाससुख लाभले नाही. त्यांच्या ऐवजी भोरच्या पोलिस जमादारांच्या (शुभ) हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. पुरुषस्य भाग्यम् म्हणतात, ते हे ! औट घटकेचे राज्य चालविणाऱ्या धोब्याप्रमाणे यांच्या खुर्चीवर जमादारजी बसले. त्यांचे राकट-दणकट हातही शुभहस्त ठरले. त्यांनी भाषण केले की नाही माहीत नाही; पण करावयास हरकत नव्हती.

माननीय जमादार की जय !

भोरजवळची गोष्ट. माननीय राज्यमंत्री ना. अनंतराव थोपटेजी यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ व्हायचा होता. पण त्यांना अर्जंट' काम निघाल्याने भोरच्या भाविकांना बोपटे सहवाससुख लाभले नाही. त्यांच्या ऐवजी भोरच्या पोलिस जमादारांच्या (शुभ) हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. पुरुषस्य भाग्यम् म्हणतात, ते हे! औट घटकेचे राज्य चालविणाऱ्या धोब्याप्रमाणे यांच्या खुर्चीवर जमादारजी बसले. त्यांचे राकट-दणकट हातही शुभहस्त ठरले. त्यांनी भाषण केले की नाही माहीत नाही; पण करावयास हरकत नव्हती.

नामदार आणि जमादार यांत विद्वत्ता आणि या दृष्टीने फारसा फरक नसतोच. आम्ही तर असे म्हणतो की, भोरकरांनी पाडलेला पायंडा उभ्या आणि आडव्या महाराष्ट्राने स्वीकारण्याजोगा आहे. फुकट फौजदारापेक्षा जमादाराजवळ वेळही जास्त असतो, त्याची 'आनंद' कामेही त्याला फारशी घाई न करता करण्याची सवय असते हे आपण हरघडी अनुभवतोच. मंत्री आणि जमादार दोघेही तसे 'जन्ते'चे सेवकच. तर मग मंत्र्यांचा बहुमोल वेळ पायाभरणी, इमारत उघडणी, पारितोषिक देणी, संमेलन सजवणी असल्या कामांसाठी आपण का घ्यावा? आणि तेही पोलिस जमादार प्रत्येक गावी 'डूटी'वर असताना? छे, छे- त्यापेक्षा असे करावे! 

माननीय जमादारजींना प्रत्यक्ष भेटून आमंत्रण द्यावे आणि त्यांना दारू-मटक्यांच्या अड्ड्यावर त्या दिवशी डयूटी नसल्यास (अर्थात छापा घालण्याची!) ते नाही म्हणणार नाहीत आणि चुकून एकादवेळी टाईम नसेलच, तर ऐनवेळी माननीय मंत्र्यांना बोलवावे. असा कमिलापष्ठीचा योग आल्यास ते सरकारी गाडीतून अथवा हेलिकॉप्टरमधून येण्यासही अनुमान करणार नाहीत. त्यांनाही तेवढीच जनसेवा इथे आम्हाला एक आठवण होते. अर्थात भलतीच ! प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कोणे एके काळी पाचशे रुपयांचे एक पारितोषिक मिळाले.

म्हणजे जाहीर झाले. प्रत्यक्ष रक्कम मात्र हाती आलीच नाही. सहा महिने वाट पाहून गाडगीळांनी तगादा लावला, तेव्हा रागावलेल्या संयोजकांनी त्यांना शांत राहण्याचा उपदेश केला आणि अलाणे फलाणे मंत्री उपलब्ध झाल्यावर ते पारितोषिक देण्यात येईल, असे कळविले ! या औदार्याने गहिवरून जाणारांपैकी गाडगीळ नव्हेत. त्यांनी चक्क पत्र लिहिले, आणि संयोजकांना आपले नम्र मत कळविले, ते असे मंत्र्यापेक्षा पोस्टमन बरा- त्याला त्याच्या नोकरीची पक्की हमी असते ! चाणाक्ष वाचकांस अधिक सांगायला नकोच !

-----------

पावरबाज पेट्रोल ‘त्र्याण्णव' ऑक्टेनचे!

जाणकार जाणतात की, पेट्रोलमध्ये चालू आणि ‘त्र्याण्णव ऑक्टेन'- असे दोन प्रकार असतात. दुसरा प्रकार जास्त पावरबाज असतो. हाच न्याय लावून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही 93 निष्ठावंतांची बनविण्यात आली आहे.

कमेटीला अध्यक्ष एकच असला तरी उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी या जागांसाठी मात्र सात-सात आठ-आठ नग आहेत. सभासद म्हणून सर्व जिल्ह्यांचे, सर्व धर्माचे, सर्व पंथांचे, सर्व जातीचे- हंगामी आणि शाश्वत इंदिरा भक्तांचे, सारांश प्रत्येक पंचक्रोशीमधील आणि षडयंत्रामधील सर्वेसर्वाचे आहेत. याखेरीज हिंदी चित्रपटात जशा  खास पाहुणे कलाकारांना भूमिका दिले असतात, तसे ‘93 ऑक्टेन' कमिटीत कायम निमंत्रित आहेत. त्यांत प्रतिशिवाजी यशवंतरावजी यांच्या बरोबरच देशगौरव दर्डाजी आणि गरीब नवाज परवरदिगार अंतुलेजी जसे स्टार्स देखील आहेत. यात गैर काहीच नाही. शिवाच्या जिवाला जीव देणारा नाभिक वीर जिवा महाला नव्हता काय! म्हणच आहे' होता जिवा म्हणून वाचला शिवा आजही आपण म्हणू शकू आहेत तर यशवंतराव फर्डा! आहे अंतुला तर थोरवी जंतुला. 

ही 93 नावे अकारविल्हे लावण्याचे काम सध्या सात चिटणिसांकडे सोपविण्यात आले आहे. अनेक उपाध्यक्ष आणि अनेक सेक्रेटरी यांना कामे तर असायला हवीत ना! मात्र कांबळेजीसारखा योजक अध्यक्ष म्हणून हवा. साहेब म्हणत आम्ही शेंदूर लावलेला दगड उभा केला तरी निवडून येणारच. सध्याच्या महागाईत सुद्धा परवडत नाही हो! त्यामुळे धुतल्या चारित्र्याचे निखळ दगडच पुरतात. जाता कोणी डांबीस लोक म्हणतात की, काँग्रेसच्या मारुती मोटरला तीन चाके आहेत त्याला इंजनच नाही.

हे सर्व साफ खोटे आहे. इंजन आहे. त्याशिवाय का त्याचा प्रत्येक भाग इतके बंगण खातो! चाकही जागेवर आहेत. पण कधी तरी पुढली जाम होतात, कधी मागली. किंवा पुढली पूर्वेला तर मागली पश्चिमेला पळू पाहतात. आणि समजा, गाडी मोडकी असली तरी जोपर्यंत तिचे सारथ्य साक्षात् शक्ती करते आहे. तोपर्यंत चलती काही थांबणार नाही, एवढे सांगितले तरी अजून संशय? तर मग या हे पावरवाज, पावरप्रिय आणि पावरलंकित 93 ऑक्टेन इंधन!

Tags: अनंतराव थोपटे राज्यमंत्री गंगाधर गाडगीळ कांबळे अंतुले यशवंतराव Kambale antule Yashawanrao Anantrao Thopate State Minister Gangadhar Gandgil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके